अभिनेत्री आलिया भटने खूप लहान वयात तिच्या करिअरला सुरूवात केली. आज तिने तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने संपूर्ण बॉलीवूडला भूरळ घातली आहे. मात्र तिच्या करिअरच्या सुरूवातीचा काळ एक आई म्हणून सोनी राजदान यांच्यासाठी सहज सोपा मुळीच नव्हता. लेकीच्या बॉलीवूड डेब्यूसाठी त्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला होता. आलियाने स्टुडंट ऑफ दी इअरमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिच्या करिअरचा ग्राफ उंचच उंच वाढत गेला. पण त्यामागे तिची आई सोनी राजदान यांचे खूप मोठे योगदान आहे. आता सोनी राजदान कॉल माय एजंट या वेबसिरिजमधून नेटफ्लिक्सवर झळकणार आहेत. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे.
भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांचा ‘अजिंक्य’ होणार नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित
सोनी राजदान यांनी या गोष्टींचा केला त्याग
आलियाला सोनी राजदान यांनी मनमोकळेपणाने आणि बिनधास्तपणे वाढवलं आहे. त्यामुळे तिला कोणती गोष्ट करण्यासाठी त्यांनी कधीच आडकाठी केली नाही. पण जेव्हा आलियाच्या बॉलीवूड डेब्यूची वेळ आली तेव्हा ती फक्त सतरा वर्षांची होती. एक अभिनेत्री म्हणून सोनी राजदान यांना कधीच कोणत्या गोष्टीसाठी तडजोड केली नाही. मात्र लेकीसाठी एक आई म्हणून त्यांना एक खूप मोठं स्वप्न सोडून द्यावं लागलं होत. जेव्हा आलियाच्या स्टुडंट ऑफ दी इअरचं शूटिंग सुरू झालं तेव्हाच नेमकं सोनी राजदान यांच्याकडे एका चित्रपटाची ऑफर आली होती. विशेष म्हणजे सोनी राजदान यांना तो चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. ज्यामुळे एक यशस्वी दिग्दर्शिका म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असती. पण आलिया तिच्या बॉलीवूड डेब्यूच्या वेळी फक्त सतरा वर्षांची असल्यामुळे सोनी राजदान यांनी आपलं दिग्दर्शिका होण्याचं स्वप्न सोडून आलिया सोबत राहणं निवडलं.
Bigg Boss Marathi: विशाल-विकास आमनेसामने,मैत्रीत पडेल का फूट
सोनी राजदान यांनी केली तडजोड
एका आईसाठी जेव्हा तिच्या करिअर आणि मुलांची निवड करण्याची वेळ येते तेव्हा ती नेहमीच मुलांची निवड करते. सोनी राजदान यांनी तर मुलीच्या करिअरसाठी स्वतःच्या करिअरमध्ये तडजोड केली. ज्यामुळे आज आलिया एक यशस्वी अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये नाव कमावू शकली. आता सोनी राजदान पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाल्या आहे. त्यांच्या आगामी कॉल माय एजंटमधून त्या सर्वांसमोर येत आहेत. ज्यामध्ये त्यांच्यासोबत अहाना कुमारा, रजत कपूर, आयुष मेहरा आणि राधिका सेठ यांच्या मुख्य भूमिका असतील. आलिया देखील ब्रम्हास्त्र, गंगुबाई काठियावाडी अशा निरनिराळ्या भूमिकांमधून सर्वांसमोर येत आहे. त्यामुळे या वर्षी आई आणि मुलीच्या विविध अभिनय छटा प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळतील.