ADVERTISEMENT
home / आरोग्य
प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi)

प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi)

 

 

रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तर तुम्हाला सतत निरनिराळ्या आजारपणांना सतत तोंड द्यावं लागतं. अगदी अती ताणामुळेही तुमच्या शरीरात हॉर्मोनल बदल होऊन तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्तीच्या यंत्रणेबाबत योग्य माहिती असायला हवी. आम्ही दिलेल्या या लक्षणांवरून तुम्हाला तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे हे समजू शकते. सध्या कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला तुमचे आणि कुटुंबाचे या पद्धतीने रक्षण करणे सोपे जाईल. यासाठी जाणून घ्या ही लक्षणे

 

 

ADVERTISEMENT

तुम्हाला सतत पचनाच्या समस्या जाणवतात

 

काही संशोधनानुसार रोग प्रतिकार शक्तीचा आणि पोटाच्या समस्यांचा जवळचा सबंध आढळून आला आहे. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार पचनाच्या समस्या होत असतील तर तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखा. सतत पोटात दुखणं, अॅसिडिटीचा त्रास होणं, पोटात गॅस निर्माण होणं, बद्धकोष्ठता, जुलाब हे तुमच्या शरीरात प्रतिकार शक्ती कमी असण्याचं लक्षण आहे. जर अशी लक्षणं वारंवार आढळत असतील तर तुम्हाला इनफेक्शन, ऑटो इम्युन आजार अथवा गंभीर आजारपण होण्याची शक्यता असते. यासाठी यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार सुरू करा. 

तुम्हाला सतत पचनाच्या समस्या जाणवतात

Shutterstock

 

ADVERTISEMENT

 

जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल

 

वारंवार सर्दी, खोकला होणं हे प्रतिकारशक्ती कमी असल्याचं लक्षण आहे. कारण याचा अर्थ तुमचे शरीर बाहेरील जीवजंतूशी लढा देण्यासाठी सक्षम नाही. मात्र एकदा सर्दी- खोकला झाला तर लगेचच घाबरून जाऊ नका. कारण असं व्हायरल इनफेक्शन वर्षांतून एकदा कुणालाही होऊ शकतं. जर तुम्हाला दर आठ-दहा दिवसांनी  सर्दी खोकला होत असेल तर याबाबत वेळीच सावध व्हा आणि त्यावर योग्य उपचार करा.

जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल

Shutterstock

ADVERTISEMENT

 

 

तुम्ही नेहमी लगेच थकत असाल

 

तुम्हाला थकवा, अंगदुखी, अशक्तपणा जाणवण्याची अनेक कारणं असू शकतात. मात्र यामागचं एक महत्त्वाचं कारण तुमची प्रतिकार शक्ती कमी असणं हेही असू शकतं. रोग प्रतिकार शक्ती कमी असण्यामुळे तुमचे सांधे सतत दुखतात, वारंवार पोट बिघडतं अथवा भूक मंदावते. या लक्षणांवरून तुमच्या शरीराला प्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे हे ओळखा. कारण अशक्तपणा अंगावर काढणं तुम्हाला महागात पडू शकतं.

वाचा – Symptoms Of Tuberculosis In Marathi

ADVERTISEMENT

तुम्ही नेहमी लगेच थकत असाल

Shutterstock

 

 

ADVERTISEMENT

वर्षातून दोनपेक्षा जास्त वेळा तुम्हाला सायनस इनफेक्शन होत असेल

 

वर्षांतून दोनदा अथवा अधिक वेळा सायनसचा त्रास होणं हे एक गंभीर आजारपणाचं लक्षण आहे. यामागचं कारण तुमच्या शरीरात प्रतिकार शक्ती कमी असणं हेही असू शकतं. कारण शरीरात रोगांचा आणि विषाणूंचा सामना करणाऱ्या रोग प्रतिकारक पेशी कमी झाल्यास तुम्हाला सायनसचा त्रास जाणवू शकतो. यासाठी शरीरातील रोग प्रतिकारक पेशींच्या वाढीसाठी पुरेसे प्रयत्न करायला हवे. 

वर्षातून दोनपेक्षा जास्त वेळा तुम्हाला सायनस इनफेक्शन होत असेल

Shutterstock

 

ADVERTISEMENT

 

तुमच्या जखमा लवकर भरून येत नसतील

 

जखमा भरून काढण्यासाठी आपल्या शरीरात एक प्रकारची यंत्रणा  असते. ज्यामुळे योग्य उपचार केल्यावर शरीर स्वतःच या जखमा भरून काढते. मात्र जर तुमच्या साध्या कापणे, चिरणे, भाजणे अशा छोट्या-मोठ्या जखमा पटकन बऱ्या होत नसतील तर तुमच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्तीचा अभाव असू  शकतो. कारण शरीराला कोणतेही आजारपण, इनफेक्शन, जखम भरून काढण्यासाठी निरोगी प्रतिकार शक्ती असलेल्या पेशींची गरज असते. जेव्हा तुमची प्रतिकार शक्ती कमी होते तेव्हा तुम्हाला या समस्या प्रकर्षाने जाणवू लागतात. 

 

 

ADVERTISEMENT

तुम्ही खूप दिवस आजारी पडत असाल

 

साध्या सर्दी खोकल्यामुळेही तुम्ही दोन ते तीन दिवस बेडवरून उठू शकत नसाल अखवा तुम्हाला वांरवार आजारपण येत असेल तर वेळीच सावध व्हा. याला कारणीभूत तुमची कमजोर प्रतिकार शक्ती असू शकते. कारण असं असेल तर साध्या सर्दी खोकल्यामुळेही तुम्हाला अगदी थकल्यासारखं वाटू शकतं. जर तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तर पावसाळा, हिवाळा अशा पटकन इनफेक्शन होणाऱ्या काळात तुम्ही सावध राहायला हवं. शिवाय वेळीच उपचार करून स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवायला हवी. 

तुम्ही खूप दिवस आजारी पडत असाल

Shutterstock

 

ADVERTISEMENT

 

तुम्हाला वारंवार फंगल इनफेक्शन होत असेल

 

रोग प्रतिकार शक्ती कमी असण्याचं हे आणखी एक लक्षण आहे. शारीरिक क्रिया सुरळीत न झाल्याने तुम्हाला त्वचेचं इनफेक्शन अथवा फंगल इनफेक्शन होऊ शकतं. तुम्हाला वारंवार तोंड येणं, अंगावर फंगल इनफेक्शन होणं असे त्रास जाणवत असतील तर यावर उपाय जरूर करा. मात्र त्यासोबत तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्नदेखील करा. 

 

 

ADVERTISEMENT

तुम्हाला वर्षांतून चारपेक्षा जास्त वेळा कानाचे इनफेक्शन होत असेल

 

जर तुम्हाला दर दोन ते तीन महिन्यांनी अथवा वर्षातून चार ते सहा वेळा कानाचे इनफेक्शन होत असेल तर याबाबत वेळीच लक्ष द्या. कारण हेही तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती कमी असण्याचं एक लक्षण आहे. कारण रोग प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे तुम्ही असे वारंवार एखाद्या इनफेक्शनच्या बळी पडू शकता. 

तुम्हाला वर्षांतून चारपेक्षा जास्त वेळा कानाचे इनफेक्शन होत असेल

Shutterstock

 

ADVERTISEMENT

 

तुम्हाला सतत ताणतणाव जाणवत असेल

 

घरात अथवा ऑफिसमध्ये ताणतणाव असेल तर याचा परिणाम तुमच्या मनावर आणि शरीरावर दिसून येतो. काही संशोधनानुसार दीर्घ काळ ताण, नैराश्यात असणाऱ्या लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. कारण ताणतणावामुळे तुमच्या शरीरात हॉर्मोनल बदल होतात, त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशींवर याचा चुकीचा परिणाम होतो. या पेशी तुमच्या शरीराचे इनफेक्शन आणि आजारापासून रक्षण करत असतात.

तुम्हाला सतत ताणतणाव जाणवत असेल

Shutterstock

ADVERTISEMENT

 

 

जर तुम्हाला वारंवार डोळ्यांचे इनफेक्शन होत असेल

 

जेव्हा तुम्हाला ऑटो इम्युन आजारांचा सामना करावा लागतो. तेव्हा तुमच्या शरीरातील विविध अवयवांवर याचा चुकीचा परिणाम दिसू लागतो. कान, नाक याप्रमाणेच डोळयांचेही इनफेक्शन यामुळे सतत जाणवते. यामुळे डोळे कोरडे होतात, धुरकट दिसू लागते. जर तुम्हाला अंधुक दिसत असेल. डोळे लाल होत असतील अथवा डोळ्यांमध्ये सतत जळजळ जाणवत असेल तर तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याची तुम्हाला गरज आहे. 

 

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पोषक आणि संतुलित आहार घ्या, पुरेसा आराम करा, पोटाचे आरोग्य चांगलं राहील याची काळजी घ्या, ताणतणावापासून शक्य तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य निदान आणि उपचार घ्या. कारण रोग प्रतिकार शक्ती ही तुमच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्याची किल्ली आहे. त्यामुळे तुम्ही याबाबत वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. 

ADVERTISEMENT

 

 

रोग प्रतिकार शक्ती कमी असण्याबाबत मनात असलेले प्रश्न – Faqs

1. प्रतिकार शक्ती तपासण्यासाठी काय करावे ?

वर दिलेली लक्षणे आढळल्यास तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखा. त्याचप्रमाणे डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. ज्यामुळे तुम्हाला ऑटो इम्युन आजार आहे का नाही ते निदान करणं सोपं जाईल. यासाठी डॉक्टर तुमच्या काही ब्लड टेस्ट करतात. ज्यामुळे याचे निदान करणं सोपं जाईल.

ADVERTISEMENT

2. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?

पोषक आणि संतुलित आहार, पुरेशी झोप , ताणतणावापासून दूर राहणे, व्यायाम आणि मेडिटेशन यामुळे तुम्हाला तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवणे सोपे जाईल.

3. कोणत्या वयातील लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते ?

लहान मुले, वयोवृद्ध मंडळी यांना कमी प्रतिकार शक्ती मुळे आजारपणाला तोंड द्यावे लागू शकते. सात वर्षांच्या खालील मुले आणि साठ वर्षांच्या वरील माणसांची यासाठी योग्य काळजी घ्यावी. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा रेसिपी (Immunity Boosting Kadha Recipe In Marathi)

ही योगासने करुन वाढवा प्रतिकारशक्ती (Yoga To Improve Immune System In Marathi )

ADVERTISEMENT

प्रतिकारशक्ती वाढवता येईल ओरेगॅनोने, जाणून घ्या अधिक फायदे -Benefits Of Oregano In Marathi

07 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT