ADVERTISEMENT
home / आरोग्य
Side effects of working from bed in marathi

बेडवर बसून करू नका लॅपटॉपवर काम, होईल नुकसान

कोरोनामुळे माणसाची जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी आजही अनेकजण घरातून काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम करत आहेत. काही जणांना आठवड्यातील काही दिवस ऑफिस तर काही दिवस घरातून काम करावे लागत आहे. त्यामुळे भारतातही सध्या वर्क फ्रॉम होम ही जीवनशैली रूजताना दिसत आहे. वर्क फ्रॉम होम कितीही सुरक्षित आणि सोयीचं असलं तरी त्याचेही अनेक दुष्परिणाम नक्कीच आहेत. घरातून काम करताना कंफर्ट झोनमध्ये जात अनेक जण चक्क बेडवर बसून अथवा झोपून काम करताना दिसतात. मात्र असं काम केल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे काही दुष्परिणाम नक्कीच होऊ शकतात.

पोश्चर बिघडतो

ऑफिसचे काम हे टेबल खुर्चीवर बसून करणं हा एक उत्तम मार्ग आहे. कारण त्यामुळे तुमची बसण्याची स्थिती अर्थात पोश्चर योग्य राहतो. पण जेव्हा तुम्ही बेडवर बसून काम करू लागता तेव्हा आरामदायक स्थितीत जात तुम्ही बेडवर कधी झोपता हे तुम्हाला कळतही नाही. ज्यामुळे तुमचा पोश्चर चुकीचा होतो. मान उशीवर आणि मांडीवर लॅपटॉप ठेवण्याच्या प्रयत्नात तुमच्या मान,पाठ आणि कंबरेवर चुकीचा ताण येतो. ज्यामुळे तुमची पाठदुखी, मानदुखी अखवा कंबर दुखी वाढू शकते. 

वजन वाढते 

आता तुम्हाला वाटेल की बेडवर बसून काम करण्याचा आणि वजन वाढण्याचा काय संबध? पण याचा तुमच्या वजनावर देखील विपरित परिणाम होऊ शकतो. कारण सतत बेडवर बसणे अथवा झोपण्यामुळे तुमच्या पाठीवर आणि मानेवर ताण येतो. ज्यामुळे तुम्ही झोपून काम करू लागता. याचा परिणाम तुमची शारीरिक हालचाल कमी होते. सतत असं काम करण्यामुळे तुमच्या कंबरेखालील भाग अचानक वाढू लागतो. यासाठी टेबल खुर्चीवर बसणं आणि काही तासांनी उठून शारीरिक हालचाल करणं शरीरासाठी खूप गरजेचं आहे. यासाठी वाचा वजन कमी करण्याचे उपाय जाणून घ्या | Weight Loss Tips In Marathi

कामाची गुणवत्ता कमी होते 

बेडवर बसून काम करण्यामुळे तुमच्या मनात सतत झोपेचे आराम करण्याचे विचार येतात. ज्याचा नकळत परिणाम तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर होतो. कारण बेडवर तुमच्या मेंदूला फक्त आराम करण्याचा संदेश दिला जातो. ज्यामुळे तुमचा मेंदू तल्लख राहून काम करू शकत नाही.बेडवर काम करण्यामुळे तुमच्या कामाला जास्त वेळ लागतो आणि हवा तसा परिणाम मिळत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या लॅपटॉप अथवा इतर डिव्हाइसचेही यामुळे नुकसान होते.सतत बेडवर ठेवल्यामुळे लॅपटॉपला थंडावा मिळत नाही आणि त्याची बॅटरी लवकर खराब होते. यासोबत जाणून घ्या Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे

ADVERTISEMENT
06 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT