ADVERTISEMENT
home / Recipes
Solkadhi Recipe In Marathi

थंडगार सोलकढी बनवा घरीच, जाणून घ्या रेसिपी (Solkadhi Recipe In Marathi)

 

उन्हाची काहिली वाढली की, आहारात अनेक बदल होऊ लागतात. पोटाला जास्तीत जास्त थंडावा देणारे, पचनास मदत करणारे आणि शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करणारे असे पदार्थ आहारात आणले जातात. सोलकढी हा असाच एक पदार्थ आहे जो अनेक भागांमध्ये या दिवसात आणि वर्षाच्या बाराही महिने जिरवणी म्हणून प्यायला जातो. कोकमच्या आबंट आगळापासून सोलकढी बनवली जाते. सोलकढी बनवण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी असते. कोकणातील हा पदार्थ असला तरी प्रत्येक ठिकाणी त्याची बनवण्याची पद्धत ही थोड्याफार प्रमाणात वेगळी आहे. या सगळ्या रेसिपी एकत्र केल्यानंतर त्या तुमच्यासोबत शेअर करत आहोत. म्हणूनच जाणून घेऊया सोलकढी म्हणजे काय? सोल कढी रेसिपी मराठी (sol kadhi recipe in marathi) कशी केली जाते?आणि सोलकढीचे फायदे जाणून घेऊया. चला करुया सुरुवात

सोलकढी म्हणजे काय? (What Is Solkadhi? )

सोलकढी म्हणजे काय

Instagram

सोलकढी हे कोकणातील एक प्रसिद्ध पेय असून कोकणातील प्रत्येक घरामध्ये संपूर्ण जेवणाचा बेत केल्यानंतर जिरवणी म्हणून सोलकढी केली जाते. या शिवाय कोकणात कोकम सरबत फायदे जाणून तेही दिले जातेगुलाबी रंगाची दिसणारी ही सोलकढी कोकमाच्या आंबट आगळापासून तयार होते. नारळाचे दूध आणि कोकमाचा आबंट आगळ एकत्र करुन त्यामध्ये मीठ घालून एकत्र केली जाते. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हा रस थंड केला जातो आणि जिरवणी म्हणून तो जेवणाच्या शेवटी दिला जातो. कोकणात आजही चिकनचे किंवा मटणाचे जेवण केल्यानंतर सोलकढी करण्याची पद्धत आहे. व्हेज जेवणाचा बेत असेल उसळी किंवा असे काही जड पदार्थ असले तरी देखील सोलकढी केली जाते. त्यामुळे सोलकढी हा जिरवणीचा प्रकार आहे. पचनासोबतच सोलकढी अनेक कारणांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही अगदी आवर्जून सोलकढी रेसिपी (solkadhi recipe in marathi) आणि फायदे जाणून घ्यायला हवे. 

ADVERTISEMENT

सोलकढी रेसिपी मराठी (Solkadhi Recipe Marathi)

सोलकढी बनवण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाणारी सोलकढी रेसिपी (solkadhi recipe in marathi)

पाण्यातील सोलकढी (Waterbased Solkadhi)

पाण्यातील सोलकढी

Instagram

सोलकढी ही खूप जण पाण्यात देखील बनवतात. त्याला सोलकढी असे म्हणता येत नाही. पण तरीदेखील खूप ठिकाणी अशापद्धतीने बनवल्या जाणाऱ्या रसाला सोलकढी असे म्हणतात. जेवणानंतर ती जिरवणी म्हणून वाढली जाते.

ADVERTISEMENT

साहित्य:

कोकमाचा आगळ,पाणी कोथिंबीर, जीरं , बर्फ

कृती :

  • एका भांड्यात कोकमचा रस घेऊन त्याचा आबंटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये पाणी घाला. पण आबंटपणा आणि रंग जाणार याची खात्री करा.
  • त्यामध्ये आवश्यकतेनुसार आणि चवीनुसार मीठ आणि जीरेपूड घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थंड करण्यासाठी त्यामध्ये बर्फाचे काही खडे घाला.
  • छान जेवणानंतर हा पाण्यातला सोलकढीचा प्रकार सर्व्ह करा.

नारळाच्या दूधातील सोलकढी(Coconutmilk Solkadhi)

नारळाच्या दूधातील सोलकढी

Instagram

ADVERTISEMENT

खरी सोलकढी ही नारळाच्या दूधातच केली जाते हल्ली सोलकढी ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जात असली तरी कोकणात अत्यंत साध्यापणे आणि कमीत कमी साहित्यात केली जाते. जर तुम्हाला अशा पद्धतीची पारंपरिक नारळाच्या दूधातील सोलकढी करायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

साहित्य:

कोकमाचा आगळ, एका नारळाची चव, मिरची, लसणीच्या पाकळ्या, बारीक कोथिंबीर

कृती:

ADVERTISEMENT
  • नारळाची चव काढण्यासाठी मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये खवलेले खोबरे घेऊन ते पाणी घालून वाटा.
  • एखादा स्वच्छ रुमाल किंवा पातळ कपडा घेऊन मिक्सरमधील खोबऱ्याचे वाटप गाळून घ्या आणि नारळाचे दूध काढून घ्या.
  • एका भांड्यात नारळाचे दूध घेऊन त्यामध्ये चवीच्या अर्धा कोकमाचा आगळ घाला. मिरची आणि लसणीच्या पाकळ्या बारीक वाटून त्या चवीसाठी रसामध्ये घाला. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये जिऱ्याची पूड घालण्यास काहीच हरकत नाही. वरुन कोथिंबीर भुरभुरुन ही सोलकढी थंडगार सर्व्ह करा.

गोवन स्टाईल सोलकढी (Goanstyle Solkadhi)

गोवन स्टाईल सोलकढी

Instagram

गोव्यामध्येही सोलकढी केली जाते. ही सोलकढी पाण्यातल्या सोलकढीप्रमाणे केली जाते. फक्त यामध्ये साहित्य थोडे वेगळे असते. ही अशाप्रकारची सोलकढी गोव्यात स्टाटर्स म्हणूनही दिली जाते
.
साहित्य: 

कोकमचा आगळ, आलं-लसूण पेस्ट, मिरची, मीठ, साखर आणि कोथिंबीर

ADVERTISEMENT

कृती:

  • एका भांड्यात कोकमचा आगळ आणि उरलेले सगळे साहित्य चवीनुसार एकत्र करुन घ्या.
  • त्यामध्ये पाणी घालून त्याला थोडे पाणी घाला. म्हणजे तुम्हाला पातळशी अशी सोलकढी तयार करुन घ्या. ही सोलकढी थंड थंडगार दिली जाते.

घामोळ्यांवर करा सोपे घरगुती उपाय

जाणून घ्या सोलकढीचे फायदे (Benefits Of Solkadhi)

सोलकढी कशी करतात हे जाणून घेतल्यानंतर सोलकढीचे नेमके फायदे काय हे देखील जाणून घ्यायला हवे. सोलकढीच्या सेवनामुळे नेमके काय फायदे होतात ते जाणून घेऊया.

पचनशक्ती वाढवते (Improve Digestion)

पचनशक्ती वाढवते

ADVERTISEMENT

Instagram

कोकम पचनासाठी चांगले असते. कोकमामध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात तर नारळाच्या दूधामध्ये डाएटरी फायबर असतात. त्यामुळे कोकम आंबट असले तरी देखील ते पचनण्यासाठी मदत करते. एखादा चमचमीत असा आहार तुम्ही घेतला असेल तर तुम्ही त्या जेवणानंतर पचन पटकन होण्यासाठी सोलकढीचे सेवन केले जाते. विशेषत: चिकनसारखे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट जड होते.जर तुमची पचनशक्ती फार चांगली नसेल तर तुम्ही हमखास अन्न पचण्यासाठी कोकमपासून तयार झालेल्या सोलकढीची मदत होते. या शिवाय सोलकढीमध्ये अनेक पाचक गोष्टी घातल्या जातात की, त्यामुळे पचनाचे कार्य अधिक चांगले होते. शिवाय जंताची समस्या ही कमी होण्यास मदत मिळते.

वजन करण्यास करते मदत (Help To Lose Weight)

वजन करण्यास करते मदत

Instagram

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठीही सोलकढी मदत करते. शरीरावर आणि मनावर ताण असेल तरी देखील वजन वाढत राहते. अशावेळी तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि अरबटचरबट लागणारी भूक नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही सोलकढीचे सेवन करायला हवे. कोकम कढीमध्ये नारळाचे दूध असते. जे पोटभरीला मदत करते. पोटाच्या समस्या वाढल्या की, वजन वाढ होत राहते. जर तुम्हाला पोटाचे आरोग्य चांगले करायचे असेल तर सोलकढी प्या. सोलकढीमुळे पोट साफ राहते. योग्यवेळी भूकही लागते.

रॅशेश करते कमी (Fight Rashes)

खूप जणांना पित्ताचा त्रास असतो. पित्ताचा त्रास वाढला तर अनेकांना त्वचेवर लालचट्टे येतात. अशावेळी कोकमचा रस शरीरासाठी फार फायदेशीर ठरतो. कोकमच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील पित्त कमी होण्यास मदत मिळते. कोकमचा आबंट रस पिता येणे शक्य नसेल अशावेळी सोलकढी प्यायल्यामुळेही पित्त कमी होते आणि शरीरावर असणाऱ्या रॅशेश कमी होतात. त्यामुळे पित्ताचा सतत त्रास तुम्हाला होत असेल तर जेवणानंतर किमान गोवन पद्धतीची सोलकढी करुन प्या. तुमचा त्वचेवरील लालिमा येण्याचा त्रास कमी होईल. शरीरावर पित्त उठले असे वाटत असेल अशावेळी तुम्ही पटकन सोलकढी प्या.

ह्रदयासाठी चांगले (Good For Heart)

शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले तर त्याचा त्रास ह्रदयाला होऊ शकतो.नारळाच्या दूधामध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात. हे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे तुमचे ह्रदय चांगले राहते. याशिवाय तुमच्या शरीराला डाएबिटीस आणि इतर अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासास सोलकढी मदत करते. उत्तम आरोग्यासाठी तुम्ही सोलकढीचे सेवन वरचेवर करायला हवे.

शरीराला देते थंडावा (Cooling Agent)

कोकम हे आंबट असले तरी देखील शरीराला थंडावा देण्याचे काम ती करते. सोलकढी ही जरी जाड वाटत असली तरी देखील ती पचायला फारच हलकी आणि चवीला खूपच चविष्ट असते. सोलकढी प्यायल्यामुळे शरीराला पटकन थंडावा मिळतो. कोकममध्ये जखमा बरे करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे जर शरीराची जळजळ होत असेल तर तुमच्या शरीराला थंडावा देण्याचे काम सोलकढी करते. सोलकढी थंड करुन प्यायल्यामुळे हे थंडावा मिळतो असे नाही तर कोकम हे मुळात थंड असल्यामुळे ते थंडावा देण्याचे काम करते.

ADVERTISEMENT

असा घ्या सोलकढीचा आस्वाद (Solkadhi And Food Combination)

सोलकढी पिण्याचीही एक पद्धत आहे तुम्ही अगदी कधीही सोलकढी पिऊ शकत असला तरी देखील एका ठराविक जेवणाच्या कॉम्बिनेशनसोबत ही सोलकढी खूप चांगली लागते.

नॉन- व्हेज जेवण (Non Veg)

नॉन- व्हेज जेवण

Instagram

जर तुम्ही घरात चिकन किंवा असे काही पदार्थ केले असतील तर त्याच्यासोबत ही सोलकढी फारच सुंदर लागते. ज्याप्रमाणे जिरवणी म्हणून ताक पिण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे अगदी तसेच नॉन व्हेज जेवणासाठी सोलकढी हे ताक आहे.  माशांच्या जेवणावर शक्यतो सोलकढी केली जात नाही. पण जर तुम्हाला सोलकढी अशा जेवणांसाठी करायचे असेल तरी देखील तुम्ही सोलकढी करु शकता. 

ADVERTISEMENT

व्हेज जेवण (Veg)

व्हेज जेवण

Instagram

जर तुम्हाला रोज रोज डाळ किंवा वाटपाची आमटी खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही सोलकढीसोबत मस्त भात खाऊ शकता. सोलकढी आणि भात हे देखील एक चविष्ट कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे सोलकढी भात आणि एखादी उसळ अशा पद्धतीनेही तुम्ही सोलकढीचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही जर कधी अशा पद्धतीचे जेवण केले नसेल तर नक्कीच असे कॉम्बिनेशन खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल. याशिवाय जर तुम्ही व्हेजमध्ये खूप वेगवेगळे आणि चमचमीत पदार्थ केले असतील तर अशावेळीही तुम्हाला सोलकढी नक्कीच करता येईल. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. प्रेग्नंसीमध्ये सोलकढी पिणे चांगले असते का?

गरोदरपणात कोकमचे सेवन जास्त प्रमाणात करु नये असे सांगितले जाते. कारण त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानिशी तुम्ही सोलकढीचे सेवन करु शकता. पण गरोदर महिलांनी कोणत्याही गोष्टीचे सेवन करताना डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.

2. अॅसिडिटीसाठी सोलकढी चांगली असते का?

सोलकढी ही पचनासाठी फार चांगली असते. म्हणूनच जेवणानंतर सोलकढी पिण्याची पद्धत आहे. चिकनसारखा जड मेनू असेल तर त्यानंतर चिकन पचावे यासाठी जिरवणी म्हणून सोलकढी देते. ज्यांना अॅसिडीटीचा किंवा पचनाचा त्रास असेल तर तुम्ही जेवणानंतर एक ग्लासभर थंडगार सोलकढी पिण्यास काहीच हरकत नाही. सोलकढीमुळे अॅसिडीटीचा त्रास पटकन कमी होतो.

3. सोलकढी रात्री प्यायले तर चालेल का?

सोलकढी रात्रीच्या जेवणानंतर प्यायले तरी चालू शकेल. त्याचा फारसा त्रास होत नाही. पण शक्यतो ती जेवणावरच प्यायले तर उत्तम. म्हणजे जेवण पचण्यास मदत होईल

15 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT