ADVERTISEMENT
home / केस
किशोरवयीन मुलींनी कधी सुरु करावं वॅक्सिंग अथवा थ्रेडिंग

किशोरवयीन मुलींनी कधी सुरु करावं वॅक्सिंग अथवा थ्रेडिंग

मुलींच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पौगंडावस्था. या काळात त्यांच्या शरीरात अनेक हॉर्मोन्सची निर्मिती होत असते. ज्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक बदलांमध्ये होऊ लागतो. शरीरात अचानक होणारे हे बदल बऱ्याचदा मन पटकन स्वीकारत नाही. त्यामुळे मनात संभ्रम आणि तणावाचा गुंता निर्माण होतो. शारीरिक बदलांमुळे अंगावर अनावश्यक केसांची वाढ होऊ लागते. अचानक अंडरआर्म्स, मांड्या आणि बिकिनी भाग, अप्परलिप्सवर केस वाढू लागल्याने त्यांची थट्टामस्करी होऊ लागते. शाळेत जाताना स्कर्ट अथवा इतर वेळी फॅशनेबल कपडे घालणं त्रासदायक होतं. यासाठीच जाणून घ्या या वयात नेमकं कधी सुरू करावं वॅक्सिंग, थ्रेडिंग आणि शेव्हिंग

टीन एज मुलींनी वॅक्सिंग करणे कधी सुरू करावे –

किशोरवयात मुलींच्या अंगावर अनावश्यक केसांची वाढ होणं हा एक नैसर्गिक बदल आहे. शिवाय प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा काळ नेमक्या कोणत्या वयापासून सुरू होईल हे निश्चित सांगता येत नाही. शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांनुसार काही जणींच्या अंगावर दाट केस येतात तर काहींसाठी ही क्रिया नेहमीप्रमाणे साधारण असू शकते. तुमच्या घरी आई  अथवा बहीणीच्या अनुवंशिकतेनुसारही तुमच्या अंगावर केस दाट येणार की सौम्य हे तुम्हाला समजू शकते. त्यामुळे केसांची वाढ दाट असेल तर तुम्ही नक्कीच वॅक्सिंग, शेव्हिंगचा विचार करू शकता. यासाठी घरातील अनुभवी स्त्रीयांची मदत घ्या. याबाबत मोकळेपणाने बोलण्याचा संकोच करू नका. कारण अंगावर केस येणं ही एक नैसर्गिक आणि सर्वसामान्य प्रक्रिया आहे. 

वॅक्सिंग करावे, थ्रेडिंग करावे की शेव्हिंग

बऱ्याचदा या काळात मुली इतरांशी बोलण्याचा संकोच मनात असल्यामुळे अथवा पार्लरमध्ये जाण्याची लाज वाटत असल्यामुळे किंवा मनात शंकाकुशंकांचा गोंधळ झाल्यामुळे घरीच रेझरने अंगावरचे केस काढतात. मात्र अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने रेझर अंगावर फिरवल्यामुळे तुमच्या केसांची ग्रोथ बिघडते आणि आणखी दाट आणि राठ केस अंगावर उगवतात. शिवाय योग्य ज्ञान नसल्यामुळे तुमच्या अंगावर रेझरमुळे जखमाही होऊ शकतात. यासाठीच पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करणं अथवा घरातील  अनुभवी महिलांची मदत घेणं खूप गरजेचं आहे. असं न केल्यास भविष्यात तुम्हाला अंगावरील या अनावश्यक केसांना मॅनेज करणं कठीण जाऊ शकतं. रेझरचा अती वापर केल्यामुळे अंडरआर्म्स अथा प्युबिक भागातील त्वचा काळवंडते. 

वॅक्सिंग अथवा शेव्हिंग करताना काय काळजी घ्यावी –

किशोरवयात पहिल्यांदा वॅक्सिंग, शेव्हिंग करताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT
  • वॅक्सिंग करण्यापूर्वी तुम्ही करत असलेल्या वॅक्सची तुम्हाला अॅलर्जी  नाही याची खात्री करून घ्या
  • वॅक्स स्ट्रिप्स काढण्यासाठी अनुभवी महिलांची मदत घ्या. चुकीच्या पद्धतीने वॅक्स स्ट्रिप ओढल्यास जखम होऊ शकते
  • वॅक्स करण्याआधी त्वचा  कोरडी करा आणि वॅक्स झाल्यावर ती स्वच्छ करून त्यावर अॅस्ट्रिजंट लोशन लावा
  • वॅक्स स्ट्रिप्स अथवा रेझर केस वाढत असलेल्या दिशेच्या विरूद्ध दिशेला फिरवा. ज्यामुळे केसांची इनग्रोथ नीट होते आणि पुन्हा अंगावर येणारे केस योग्य दिशेने येतात
  • अंडर आर्म्स आणि बिकिनी भागातील केस काढताना ती त्वचा अधिक नाजूक असल्याने सावधपणे वॅक्स अथवा 
  • शेव्हिंग करणार असाल तर गरम पाण्याचा वापर करा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर इनफेक्शन अथवा जखम होणार नाही
  • वॅक्सिंग अथवा शेव्हिंग करण्याची घाई करू नका. योग्य टेकनिकचा  वापर करूनच वॅक्स अथवा शेव्ह करा,ज्यामुळे त्वचेचं नुकसान टाळता येईल
  • वॅक्स स्ट्रिप्स अथवा रेझर वापरतान हायजिनची काळजी घ्या. या वस्तूंचा पुर्नवापर करणे टाळा
  • हेअर रिमूव्हल क्रिम वापरताना ते तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे का याची नीट काळजी घ्या

सोळा ते अठरा याकाळात मुलींच्या त्वचेचा योग्य विकास झालेला नसतो. ज्यामुळे टीनएजमधील मुलींची त्वचा नाजूक असते. सहाजिकच या काळात वॅक्स आणि शेव्हिंगचा अती वापर करू नये. जेव्हा गरज असेल तेव्हाच वॅक्सिंग अथवा शेव्हिंग करावे. नाहीतर त्वचा सतत ओढली गेल्यास ती सैल पडण्याची अखवा त्वचेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते. 

 

 

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

किशोरवयीन मुलींच्या आहारात असावीत ही फळे

टीनएज मुलींसाठी स्कीन केअर टिप्स, त्वचा राहील कायम चिरतरूण

तुमच्या वयानुसार अशी निवड करा योग्य शेडच्या ब्लशरची

17 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT