Advertisement

Jewellery

मराठमोळ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स खास तुमच्यासाठी (Mahashtrian Mangalsutra Designs)

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jun 28, 2019
मराठमोळ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स खास तुमच्यासाठी (Mahashtrian Mangalsutra Designs)

Advertisement

लग्नाचा सीझन सुरु झाला की, खरेदीचा वेग वाढतो. जर लग्न मुलीचे असेल तर मग अगदी साग्रसंगीत शॉपिंग केले जाते. नवरीसाठी तिच्या कपड्यांसोबतच महत्वाचे असते ते म्हणजे तिचे मंगळसूत्र.. मंगळसूत्राची डिझाईन युनिक असावी असे प्रत्येक नवरीला वाटते. मग काय इंटरनेटवरुन किंवा वेगवेगळ्या ज्वेलर्सच्या दुकांनाना भेट देऊन मगळसूत्रांच्या डिझाईन्स शोधल्या जातात. तुमचेही लग्न लवकरच होणार आहे किंवा तुम्हाला तुमच्या जुन्या मंगळसूत्राची जुनी डिझाईन बदलावीशी वाटत असेल तर आम्ही मंगळसुत्राच्या काही नव्या डिझाईन्स तुमच्यासाठी शोधून काढल्या आहेत.

विवाहित स्त्रीच्या आयुष्यात मंगळसूत्राचे महत्व (Importance Of Mangalsutra For Married Women)

Instagram

हिंदू धर्मामध्ये मंगळसूत्र घालण्याची पद्धत आहे. ते सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे मंगळसूत्र घातले जाते असे म्हणतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील कलह दूर करण्याची ताकद मंगळसूत्रामध्ये असते असे म्हटले जाते.  मंगळसूत्र घालण्याचे काही अन्य महत्व देखील सांगितले जातात. पण ती आताच्या काळातील महिलांना अजिबात पटणार नाही. कारण या गोष्टी अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या अशाच वाटतात. पण असे म्हणतात की, मंगळसूत्रातील काळे मणी हे तुमचे रक्षण नकारात्मक उर्जेपासून तुमचे संरक्षण करते. म्हणून ते परिधान करावे. पण लग्नानंतर का? असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही एका नव्या आयुष्याची सुरुवात करत असता म्हणून तसे करतात असे सांगितले जाते. मंगळसूत्राचे महत्त्व हे केवळ कोणीतरी सांगितले म्हणून तुम्हाला पटत नसतील. पण तुम्हाला मंगळसूत्राच्या वेगळ्या डीझाईन्स जाणून घ्यायच्या असतील तर नक्की वाचा

मालिकांमुळे प्रसिद्ध झाल्या मंगळसूत्राच्या या डीझाईन्स

महाराष्ट्रीय मंगळसूत्राचे काही प्रकार (Types Of Maharashtrian Mangalsutra)

दागिन्यांचे अनेक प्रकार आपल्याला माहीत आहे. मंगळसूत्राच्या बाबतीत सांगायचे तर मंगळसूत्रामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागातील लोकांचे मंगळसूत्र आणि त्याची डिझाईन बदलते. आम्ही काही टिपिकल आणि वेगवेगळ्या ठिकाणानुसार मंगळसूत्राचे काही प्रकार निवडले आहेत. ते खालीलप्रमाणे

1. वाटी मंगळसूत्र (Vati Mangalsutra)

Instagram

वाटी मंगळसूत्राची ही डिझाईन अगदी कॉमन आहे.वाट्यांचे मंगळसूत्र हे अनेक स्त्रियांकडे असेल. यामध्ये सिंगल वाटी आणि डबल वाटी असा प्रकार असतो. वाटीच्या डिझाईन्समध्ये व्हरायटी आणली जाते. कोणत्याही महाराष्ट्रीय महिलेकडे वाटी असलेले मंगळसूत्र असणारच. आता वाटीमधील व्हरायटी सांगायची झाली तर वाटीमध्ये शिंपल्यांता आकार, फुलाचा आकार किंवा त्याच्या टेक्चरमध्ये बदल करण्यात येतो

2.कोल्हापुरी मंगळसूत्र (Kolhapuri Mangalsutra)

Instagram

कोल्हापुरी मंगळसूत्र नावाने प्रसिद्ध असलेले हे मंगळसूत्र थोडे वेगळे असते. या मंगळसूत्राचे विशेष सांगायचे झाले तर कोल्हापुरी साजचे पेंडट या मंगळसूत्राला असते. गळ्याभोवती प्लेन काळ्या मण्यांची सर असते. आता या सरीची संख्यासुद्धा बदलते. म्हणजे अगदी दोन सरींपासून ते सहा सरींपर्यंत हे मंगळसूत्र जाते.  आता टिपिकल कोल्हापुरी मंगळसूत्र बदलता यातही वेगवेगळी व्हरायटी पाहायला मिळते. 

नथीचा बदलता ट्रेंड तुम्हाला नक्की आवडेल, पाहा फोटो

3.चेन मंगळसूत्र (Chain Mangalsutra)

Instagram

चेन मंगळसूत्र हा कोणत्याही भागाशी निगडीत नाही. तर हा डीझाईनमधील एक प्रकार आहे. काळ्या मण्या जास्त दिसू नयेत म्हणून मंगळसूत्राच्या सरीमध्ये सोन्याचे मणी घातले जातात. त्यालाच थोडेसे ट्विस्ट करुन त्यामध्ये चेन घातली जाते. त्यामुळे हे मंगळसूत्र थोडे वेगळे दिसते.

4. पेशवाई मंगळसूत्र (Peshwai Mangalsutra)

Instagram

थोडासा आणखी एक वेगळा प्रकार पेशवाई मंगळसूत्रनावाने मिळतो. कोल्हापुरी साजेसारखाच हा प्रकार तुम्हाला वाटेल. पण जर तुम्ही नीट पाहिले तर हा प्रकार थोडासा तन्मणीसारखा दिसणारा आहे. तन्मणीचे थोडे लांब पेंडंट यामध्ये असते. कोल्हापुरी साजेप्रमाणेच याला काळ्या मण्यांची सर असते. यातही वेगवेगळे प्रकार असतात. तन्मणीच्या पेंडटप्रमाणे यामध्येही काही बदल होतात. 

5.बोल्ड चेन मंगळसूत्र (Bold Chain Mangalsutra)

Instagram

मंगळसूत्राचा हा प्रकार अगदी घसघशीत दिसतो. जाड चेन असल्यामुळे हे मंगळसूत्र फार मोठे पण ठसठशीत दिसते. अनेकदा घरगुती कार्यक्रमांमध्ये जर इतर कोणतेही दागिने घालायचे नसतील अशावेळी हे बोल्ड चेन मंगळसूत्र चांगले दिसू शकते.

6.सहा पदरी मंगळसूत्र (Six Layer Mangalsutra)

Instagram

सहा पदरी मंगळसूत्र हे बोल्ड चेन मंगळसूत्रापेक्षा अधिक मोठे दिसते. आग्री आणि कोळी लोकांमध्ये अशा प्रकारचे मोठे मंगळसूत्र घालण्याची पद्धत आहे. आग्री कोळी पद्धतींच्या लग्नांमध्ये नववधूच्या गळ्यात तुम्हाला अशा प्रकारची मंगळसूत्र दिसू शकतात.

लांब मंगळसूत्राच्या डीझाईन्स (Long Mangalsutra Designs)

आता मंगळसूत्रांचे काही प्रकार आपण पाहिलेत. आता जर तुम्हाला काही लांब मंगळसूत्र हवी असतील तर तुम्ही वरील प्रकारांव्यतिरिक्त किंवा त्यामध्येच थोडा ट्विस्ट देऊन काही खास मंगळसूत्रांच्या डिझाईन्स तयार केल्या जातात. अशाच काही 10 वेगवेगळ्या डिझाईन्स आपण आधी पाहूयात

Instagram

लांब मंगळसूत्राची ही थोडी वेगळी डिझाईन आहे. सोन्याच्या गोल मण्याऐंवजी यामध्ये मोती गुंफण्यात आले आहे. दोन दोन मोती थोड्या थोड्या अंतराने गुंफण्यात आले असून याचे पेंडटदेखील वेगळे आहे. या पेंडट आकारही वेगळा आहे. तुम्हाला अगदी फॅन्सी पेंडट किंवा अगदी टीपिकल पेंडट नको असेल तर तुम्ही अशी मंगळसूत्राची डिझाईनदेखील निवडू शकता. हे मंगळसूत्र कोणत्याही ट्रेडिशनलवेअरवर चांगले दिसू शकते. लग्नसमारंभ किंवा एखाद्या पार्टीमध्ये जर तुम्ही छान साडी नेसणार असाल तर हे मंगळसूत्र तुमच्या साडीची शोभा नक्कीच वाढवेल.

Instagram

जर तुम्हाला रोजचे टीपिकल पेंडट नको असेल तर तुम्ही या प्रकारातील मंगळसूत्रही निवडू शकता. सिंगल सरीचं हे मंगळसूत्र असून याचे पेंडट वेगळे आहे कारण याच्या पेंडटला कॉईन/थाळी/सिक्का या स्वरुपातील पेंडट आहेत. काळ्यामण्यांमध्ये सोन्याचे लहान लहान मणी गुंफण्यात आलेले आहेत. तीन कॉईनची अरेंजमेंट करुन याला तन्मणीप्रमाणे डिझाईन करण्यात आले आहे. आता या ठिकाणी पाचूचा वापर केला आहे. पण तुम्ही पोवळं किंवा अन्य आर्टिफिशिअल स्टोनदेखील वापरु शकता.

Instagram

वरील मंगळसूत्र हे वाटी प्रकारातील मंगळसूत्र आहे. पण तुम्ही पाहू शकता. तीन सरींच्या या मंगळसूत्राच्या वाट्या अगदी लहान आणि नाजूक आहे. सरीला थोडासा चांगला लुक देण्यासाठी काही ठिकाणी सोन्याचे चपटे मणी तीन-तीनच्या गटात तर काही ठिकाणी मोठा सोन्याचा गोल मणी गुंफण्यात आला आहे. आता हे मंगळसूत्र तुम्हाला अगदीच टिपिकल वाटू शकते. पण कोणत्याही मराठमोळया सणांना हे मंगळसूत्र नक्कीच चांगले दिसेल.

Instagram

मंगळसूत्राची ही डिझाईन हमखास अनेकांना आवडली असेल.कारण ज्यांना मंगळसूत्रामध्ये फार सोनं नको असतो. त्यांना हा असा प्रकार नक्कीच आवडू शकतो. अमेरिकन डायमंडचा उपयोग करुन तयार केलेलं मोराचं हे सुंदर पेंडट मंगळसूत्राला एक वेगळाच ग्लॅम देत आहे. मोराचा पिसारा हा अमेरिकन डायमंडनी सजवण्यात आला आहे. अशा मंगळसूत्रांना लहान काळे मण्यांची एक किंवा दोन सर चांगली दिसते. जर तुम्हाला लांब फॅन्सी मंगळसूत्र घालायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र निवडू शकता. तुमच्या ट्रेडिशन कपड्यांपासून ते अगदी गाऊन्सपर्यंत सगळ्यांवर हे मंगळसूत्र चांगले दिसते. शिवाय जर तुम्ही असेच कानातले करुन घेतले तर चांगला सेट तयार होऊ शकतो. कारण अनेकदा ही पेंडट काढता येतात.

Instagram

हल्ली अनेक महिलांना आपले पतीचे नाव गळ्यात घालायला आवडते. त्यामुळे नवऱ्याचे नाव किंवा वर-वधू दोघांची नाव असलेले मंगळसूत्र हल्ली बाजारात मिळते. अनेकदा पेंडट फार मोठे होऊ नये म्हणून केवळ आद्याक्षरांचा वापर केला जातो. इंग्रजीमध्ये ही आद्याक्षर असतात. आद्याक्षरांना जोडण्यासाठी मध्ये एखादे हार्ट शेप किंवा खडा लावला जातो. त्यामुळे आद्याक्षरे ठळक दिसतात.

Instagram

साऊथ इंडियन लोकांमध्ये हा प्रकार सर्रास घातला जातो. या मंगळसूत्राचे वैशिष्ट म्हणजे लक्ष्मी पेंडट असते.एक किंवा दोन लक्ष्मी पेंडट यामध्ये असते. एक किंवा दोन सर या मंगळसूत्राला असते. जर दोन सरीचे मंगळसूत्र असेल तर त्याच्या प्रत्येक सरीमध्ये काही काही अंतराने सोन्याचे मणी गुंफलेले असते. लक्ष्मी पेंडटमध्येही अनेक ठिकाणी विविधता पाहायला मिळते. अशा प्रकारचे मंगळसूत्र साड्यांवर चांगले दिसते. 

Instagram

जर तुम्हाला पेंडंटऐवजी काही वेगळे हवे असेल तर तुम्ही हा पर्यायदेखील निवडू शकता. तुम्ही ही डिझाईन नीट पाहिली तर तुम्हाला या मंगळसूत्राच्या ठिकाणी दोन सरी दिसतील. एक लहान आणि एक मोठी आता थोडं फार हे तीन सरींच्या मंगळसूत्राजवळ आहे. पेंडट येथील दोन सरींमध्ये चेन असून यात मोती आणि अमेरिकन डायमंड यांची अरेंजमेंट केलेली असते.

वाचा – पारंपरिक कोल्हापुरी साजच्या (Kolhapuri Saaj) या डिझाईन्सने खुलवा तुमचे सौंदर्य

Instagram

जर तुम्हाला काही हेवी आणि ठसठशीत ठुशीप्रमाणे काही घालायचे असेल तर ही डिझाईन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कारण यामध्ये तुम्हाला काळ्यामण्यांच्या अधिक सरी आहेत. हे एकच मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्हाला अजून काहीही घालण्याची आवश्यकता वाटणार नाही. याचे पेंडंट सूर्यासारखे असून तुम्हाला यामध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात. 

Instagram

जर तुम्हाला वाटी किंवा अन्य काही पेंडंट नको असेल तर तुम्ही असेही सोन्याचे मंगळसूत्र करुन घेऊ शकता. नॉर्थ इंडियन लोकांमध्ये अशाप्रकारचे फॅन्सी पेंडंट अधिक करुन वापरले जाते. या मंगळसूत्राची डिझाईन तुम्ही नीट पाहाल तर यामध्ये काळ्या मण्यांचे काम अधिक आहे. पण ते काळे मणी अधिक वाटू नये म्हणून मध्येमध्ये व्हाईट गोल्ड आणि सोन्याचे मणी काही काही अंतराने गुंफण्यात आले आहे. पाहायला गेले तर हे मंगळसूत्र साधेही वाटते आणि भरगच्चसुद्धा

Instagram

टेंपल डिझाईन प्रकारातील हे मंगळसूत्र असून तुम्हाला त्याच्या डिझाईनवरुनच कळाले असेल की हे किती हेवी आहे. मंगळसूत्राला वाट्या असल्या तरी त्याला फॅन्सी लुक देण्यात आला आहे.  मंगळसूत्राची सर साधी न ठेवता चांगलीच जाडजूड करण्यात आली आहे . त्यामुळे अशी मंगळसूत्र तुम्ही घातल्यानंतर तुम्हाला दुसरे काहीही घालण्याची गरज नाही. 

लहान मंगळसुत्राच्या डीझाईन्स (Short Mangalsutra Designs)

लांब मंगळसूत्र रोज वापरता येतात असे नाही. कारण कित्येक नोकरदार महिलांना प्रवास करुन कामाच्या ठिकाणी जावे लागते अशावेळी इतकी मोठी मंगळसूत्र त्रासदायक ठरतात.अशावेळी गळ्यालगत असलेली लहान मंगळसूत्र अनेक जण घालतात किंवा अशा लहान मंगळसूत्राला पसंती दिली जाते. नववधूला देखील माहेराहून लहान मंगळसूत्र दिले जाते.हे लहान मंगळसूत्र अगदी कोणत्याही कपड्यावर चांगले दिसू शकते. नाजूक असलेला हा मंगळसूत्राचा प्रकारही आता टिपिकल राहिला नाही. तर .यातही बरीच व्हरायटी आली आहे. 

Instagram

तसं पाहायला गेलं तर हे मंगळसूत्र आहे असे पटकन लक्षात येणार नाही. कारण या मध्ये फारच कमी काळे मणी आहेत. हे मंगळसूत्र फॅन्सी पण घातल्यानंतर तितकेच छान दिसते. कोणत्याही वेस्टर्न वेअरवर हे चांगले दिसू शकते. जर तुम्हाला पेंडंटच्या ठिकाणी असलेली साखळी नको असेल तर तुम्ही तशी न ठेवता ही करु शकता. 

Instagram

ऑफिसगोईंगसाठी मंगळसूत्राचा हा प्रकार एकदम छान आहे. एक काळ्या मण्याची सर आणि त्याच्या बॉटमला सोन्याच्या पानांची ही अरेंजमेंट फारच सुंदर आणि मोहक दिसते. हे मंगळसूत्र जरी साधे वाटत असले तरी ते तुम्हाला एकदम वेगळा लुक देईल. त्यामुळे जर तुम्ही ऑफिसगोईंग असाल तर असे मंगळसूत्र तुम्ही हमखास घ्यायला हवे. टीशर्ट किंवा अन्य कोणत्याही वेअरवर हे मंगळसूत्र चांगले दिसू शकते.

Instagram

पानाच्या डिझाईनचे मंगळसूत्र तुम्हाला आवडले असेल तर तुम्हाला हे मंगळसूत्र नक्कीच आवडणारच. फरक इतकाच की या मंगळसूत्राच्या डिझाईनमध्ये बॉटमला आणि सरीमध्ये पानांची अरेंजमेंट केलेली आहे. मध्येमध्ये मणी सोन्याचे मणी गुंफण्यात आले आहे. हे मंगळसूत्र तुम्हाला अगदी 1 ग्रॅममध्येही करता येऊ शकते. यातही तुम्हाला तुमच्या डोक्याने व्हरायटी आणता येईल. 

Instagram

तुम्हाला काळे मणी आवडत असतील पण सोबत जर तुम्हाला अमेरिकन डायमंड आणि हार्ट शेप्ड पेंडंट असे काही हवे असेल तर या मंगळसूत्राची ही नाजूकशी डिझाईन एकदम छान आहे. तुम्हाला हे मंगळसूत्र घातल्यासारखेही वाटणार नाही. यामध्ये तुम्हाला सिंगल हार्ट असलेले पेंडंट देखील मिळू शकतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात बदल करु शकता पण हा प्रकार फारच छान दिसतो.

Instagram

जर तुम्हाला मंगळसूत्रात असलेले भरपूर काळे मणी आवडत असतील.शिवाय तुम्हाला गोफ डिझाईन आवडत असेल तर ही मंगळसूत्राची डिझाईनदेखील तुम्ही करु शकता. या मंगळसूत्रात गोलाकार मणी ओवललेले आहेत. काळे आणि सोन्याचे मणी असून पेंडट म्हणून एक मोठा मणी गुंफण्यात आला आहे. पेंडंटच्या मणी खाली साखळी ठेवण्यात आली आहे त्यामुळे याला चांगला फॉल मिळतो आणि मंगळसूत्र चांगले दिसते. 

कॉटन आणि हँडलूमच्या या ब्लाऊज डिझाईन्स देऊ शकतात तुमच्या साडीला सुंदर लुक

Instagram

लहान मंगळसूत्रातील हा एक आणखी फॅन्सी प्रकार आहे. हे मंगळसूत्र तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला दिसेल की, यामध्ये चेन अशा पद्धतीने गुंफण्यात आली आहे की, त्याच्या पेंडटचा आकार सुंदर दिसत आहे. काळे मणी, अमेरिकन डायमंड, गोल्डन मणी असे सगळे या पेंडंटमध्ये दिसत आहे. हे मंगळसूत्र तुम्ही रोजही घालू शकता.

Instagram

जर तुम्हाला वाटी असलेले मंगळसूत्र हवे असेल तर मंगळसूत्रामधील हा प्रकार एकदम बेस्ट आहे. चेन प्रकारामध्ये असलेले हे मंगळसूत्र  असून यामध्ये मध्येच काळे मणी गुंफलेले आहेत. पेंडट सोन्याची वाटी असून हा प्रकार घातल्यानंतर तुम्ही चेन घातली आहे असेच वाटले. जर तुम्हाला सोनं आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करु शकता.

Instagram

जर तुम्हाला मोठ्या मंगळसूत्राची मिनिएचर कॉपी बनवायची असेल तर तुमच्यासाठी ही डिझाईन एकदम छान आहे. वाटी. काळे मणी आणि चेन अशी ही डिझाईन आहे. लांब मंगळसूत्रामध्ये असे प्रकार अगदी सर्रास मिळतात. त्यापैकीच हा एक प्रकार आहे जो अगदी छान दिसतो. 

Instagram

जर तुम्हाला वाटी किंवा पेंडट यापैकी काहीच नको असेल तर ही डिझाईन एकदा पाहा कारण ही डिझाईन तुम्ही अगदी एखादा साधा पण वेगळा दागिना घातल्यासारखी वाटू शकते. या डिझाईनमध्ये काळे मणी, सोनेरी मणी आणि चेन यांची योग्य गुंफण करण्यात आली आहे. 

Instagram

वरच्या प्रकाराला थोडासा साम्य असा हा प्रकार आहे. कारण याला वेगळे पेंडट असे नाही. तर तुम्हाला पेंडट ऐवजी काही रंगीबेरंगी मोती दिसत आहेत. त्यांना सोन्यामध्ये गुंफण्यात आहे. मानेभोवती काळ्यामण्यांची सर आहे. तर त्यापुढे तुम्हाला साखळी दिसून येईल. 

FAQ

मंगळसुत्राची डीझाईन कशी निवडायला हवी (How to select mangalsutra designs ?) 

दर दोन आठवड्यांना मंगळसुत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन्स बाजारात येतात. हल्ली तर मालिकांनुसार मंगळसूत्राचे वेगवेगळे ट्रेंड बाजारात दिसू लागले आहेत. पण तुमच्यासाठी योग्य मंगळसूत्र कोणते याची निवड करताना तुम्हाला तुमची पर्सनलिटी  तुमचे प्रोफेशन या सगळ्याचा विचार करुन तुम्ही तुमच्या रोज घालणाऱ्या मंगळसूत्राच्या डिझाईन्सची निवड करावी.

लांब मंगळसूत्र रोज घालता येऊ शकेल का?( Can i wear long mangalsutra daily ? )

जर तुम्हाला रोज घालणे शक्य असेल तर काहीच हरकत नाही. पण काम करणाऱ्या महिलांना सतत धावपळ करायची असते. या धावपळीत त्यांना हे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे रोज लांब मंगळसूत्र घालण्यापेक्षा लहान घालावे.

मंगळसुत्राची कोणती डिझाईन ऑफिससाठी योग्य आहे? (Which mangalsutra design is perfect for office?)

तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही नेहमी नाजूक मंगळसूत्र घालणे चांगले कारण काही ठिकाणी सौभाग्यलंकार दिसू नये असा घालण्यास सांगतात. अशावेळी तुम्ही एखादे फॅन्सी मंगळसूत्र निवडावे. ज्यात काळे मणी कमी असतील.

साड्यांवर किंवा एखाद्या ट्रेडिशनलवेअरवर कोणते मंगळसूत्र चांगले दिसेल ? (which mangalsutra design is perfect for traditional event)

एखाद्या सणाच्या प्रसंगी तुम्ही जर टिपिकल मंगळसूत्र घातले तर फारच चांगले दिसेल. साडी असेल तर तुम्ही पेशवाई, वाटी, कोल्हापुरी या प्रकारातील मंगळसूत्र अवश्य घालून पाहा