ADVERTISEMENT
home / फॅशन
significance-and-importance-of-south-indian-mangalsutra-in-marathi

दाक्षिणात्य मंगळसूत्र असते एकदम वेगळे, काय आहे याचे वैशिष्ट्य

भारतामध्ये विशेषतः हिंदू विवाह पद्धतीत मंगळसूत्र आणि सिंदूर या गोष्टींचे अधिक महत्त्व आहे. मंगळसूत्राचे विविध डिझाईन्स करण्यात येतात. तर वेगवेगळ्या राज्यात मंगळसूत्राच्या वेगळ्या डिझाईन्सचे महत्त्व आहे. याशिवाय मंगळसूत्राची निवड कशी करायची हेदेखील महत्त्वाचे आहे. आजकाल तर मंगळसूत्र हातात घालण्याचीही फॅशन आली आहे, ज्याला ब्रेसलेट मंगळसूत्र असे म्हटले जाते. महाराष्ट्रीयन मंगळसूत्रांच्या डिझाईन्सप्रमाणेच दाक्षिणात्य मंगळसूत्र हे वेगळे असतात. याचे वैशिष्ट्यही वेगळे आहे. याबाबत अधिक माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. दाक्षिणात्य मंगळसूत्राच्या (South Indian Mangalsutra) बाबतीत काही रोचक तथ्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

दाक्षिणात्य मंगळसूत्राला काय म्हणतात?

वेगवेगळ्या राज्या मंगळसूत्राला वेगवेगळ्या नावाने ओळखण्यात येते. दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये मंगळसूत्राला थाली, बुट्टू, मिन्नु इत्यादी नावाने ओळखण्यात येते. 

दक्षिणात्य मंगळसूत्राचे महत्त्व (Importance of South Indian Mangalsutra)

  • तामिळनाडूमध्ये मंगळसूत्राला थाली असे म्हटले जाते आणि वेगवेगळ्या आकारात येते. वेगवेगळ्या आकारातील या मंगळसूत्राचे महत्त्वही वेगवेगळे आहे. मुलगा आणि मुलीच्या जाती आणि पोटजातीनुसार हे मंगळसूत्र निवडण्यात येते
  • सोन्याची चैन अथवा मांजा कायरू (पिवळा धागा) यासह थाली मंगळसूत्र घातले जाते. या मंगळसूत्रात जे पेंडंट असते, त्यामध्ये देवी मीनाक्षी, सुंदरेश्वर देव, तुळशीचे रोपटे आणि शिवशंकराची प्रतिमा बनविण्यात येते
  • तसंच या मंगळसूत्रामध्ये देवाच्या प्रतिमेसह सोन्याचे नाणे, कोरल, बुट्टू इत्यादीदेखील गुंफले जाते 
  • थाली मंगळसूत्र 4 पासून 8 ग्रॅम इतके असून 22 अथवा 18 कॅरट सोन्यात बनविण्यात येते. इतकंच नाही तर या मंगळसूत्रात हळदीच्या गाठीचाही उपयोग करण्यात येतो. मंगळसूत्रासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीवर याचा प्रयोग करण्यात येतो
  • हे मंगळसूत्र मुलाच्या घरातून मुलीसाठी आणण्यात येते
  • तर तामिळ लग्नामध्ये एक वेगळी रीत असते. मंगळसूत्र गळ्यात बांधताना त्यामध्ये 3 गाठ बांधण्यात येतात
  • लग्नानंतर काही दिवसांनी मंगळसूत्रातील पिवळा दोरा काढून नल्लपुसलु अर्थात मंगळसूत्राच्या चैनमध्ये याचा बदल करण्यात येतो आणि दोऱ्याऐवजी सोन्याची चैन घालण्यात येते 
  • मंगळसूत्रामध्ये असलेले पेंडंट हे वेगवेगळ्या गोष्टी दर्शविते. भगवान शिवाचे लिंग हे फर्टिलिटीचे प्रतीक असून तुळशीचे रोपटे हे शुद्धतेचे प्रतीक मानण्यात येते 

दाक्षिणात्य मंगळसूत्राचे डिझाईन (South Indian Mangalsutra Design)

महाराष्ट्रीयन मंगळसूत्राप्रमाणे दाक्षिणात्य मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांचा उपयोग केला जात नाही. पूर्ण मंगळसूत्र हे सोन्याच्या चैनमध्ये अथवा पेंडंटमध्ये बनविण्यात येते. याच्या डिझाईनबाबत सांगायचे झाले तर, हे टेंपल ज्वेलरीप्रमाणे दिसते. यामध्ये अनेक वेगवेगळ्या चैन डिझाईन्स बाजारात तुम्हाला मिळतील, ज्यामध्ये थाली लावून घेण्यात येते. थाली अर्थात पेंडंटचे वेगवेगळे डिझाईन्स ज्वेलर्सकडून बनविण्यात येतात. तुम्ही तुमच्या आवडीने कस्टमाईजही करून घेऊ शकता. केवळ दाक्षिणात्य महिलाच नाही तर उत्तर भारतीय महिलांमध्येही मंगळसूत्राचे महत्त्व आहे आणि तुम्हाला जर टेम्पल ज्वेलरी स्टाईलचे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही मंगळसूत्रात पेंडंटच्या ऐवजी साऊन इंडियन थाली लावून घेऊ शकता. एकंदरीतच भारतीय महिलांमध्ये मंगळसूत्राला अधिक महत्त्व देण्यात येते. 

08 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT