ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
नववर्षाची सुरूवात करा ‘या’ संकल्पांनी

नववर्षाची सुरूवात करा ‘या’ संकल्पांनी

नवीन वर्षाची सुरूवात अगदी धुमधडाक्यात झाली. दरवर्षी गतवर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करतानाचा प्रत्येकाचा उत्साह काहीतरी औरच असतो. आणि… याच उत्साहाच्या भरात आपण मनाशी काहीतरी संकल्प करतो. नवीन वर्षात काहीतरी वेगळं आणि नवीन करण्याचे हे संकल्प आयुष्यात नवा हुरूप आणतात. कुणी सर्वांशी चांगलं वागण्याचा तर कुणी सकाळी लवकर उठण्याचा संकल्प करतात. कधी मागच्या वर्षीपेक्षा अधिक प्रयत्न करण्याचा, वजन कमी करण्याचा संकल्प केला जातो. नेहमीच हे सर्व संकल्प पुर्ण होतातच असं नाही. कारण थर्टी फर्स्टच्या रात्री जागरण झाल्यामुळे एक जानेवारीला लवकर उठण्याचा संकल्प आपोआपच मोडून पडतो. मग उद्या – उद्या असं म्हणत सर्वच संकल्प मोडले जातात. काही संकल्प काही महिने टिकतात तर नंतर आपोआप विसरले जातात. काही लोक असं म्हणतात की, संकल्प हे मोडण्यासाठीच असतात. पण काहीही असलं तरी दरवर्षी नव्याने एखादा संकल्प करणं कोणीच सोडून देत नाही. कारण नवीन वर्ष आपल्या आयुष्यात नवं काहीतरी घेऊन येणार अशी प्रत्येकालाच आशा असते. मग खरा प्रश्न निर्माण होतो तो हा की, संकल्प करावेत की करू नयेत. संकल्प करणं नेहमीच चांगलं कारण ते आपल्या सकारात्मक विचार करण्याचं, प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकण्याचं, अविरत प्रयत्न करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.  फक्त आपण केलेले हे संकल्प पूर्ण करण्याची प्रयत्न करणंही तितकंच गरजेचं आहे. संकल्प पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचं आहे त्या संकल्पाची सवय लावणं. मानसशास्त्र असं सांगतं की एखाद्या गोष्टीची सवय तेव्हाच लागते जेव्हा तुम्ही ती सातत्याने कमीत कमी एकवीस दिवस करता. सतत, नियमित आणि जाणिवपूर्वक प्रयत्न केल्यामुळे त्या गोष्टींची सवय आपल्याला आपोआप लागते. म्हणूनच मी तुमच्यासोबत असे काही संकल्प शेअर करत आहे जे आपल्या सर्वांच्याच भल्याचे आहेत.

Shutterstock

यावर्षी मनापासून हे काही संकल्प जरूर करा –

यंदा स्वतःसाठी नवीन वर्षीचे संकल्प करण्यासाठी या काही टिप्स जरूर फॉलो करा

ADVERTISEMENT

मी काटकसर आणि बचत करेन –

आजकालची जीवनशैली अशी आहे की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला सतत पैशांची गरज असते. मात्र आपण बऱ्याचदा अयोग्य आणि बिनगरजेच्या गोष्टींवर फार पैसे खर्च करतो. याची जाणिव महिन्याच्या अखेरीस आपल्याला होते. खरंतर यामुळे कधीकधी गरजेच्या गोष्टींसाठीही आपल्याजवळ पुरेसे पैसे उरत नाहीत. म्हणूनच यावर्षी पैसे बचत करण्याचा संकल्प जरूर करू या. बघा बरं तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वायफळ, बिनगरजेच्या गोष्टींवरील किती खर्च करता. नीट लक्ष दिल्यास तुमच्या लक्षात येईल की, तुमचा सर्वात जास्त पैसा हा बाहेरच्या खाण्यावर जात आहे. म्हणून यावर्षी कुकिंग शिकून घ्या. घरी तयार केलेले पौष्टिक पदार्थ खा ज्यामुळे तुमचे हॉटेलवर खर्च होणारे पैसे तर वाचतीलच शिवाय अपथ्यकारक पदार्थ खाण्यामुळे आजारपणावर होणारा खर्चदेखील नक्कीच वाचेल. हा संकल्प पूर्ण करणं कितीही कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही.

मी मोबाईलवर टाईमपास करणार नाही –

आजकाल तुम्ही कुठेही बघा सर्वजण आपापल्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त असतात. ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरतानादेखील कोणाचे कोणाकडे लक्ष नसते. तुम्ही जर सोशल मीडिया अॅडिक्ट असाल तर आताच सावध होण्याची गरज आहे. कारण हे माध्यम कितीही उपयुक्त आणि प्रभावी असलं तरी त्याचे दुष्परिणाम फार आहेत. शिवाय कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे हानिकारकच असतं. म्हणून या माध्यमाच्या अधीन न जाता नव्या वर्षात त्याचा गरजेपुरताच वापर करण्याचा संकल्प जरूर  करा. ज्यामुळे तुमचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन नक्कीच सुखाचे होईल.

Shutterstock

ADVERTISEMENT

मी नेहमी सकारात्मक विचार करेन –

नेहमी सकारात्मक आणि चांगले विचार तुमच्या जीवनात फायदेशीर ठरतात. मात्र मनातील नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी आणि  सतत सकारात्मक विचार करण्यासाठी तशी संगतदेखील हवी. कारण चांगल्या संगतीचा परिणाम तुमच्यावर आपोआप घडतो. यासाठी यावर्षी चांगल्या आणि सकारात्मक विचार करण्याऱ्या लोकांच्या, पुस्तकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा.

मी छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करेन –

आपण नेहमीच आपल्या जवळ नसलेल्या गोष्टी आणि आनंद याच्या शोधात असतो. ज्यामुळे कधी कधी आपल्या जवळ असलेल्या  छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करणं राहूनच जातं. यासाठी नवीन वर्षात प्रत्येक दिवशी तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या गोष्टींचा आनंद सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहण्याची ही सवय तुम्हाला आयुष्यात नक्कीच समाधानी करेल.

मी शांत राहण्याचा प्रयत्न करेन –

जर तुमचे स्वतः वर प्रेम असेल तर त्यासाठी जास्तीत जास्त शांत राहण्यास शिका. कारण राग, द्वेष, मत्सर हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आयुष्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. मेडिटेशन आणि ध्यानधारणेमुळे तुम्हाला शांत आणि निवांत राहण्यास मदत होईल. यासाठी नवीन वर्षात दिवसभरात कमीत कमी अर्धा तास स्वतःसाठी द्या. ताण तणावापासून दूर राहण्याचा आणि निरोगी राहण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.

मी भरपूर ज्ञान मिळवेन –

जर तुम्हाला खरं आणि अचूक ज्ञान मिळवायचं असेल तर पुस्तकांशी मैत्री करा. ज्ञानाने माणूस परिपूर्ण होतो. तुम्ही कधीकाळी एका दिवसाला एक पुस्तक वाचत होता मात्र आता तुम्ही सोशल मीडियाच्या जाळ्यात पुस्तक वाचणंच विसरून गेला आहात. तेव्हा या नवीन वर्षी पुन्हा नव्याने पुस्तकवाचनाला सुरूवात करण्यास काय हरकत आहे.

ADVERTISEMENT

मी स्वतःचे कौतुक स्वतःच करेन –

दिवसभरात तुम्ही कितीतरी नवीन गोष्टी करता अथवा शिकता. जसं की वेळेवर उठणं, एखादं प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करणं, डेडलाईन्स पूर्ण करणं, घरातील जबाबदारी व्यवस्थित सांभाळणं, निस्वार्थी प्रेम करणं. जेव्हा तुम्ही असं काहीतरी नवीन आणि चांगलं करता तेव्हा इतरांच्या कौतुकाची वाट पाहत बसू नका. त्यापेक्षा स्वतःचं कौतुक स्वतः करा आणि  पुढे जा. अती अपेक्षा तुम्हाला दुःख देऊ शकतात. स्वतःचा आनंद इतरांच्या हातात न देता तो स्वतःकडेच ठेवा. ज्यामुळे तुम्हाला कोणी कौतुक न केल्याचं दुःख होणार नाही.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

आनंदी जीवन जगण्यासाठी या ’10’ गोष्टी अवश्य करा

आनंदी राहण्यासाठी डोक्यातील ‘डिलीट’ बटणाचा करा वापर

यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार

ADVERTISEMENT
30 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT