ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
smart and simple ways to save more money

अचानक वाढलेल्या खर्चामुळे झाला असाल हैराण, या सोप्या टिप्सने करा बचत

सणासुदीचे दिवस जवळ आले अथवा घरात एखादं मंगलकार्य ठरलं की नकळत घरखर्चामध्ये वाढ होते. बऱ्याचदा वाढत्या महागाईचा परिणाम म्हणून महिन्याचा खर्च वाढतो आणि बचत कशी करावी असा प्रश्न निर्माण होतो. घर घेतलं, गाडी घेतली अथवा घरात एखादी नवीन वस्तू घेतली की त्याचा मेटेनन्स वाढल्यामुळे घरखर्चात वाढ होते. यात भर म्हणजे वीज बिल, पाण्याचे बिल, मुलांच्या शाळेचा खर्च यांची पडत असते. सर्व सामान्यांच्या घरी दोन पाहुणे जरी एक दोन दिवसांसाठी आले तरी त्यांच्या जमाखर्चाचे गणित बिघडू लागते. अशा वाढत्या खर्चामुळे हैराण झाला असाल आणि बचत कशी करावी असा प्रश्न सतावत असेल तर या सेव्हिंग टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकतात.

घर खर्च कमी करून बचत कशी करावी

बचत करणं खूप गरजेचं आहे आणि बचत करण्याचा सोपा मार्ग म्हणजे उत्पन्न वाढवणं आणि नेहमीचे खर्च आटोक्यात ठेवणं. यासाठी या टिप्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील.

  • महिन्याभराचा जमाखर्च काढताना अशा गोष्टींचा विचार करा ज्यातून तुम्ही बचत करू शकता. कधी घरात अशा गोष्टींसाठी नियमित खर्च केला जे कधीतरी वापरले जातात. टीव्हीचे सबस्क्रिप्शन, मोबाईलचा प्लॅन, न्यूजपेपर, नेट यांच्या प्लॅनमध्ये काही बदल करून तुम्ही पैसे वाचवू शकता. घरगुती खर्चासाठी महिन्याचे बजेट ठरवताना फॉलो करा या सोप्या टिप्स
  • शॉपिंगवर तुमचे पैसे जास्त खर्च होत असतील तर शॉपिंगला जाण्यापूर्वी गरजेच्या गोष्टींची यादी करत जा. ज्यामुळे मॉल अथवा दुकानात गेल्यावर तुमचा वायफळ खर्च नक्कीच वाचेल.
  • ऑनलाईन अथवा ऑफलाईन खरेदी करताना सेल, डिस्काउंट यावर लक्ष ठेवा. ज्यामुळे कमी पैशांमध्ये तुम्हाला चांगल्या ब्रॅंडेड वस्तू खरेदी करता येतील. श्रीमंत व्हायचं असेल तर टाळा ‘या’ 5 चुका, करा बचत
  • पैसे वाचवण्याचा उत्तम उपाय म्हणजे व्यसनांपासून दूर राहणे. कारण आजकाल बऱ्याच लोकांचे व्यसनावर पैसे खर्च होतात. मद्यपान, धुम्रपान टाळल्यास तुमचे भरपूर पैसे नक्कीच वाचू शकतील. 
  • सेव्हिंग अकाउंटमध्ये जास्त पैसे साठवून ठेवू नका. कारण बॅलन्स दिसला की तुमचे मन पैसे खर्च करण्याकडे वळतं. यासाठी पैसे फिक्स डिपॉजिट अथवा आर डीमध्ये ठेवा. 
  • पैसे साठवण्याचा आणि खर्च कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे लॉंग टर्म इनव्हेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवणे. ज्यामुळे दर महिन्याला इसीएसच्या माध्यमातून तुमच्या खात्यातून एक ठराविक रक्कम आपोआप बाजूला काढली जाईल ज्याचा तुम्हाला भविष्यात चांगला फायदा मिळेल.
  • तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होत असेल तर तुम्हाला उत्पन्न वाढवण्यासोबत खर्च कमी करण्याची खूप गरज आहे. यासाठी जमाखर्चाची यादी दर महिन्याला चेक करा. 

‘या’ सोप्या टिप्स वापरून करा बचत आणि व्हा श्रीमंत

29 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT