ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
kadhi recipe in marathi

Kadhi Recipe In Marathi| बनवा स्वादिष्ट कढी रोजच्या जेवणात

महाराष्ट्रीयन जेवणात अनेक वेगवेगळे पदार्थ असतात. महाराष्ट्रीयन पदार्थांची चव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. यामध्ये कधी कधी जेवणात भात आणि कढी हे पदार्थ मनाला जो आनंद देतात तो कोणताच पदार्थ देऊ शकत नाहीत. महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये जर पटकन जेवण बनवायचे असेल तर कढी – भात हा उत्तम पर्याय आहे. आपल्याकडे पदार्थामध्ये भात आणि आमटी रेसिपी केली जातेच. तर साधारणतः अनेक घरांमध्ये ताकाची अथवा दह्याची कढी करण्यात येते. ताकाची फोडणीची कढी (Takachi Kadhi Recipe In Marathi) अथवा हळदीशिवाय फोडणी असणारी कढी ही पटकन तयार करता येते. अशाच कढीची रेसिपी (Kadhi Recipe In Marathi) आपण या लेखातून पाहणार आहोत. 

Takachi Kadhi Recipe In Marathi | ताकाची कढी

Takachi Kadhi Recipe In Marathi
Takachi Kadhi Recipe In Marathi – Instagram

उन्हाळा असो वा हिवाळा गरमागरम ताकाची कढी म्हणजे मनाला आणि पोटाला मिळणारा वेगळाच आनंद. ताकाच्या कढीमध्ये तुम्ही मुळा, अननस याचाही वापर करू शकता. पण पटकन बनणारी कढी आणि त्याचा गरमागरम घेता येणारा स्वाद यासारखं स्वर्गसुख नाही. ताकाची कढी कशी बनवायची याची सोपी पद्धत 

ताकाची कढी बनविण्यासाठी साहित्य 

 • अर्धा लिटर ताक
 • 2-3 चमचे बेसन
 • 3-4 हिरव्या मिरचीचे तुकडे
 • 7-8 कढीपत्याची पाने
 • अर्धा चमचा मोहरी
 • अर्धा चमचा जिरे
 • अर्धा चमचा हिंग
 • पाव चमचा हळद
 • कोथिंबीर
 • आल्याचे तुकडे 
 • ठेचलेली लसूण
 • तेल
 • थोडीशी साखर (चिमूटभर)
 • चवीनुसार मीठ,

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
 • सर्वप्रथम ताकासाठी थोडं आंबट दही घ्या आणि ते रवीने व्यवस्थित घुसळून घ्या 
 • त्यानंतर ताकामध्ये बेसन, साखर, मीठ, आल्याचे तुकडे आणि लसूण ठेचून, मीठ हे सर्व त्यामध्ये मिक्स करा
 • बेसन मिक्स केल्यानंतर त्याच्या गुठळ्या राहू देऊ नका 
 • दुसऱ्या बाजूला कढई तापत ठेवा आणि त्यात तेल घाला
 • तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरचीचे तुकडे, कडिपत्ता घाला आणि वरून तयार केलेले ताक फोडणीला द्या 
 • त्यानंतर कढीला उकळी येऊ द्या. वरून कोथिंबीर घाला आणि मिक्स करून मस्तपैकी गरमागरम सर्व्ह करा 

Sol Kadhi Recipe In Marathi | सोलकढी

Sol Kadhi Recipe In Marathi
Sol Kadhi Recipe In Marathi – Instagram

महाराष्ट्रातील कढीचा दुसरा सर्वात जास्त आढळणारा प्रकार म्हणजे सोलकढी. मांसाहरी जेवणासह सोलकढी जास्त प्रमाणात अनेक घरांमध्ये केली जाते. मात्र कोकणात अनेक ठिकाणी सोलकढी करण्यात येते. आंबटगोड सोलकढी खास रेसिपी (Sol Kadhi Recipe In Marathi) तुमच्यासाठी. 

सोलकढी बनविण्यासाठी साहित्य 

 • 1 नारळ
 • 15-20 आमसूल
 • 2 हिरव्या मिरच्या
 • 3-4 लसून पाकळ्या
 • 4-5 छोटे आल्याचे तुकडे
 • 1 चमचा काळं मीठ
 • चवीनुसार मीठ
 • गरजेनुसार पाणी
 • 2 चमचे चिरलेली कोथिंबीर

बनविण्याची पद्धत 

 • सर्वात आधी आमसूल पाण्यामध्ये भिजवून ठेवा. 
 • त्यानंतर तुम्ही नारळाचे दूध तयार करण्यासाठी एक नारळ फोडून खोबऱ्याचे काप करून घ्या अथवा नारळ खवून घ्या. मिक्सरमध्ये तुम्ही खवलेले खोबरे अथवा काप पाणी घालून वाटून घ्या. मात्र हे वाटताना त्यामध्ये तुम्ही मिरची,आलं आणि लसूण घाला. एकाच वेळी पाणी घालू नका. तर थोडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घेणे.
 • आता नारळाचा चव येतो. हा चव आपल्याला गाळून घेऊन नारळाचे दूध तयार करून घेता येते. तुम्ही व्यवस्थित चाळणीतून अथवा फडक्यातून हे गाळून घ्या. पूर्ण नारळाचे दूध गाळून येईपर्यंत तुम्ही सुती कपड्यामध्ये असे दोन ते तीन वेळा पाणी मिक्स करून नारळाचे दूध काढा 
 • त्यानंतर तुम्ही भिजत घातलेले आमसूल घ्या आणि त्याचे आगळ करून घ्या (तुम्हाला हे करण्याइतका वेळ नसेल तर तुम्ही बाजारातून तयार आमसुलाचे आगळही आणून त्याचा उपयोग करू शकता)
 • हे आगळ तुम्ही नारळाच्या दुधात मिक्स करा. त्यात अगदी चिमूटभर काळं मीठ आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घ्या 
 • एका लहान कढईत तेल घ्या. त्यात जिरे तडतड झाल्यानंतर सोलकढीला वरून फोडणी द्या आणि चिरलेली कोथिंबीर मिक्स करा 
 • तुम्हाला हवं असेल तर फ्रिजमध्ये ठेवा आणि जेवताना मस्तपैकी चविष्ट सोलकढी प्या

Dahi Kadhi Recipe In Marathi | दही कढी

Dahi Kadhi Recipe In Marathi
Dahi Kadhi – Instagram

ताकाची कढी आपण नेहमीच पितो. पण दह्याची कढी आणि ताकाची कढी नक्की काय वेगळी असते असाही प्रश्न अनेकांना पडतो. दह्याची कढी रेसिपी (Dahyachi Kadhi Recipe in Marathi) आपण पाहूया. 

ADVERTISEMENT

दही कढी बनविण्यासाठी साहित्य

 • अर्धी वा एक वाटी दही
 • 1 टेबलस्पून बेसन पीठ
 • 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 1 चमचा आले-लसूण पेस्ट
 • 5-6 कढीपत्त्याची पाने
 • 1 चमचा हळद
 • 1 चमचा तूप
 • 1 चमचा मोहरी
 • 1 चमचा जिरे
 • 1 चमचा हिंग
 • 1 चमचा साखर
 • चवीनुसार मीठ
 • गरजेनुसार पाणी

बनविण्याची पद्धत 

 • सर्वात पहिल्यांदा दह्यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून त्यातील गुठळ्या काढून टाकणे आणि घुसळून घेणे
 • त्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ, मिरच्या मिक्स करणे 
 • त्यानंतर एका पॅनमध्ये तूप घाला. तूप मध्यम आचेवर गरम करून घ्या. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी करा आणि त्यात आलं लसूण पेस्ट आणि हळद घालून पटकन परतून घ्या
 • परतल्यावर त्यात दह्याचे मिश्रण मिक्स करा. त्यात मीठ आणि साखर, कोथिंबीर वरून घालून व्यवस्थित मिक्स करा. कढीला व्यवस्थित एक उकळी येऊ द्या. 
 • गरमागरम दह्याची कढी तुम्ही सर्व्ह करा

Kadhi Gole Recipe In Marathi | कढी गोळे रेसिपी

Kadhi Gole Recipe In Marathi
कढी गोळे रेसिपी (Kadhi Gole Recipe In Marathi) – Instagram

कढी गोळे रेसिपी म्हणजे नक्की काय असा काही जणांना प्रश्न पडतो. तर कढीमध्ये बेसनाचे गोळे, मूगडाळ, तूरडाळीचे गोळे बनवून अथवा भजी घालून ही कढी करण्यात येते. काय आहे कढी गोळे रेसिपी जाणून घ्या 

कढी गोळे बनविण्यासाठी साहित्य 

ADVERTISEMENT
 • 1 कप दही
 • 2 चमचे बेसन
 • दीड कप पाणी 
 • 1 चमचा तेल
 • अर्धा चमचा मोहरी
 • अर्धा चमचा जीरे
 • अर्धा चमचा धणे
 • 4/5 पाकळ्या लसूण
 • अर्धा इंच आले
 • 1-2 हिरव्या मिरच्या
 • 1 चमचा धणेपूड
 • 4-5 मेथी दाणे
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर

गोळ्यांसाठी लागणारे साहित्य

 • अर्धी वाटी चणा डाळ
 • पाव कप मूगडाळ
 • पाव कप तूरडाळ

बनविण्याची पद्धत 

 • सर्वात पहिल्यांदा सर्व डाळी रात्री भिजत घाला. लसूण आणि मिरची ठेचून घ्या. आलं किसून घ्या आणि कडिपत्ता व्यवस्थित धुवा 
 • सकाळी जेव्हा तुम्ही कढी बनवायला घ्याल तेव्हा डाळीतले पाणी काढून टाका आणि नीट धुवा. सर्व डाळी मिक्स करून व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घ्या 
 • दही फेटा. त्यामध्ये बेसन, मीठ, लसूण, आलं, मीठ, साखर एकत्र करून नीट गुठळ्या राहणार नाहीत असं मिक्स करा 
 • आता वाटलेली डाळ एका भांड्यात घ्या. त्यात लसूण आलं मिरचीची पेस्ट, जिरे, हळद, मीठ, हवं असल्यास, ओवा घाला. थोडेसे तेल, मोहरी, मेथी दाणे, जिरे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यात थोडेसे हवं असल्यास, बेसन अथवा तांदळाचे पीठ घाला. जेणेकरून गोळ्यांना अधिक कुरकुरीतपणा येईल
 • एका कढईत तेल घ्या. त्यात जिरे मोहरी, कडिपत्ता, हळद तडतडल्यावर फेटलेले दही घाला आणि उकळी येऊ द्या 
 • तोपर्यंत बाजूला तळणीमध्ये तेल तापवा आणि डाळीचे गोळे करून तळून घ्या 
 • कढीला उकळी आल्यावर तळलेले गोळे तुम्ही कढीमध्ये टाका आणि मग गरमागरम कढी गोळे खायला घ्या

Kokum Kadhi Recipe In Marathi | कोकम कढी रेसिपी

Kokum Kadhi Recipe In Marathi
Kokum Kadhi Recipe In Marathi – Instagram

कोकम खाण्याचे फायदे म्हणजे कोकम कढी पदार्थ होय. ही सोलकढीसारखीच ही कढी लागते. ही थंड असते. याला गरम करायची गरज भासत नाही आणि बनविण्यासाठी अतिशय सोपी असते.

कोकम कढी बनविण्यासाठी साहित्य 

ADVERTISEMENT
 • 1 मध्यम आकाराचा नारळ
 • पाव कप कोकम आगळ
 • चवीनुसार मीठ
 • 3-4 पाकळी लसूण
 • 1/2 इंच आले
 • सजावटीसाठी कोथिंबीर

कोकम कढी बनविण्याची पद्धत 

 • नारळ खरवडून घ्या आणि त्याचे दूध काढा. हे व्यवस्थित गाळून घ्या 
 • नारळाच्या या दुधामध्ये मिरची, आलं, लसूण आणि गरजेनुसार पाणी घाला आणि मिक्सरमध्ये वाटून पुन्हा एकदा गाळून घ्या 
 • या नारळाच्या दुधात तुम्हाला आवडत असलेल्या आंबटपणानुसार कोकम आगळ घाला. त्यात मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित ढवळून घ्या 
 • तुम्हाला आवडत असल्यास, वरून तेलाची फोडणी द्या. फोडणी द्यायची नसली तरीही तुम्ही फ्रिजमध्ये हे ठेऊन नंतर कोकम कढी पिऊ शकता

Gujarati Kadhi Recipe In Marathi | गुजराती कढी

Gujarati Kadhi Recipe In Marathi
गुजराती कढी (Gujarati Kadhi Recipe In Marathi) – Instagram

आपल्याकडे महाराष्ट्रीयन कढीमध्ये हळद घातली जाते. मात्र गुजराती कढी यापेक्षा वेगळी असते. पांढरी असते आणि यामध्ये अधिक गोडवा असतो. 

गुजराती कढी बनविण्यासाठी साहित्य 

 • 3 कप आंबट दही 
 • दोन कप पाणी
 • 2 मोठे चमचे बेसन 
 • आलं – लसूण पेस्ट 
 • मिरचीची पेस्ट 
 • 1-2 लाल सुकी मिरची 
 • कडिपत्ता 
 • दालचिनीचा तुकडा
 • 2-3 लवंग 
 • अर्धा चमचा मेथी दाणे 
 • मोहरी 
 • जिरे 
 • 1 मोठा चमचा साखर 
 • चवीनुसार मीठ
 • तूप अथवा तेल 
 • चिरलेली कोथिंबीर 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
 • दही व्यवस्थित घुसळून घ्या. त्यामध्ये बेसन व्यवस्थित मिक्स करा. यामध्ये गुठळ्या राहता कामा नयेत याची काळजी घ्या 
 • गॅसवर कढई ठेवा. त्यात तूप वा तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, मेथी दाणे, कडिपत्ता, लाल सुकी मिरची घालून परता 
 • वरून दालचिनी आणि लवंग घालून परतून घ्या आणि त्यानंतर आलं – लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून पुन्हा एकदा व्यवस्थित परता 
 • याचा मस्त सुगंध येऊ लागला की, वरून मिक्स केलेले दही घाला आणि उकळी येऊ द्या 
 • त्यात वरून साखर, मीठ घालून साधारण 15-20 मिनिट्स मंद आचेवर तुम्ही उकळून घ्या. गुजराती कढी तयार. वरून कोथिंबीर पेरा आणि गरमागरम खायला द्या 

Tomato Kadhi Recipe In Marathi | टोमॅटो कढी

टोमॅटो कढी (Tomato Kadhi Recipe In Marathi) – Instagram

ज्यांना पदार्थांमध्ये आंबटपणा अधिक आवडतो त्यांच्यासाठी टॉमेटो कढी हा चांगला पर्याय आहे. तुम्हालाही टॉमेटोटी कढी करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी ही सोपी रेसिपी 

टॉमेटो कढीसाठी लागणारे साहित्य 

 • 2 टॉमेटो
 • 1 वाटी चिंचेचं पाणी,
 • 3 कांदे,
 • 3 मिरची
 • 8 लसूण पाकळ्या
 • 1 चमचा हळद
 • 1 चमचा मीठ
 • तेल आवश्यकतेनुसार
 • 2 चमचे तांदळाची पिठी पाण्यात भिजवून ठेवलेली

बनविण्याची पद्धत 

 • सर्वात आधी टॉमेटो आणि कांदा बारीक चिरून घ्या. मिरचीचे उभट तुकडे करा 
 • गॅसवरील एका पातेल्यात तेल ओता. मग त्यात ठेचलेली लसूण, चिरलेला कांदा, मिरची, टॉमेटो तेलात परतवून घ्या. त्यानंतर त्यात हळद, मीठ आणि चिंचेचे तयार केलेले पाणी घाला आणि थोडं साधं पाणी मिक्स करून एक उकळी येऊ दया
 • उकळी आल्यानंतर त्यात तांदळाची पिठी घाला आणि गुठळ्या राहणार नाहीत याकडे लक्ष द्या आणि पुन्हा एक उकळी काढा. तांदळाची पिठी यामध्ये घातल्याने कढीला जाडसरपणा येतो. तुमची टॉमेटोची कढी तयार. ही कढी सहसा विदर्भामध्ये जास्त प्रमाणात केली जाते. याला चिंचेची कढी असंही म्हणतात 

Khandeshi Kadhi Recipe In Marathi | खानदेशी कढी

Khandeshi Kadhi Recipe In Marathi
खानदेशी कढी (Khandeshi Kadhi Recipe In Marathi)

खानदेशी अनेक पदार्थ आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. पण खानदेशी पदार्थ म्हटले की, ते नक्कीच झणझणीत असतात. कढीमध्येदेखील तुम्हाला वेगळेपणा हवा असेल तर तुम्ही नक्की ही कढी रेसिपी (Kadhi Recipe In Marathi) ट्राय करून शकता. 

ADVERTISEMENT

खानदेशी कढीसाठी लागणारे साहित्य 

 • 1 ग्लास ताक
 • 2 हिरव्या मिरच्या
 • 10-12 कडीपत्त्याची पानं
 • अर्धा चमचा बेसन पीठ
 • 1/2 चमचा मोहरी जीरे
 • 15-20 मेथी दाणे
 • 1 चमचा कोथिंबीर
 • दोन काडी दालचिनी
 • तेल

बनविण्याची पद्धत 

 • सर्वात आधी कढईत तेल घ्या. त्यात मेथी दाणे परतून घ्या. मग जिरे मोहरी, लवंग, दालचिनी, कडिपत्ता सर्व घालून नीट परतून घ्या 
 • त्यामध्ये ताक वरून घाला आणि परतून घ्या 
 • नंतर वरून त्यात मीठ घाला आणि एक उकळी काढा. उकळी आल्यावर त्यात बेसन घाला आणि रवीने घोटून घ्या. आवश्यकतेनुसार त्यात साखर अथवा गूळ टाका, वरून कोथिंबीर पेरा
 • गरमागरम कढी तयार आहे. ही खानदेशी कढी तुम्ही पिऊ शकता

Naralachi Kadhi | नारळाची कढी

Naralachi Kadhi
Naralachi Kadhi – Instagram

नारळाची कढी म्हणजे जेवणातील पदार्थांमध्ये अधिक स्वाद वाढवते. नारळाची कढी करणे सोपे असते. तुम्हीही तुमच्या जेवणामध्ये नारळाची कढी कशी करायची जाणून घ्या. 

नारळाची कढी करण्यासाठी लागणारे साहित्य 

ADVERTISEMENT
 • 2 कप नारळाचे तुकडे
 • 3 हिरव्या मिरच्या
 • 5 पानं कढीपत्त्ता
 • 6/7 लसूण पाकळ्या
 • 1 चमचा जिरे 
 • मोहरी फोडणीसाठी
 • अर्धा चमचा हिंग
 • 1 चमचा तेल
 • 1 चमचा कोकम आगळ 
 • मीठ चवीनुसार

बनविण्याची पद्धत 

 • नारळाचे तुकडे करून घ्या. मिक्सरमध्ये नारळाचे तुकडे, मिरची, लसूण घालून वाटून घ्या
 • हे वाटलेले नारळाचे दूध नीट तुम्ही गाळून घ्या. एक ते दोन वेळा त्यात पाणी घालून पुन्हा गाळून घ्या 
 • त्यानंतर त्यात कोकम आगळ घाला. मीठ घाला
 • दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडिपत्ता घालून फोडणी करा आणि ती वरून नारळाच्या दुधात वरून घाला. मिक्स करा आणि आवडीनुसार कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. नारळाची कढी तयार

Upwas Kadhi | उपवास कढी

Upwas Kadhi
Upwas Kadhi – Instagram

उपवासाला आपण अनेक पदार्थ तयार करतो. साबुदाणे वडे, साबुदाण्याची खिचडी, शिंगाडा पिठाचा हलवा असे अनेक पदार्थ आपल्याकडे केले जातात. तर तुम्ही उपवास कढीही तयार करून घेऊ शकता. 

उपवास कढी करण्यासाठी लागणारे साहित्य 

 • 500 मिली ताक
 • 3 चमचा राजगिरा पीठ
 • चवीनुसार मीठ
 • चवीनुसार साखर
 • 4 टेबलस्पून काकडीचा कीस
 • 2 इंच आल्याचा कीस
 • 1 चमचा तूप
 • अर्धा चमचा जिरे
 • 2 हिरव्या मिरच्या
 • कढीपत्ता

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
 • मिक्सरमध्ये ताक, राजगिरा पीठ, मीठ आणि साखर घालून एकदा वाटून घ्या 
 • हे तयार झालेले ताक, एका भांड्यात घाला आणि उकळून घ्या. दोन उकळ्या आल्यानंतर त्यात काकडी आणि आल्याचा किस तुम्ही घाला आणि दोन ते तीन मिनिट्स उकळून द्या
 • नंतर गॅस बंद करावा. उपवासाला चालत असल्यास, कोथिंबीर घालावी
 • आता ही उपवासाची गरम कढी तुम्ही साबुदाण्याची खिचडी अथवा भगरसह खाऊ शकता

Ambat Goad Kadhi | आंबट गोड कढी

Ambat Goad Kadhi – Instagram

आंबट गोड कढी बऱ्याच जणांना आवडते. तुम्हीही जेवणामध्ये आमटी करत असाल तर त्याऐवजी तुम्ही आंबट गोड कढीचा पर्याय निवडू शकता. 

आंबट गोड कढीसाठी लागणारे साहित्य 

 • अर्धा किलो दही
 • 2 चमचे बेसन
 • 1 हिरव्या मिरचीचे तुकडे
 • 1 चमचा किसलेले आले
 • 7-8 कढीपत्त्याची पाने
 • 4 मेथी दाणे
 • अर्धा चमचा मोहरी / जिरे
 • अर्धा चमचा हिंग
 • 1 चमचा तेल
 • 1 चमचा साखर
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर अंदाजे
 • पाणी अंदाजे

बनविण्याची पद्धत 

 • सर्वात पहिल्यांदा दही रवीने घुसळून घ्या आणि त्यात बेसन आणि पाणी घालून पुन्हा एकदा घुसळून घ्या. जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या 
 • एका दुसऱ्या पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी, जिरे, कडिपत्ता, मेथी दाणे, मिरची, हिंग, किसलेले आले घालून परता. वरून दही आणि बेसनाचे तयार केलेले मिश्रण वरून घाला
 • त्यानंतर उकळी येऊ द्या. उकळी येतानाच तुम्ही त्यात मीठ, साखर घालून ढवळा. कढीला उकळू येऊ द्या. वरून कोथिंबीर घाला. गरमागरम आंबड – गोड कढी सर्व्ह करा

Ananasachi Kadhi | अननसाची कढी

Ananasachi Kadhi
ananas kadhi – Instagram

चवीला अत्यंत उत्तम आणि वेगळी अशी कढी म्हणजे अननसाची कढी. गुजराती कढीशी मिळतीजुळती अशी ही कढी तुम्हाला कधीही पिण्यासाठी मस्त पर्याय ठरते. अननसाची ही कढी कशी बनवायची ते जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

अननसाची कढी बनविण्यासाठी लागणारे साहित्य 

 • अननसाचे तुकडे 
 • नारळाचे दुध 
 • साखर
 • चवीनुसार मीठ 
 • जिरे
 • हिंग 
 • कडिपत्ता 
 • मिरचीचे तुकडे 
 • तूप

बनविण्याची पद्धत 

 • नारळाचं दूध काढून घेणे. अननसाचे तुकडे शिजवून घेणे 
 • दुसऱ्या पॅनमध्ये तूप घालणे. त्यात जिरे, हिंग आणि कडिपत्त्याची फोडणी करून घेणे 
 • नारळाचं दूध, शिजवलेल्या अननसाच्या फोडी एकत्र करून त्यात मीठ, साखर घालून नीट मिक्स करणे 
 • त्यात वरून फोडणी देणे आणि पुन्हा एकदा अगदी मंद आचेवर थोडेसे कोमट करणे. उकळी अजिबात देऊ नये अन्यथा कढी फुटेल

तुम्हालाही वेगवेगळ्या चवीच्या कढी करून बघायच्या असतील. तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. तुम्हीही तुमच्या नियमित जेवणामध्ये आमटीसह वेगवेगळ्या कढीचा समावेश करून घेऊ शकता. 

17 Dec 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT