तुमच्या वयानुसार अशी निवड करा योग्य शेडच्या ब्लशरची

तुमच्या वयानुसार अशी निवड करा योग्य शेडच्या ब्लशरची

मेकअपमुळे स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. मात्र असं असलं तरी यासाठी प्रत्येक वयोगटाच्या महिलांनी एकसारखा मेकअप मुळीच करू नये. प्रत्येक वयोगटानुसार मेकअपचे प्रकार आणि मेकअप प्रॉडक्टच्या शेडमध्ये बदल करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ किशोरवयीन, मध्यम आणि वयस्कर महिलांनी एकसारखं ब्लशर लावलं तर ते मुळीच चांगलं दिसणार नाही. यासाठीच जाणून घ्या तुमच्या वयोमानानुसार तुम्ही कोणत्या रंगाच्या ब्लशरची निवड करायला हवी.

विशीच्या आतील किशोरवयीन मुलींनी अशी करावी ब्लशरची निवड -

जर तुम्ही टीन एज अथवा विशीतल्या किशोरवयीन मुली असाल तर तुम्ही सॉफ्ट पिंक आणि पिच रंगाचे ब्लशरचे शेड निवडू शकता. त्यातही जर तुम्ही खूप उजळ रंगाच्या असाल तर पिंक आणि पिच तुमच्यावर नक्कीच खुलून दिसेल. पण तुमचा रंग गडद अथवा सावळा असेल तर तुम्ही थोडं वॉर्म शेड करणे जाणारं कॉफी अथवा ब्राऊन रंगाचं ब्लशर निवडायला हवं. ज्यामुळे तुमचा स्किन टोन नक्कीच चांगला दिसेल.

Beauty

K.Play Flavoured Blush - Juicy Strawberry

INR 645 AT MyGlamm

तिशीतील महिलांनी अशी करावी ब्लशरची निवड -

ज्या महिला तिशीच्या पुढील वयोगटाच्या असतील त्यांनी त्यांच्या स्किन टोनपेक्षा हलक्या रंगाचे ब्लशर निवडावे. कारण या वयात त्यांच्या चेहऱ्यावर एजिंगचे मार्क्स दिसायला लागतात. अशा वेळी सेमी मॅट फिनिश लुकचे शेड त्यांच्यावर खुलून दिसू शकतात. चेहऱ्यावर येणाऱ्या फाईन लाईन्स आणि ओपन पोअर्स झाकण्यासाठी अशा महिलांनी ब्लशरचा वापर करण्यापूर्वी एखाचं मॅट फाऊंडेशन लावावं. ज्यामुळे तुमची त्वचा एकसमान टोनची दिसेल. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर त्वचेवर क्रिम बेस आणि तेलकट असेल तर पावडरबेस  अथवा जेल बेस ब्लशरची निवड करा. 

Beauty

K.Play Flavoured Blush - Sweet Peach

INR 645 AT MyGlamm

चाळीसीमधल्या महिलांनी ब्लशर निवडताना वापरा या टिप्स -

सौंदर्याला वयाची बंधन नसतात. त्वचेची योग्य निगा आणि परफेक्ट मेकअप केला तर कोणत्याही वयात ग्लॅमरस दिसता येतं. त्यामुळे चाळीशीच्या पुढच्या महिलांनी थोडा सिंपल आणि क्लासि मेकअप करायला हवा. म्हणूनच या वयात शाइनी, मॅटालिक शेडच्या ब्लशरला बाय बाय करा. त्याऐवजी मॅट ब्लशने तुमचे गाल आणि हायपॉईंट हायलाईट करा. ब्लशरचा वापर करण्यापूर्वी योग्य फाऊंडेशन आणि कॉम्पॅक्ट लावा. ज्यामुळे तुमच्या फाईन लाईन्स आणि ओपन पोअर्स झाकले जातील. तुम्ही जर मिडियम स्किन टोन आणि  कुल अंडरटोनच्या असाल तर तुमच्यायावर रोझ शेड चांगली दिसेल, पण जर तुम्ही उजळ टोनच्या असाल तर तुम्हाला बदामी अथवा ब्राईट पिंक शेड निवडावी लागेल. शिवाय एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चाळीशीनंतर जास्त ब्रशर वापरू नका. कारण त्यामुळे तुमच्या एजिंगच्या खुणा जास्त उठून दिसतील. 

Beauty

K.Play Flavoured Blush - Frozen Raspberry

INR 645 AT MyGlamm

ब्लशर खरेदी करताना आणि वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी -

  • ब्लशरचा प्रकार आणि शेड तुमच्या वय आणि स्किन टोननुसार निवडा
  • ब्लशरची पॅच टेस्ट घ्या आणि ते ट्राय करून बघा
  • जर तुम्ही डार्क रंगाची लिपस्टिक निवडली असेल तर ब्लशर हलक्या रंगाचं घ्या
  • डार्क ब्लशरसोबत हेव्ही आय मेकअप करू नका
  • तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेसाठी पावडर अथवा जेल बेस्ड ब्लशर निवडा
  • कोरड्या त्वचेसाठी क्रिम बेस्ड ब्लशर निवडा

Beauty

POSE HD Blush Duo - Coral | Punch

INR 699 AT MyGlamm