ADVERTISEMENT
home / बिग बॉस
sonali patil

Bigg Boss Marathi: पिस्तूल गर्ल सोनाली पाटील !

वैजू नंबर 1 द्वारे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली वैजयंती म्हणजेच आपली लाडकी सोनाली पाटील (Sonali Patil) सध्या बिगबॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात (Bigg Boss Marathi 3) तुफान कल्ला करत आहे! बिगबॉस मराठीच्या घरातील तिचा वावर आणि खेळातील सहभाग पाहता तिने अल्पावधीतच लोकांच्या मनात आपले स्थान निश्चित केले आहे. सोनाली खऱ्या आयुष्यात एक खेळाडू असून, राज्यपातळीवरील नेमबाजी स्पर्धेत तिने यशस्वी कामगिरी देखील केली आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? सोनालीच्या या विशेष गोष्टीबाबतच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोनाली जर अभिनेत्री झाली नसती, तर नक्कीच एक यशस्वी नेमबाज बनली असती असे तिच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. घरात सोनालीची वावर सर्वांनाच माहीत आहे. अतिशय तोंडावर बोलणारी आणि तितकीच खेळीमेळीने राहणारी. टास्कमध्ये जिद्दीने परफॉर्म करणारी सोनाली सर्वांनाच माहीत आहे. ते यामुळेच की, तिच्यामध्ये मुळातच स्पोर्ट्समन स्पिरीट दडलेले आहे. 

अधिक वाचा – भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांचा ‘अजिंक्य’ होणार नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित

नेमबाज होण्यासाठी केला संघर्ष 

उत्कृष्ट नेमबाज होण्यासाठी सोनालीने खूप संघर्ष केला आहे. कोल्हापूरमधील गोंडोली गावातील शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सोनालीला नेमबाजीच्या सरावासाठी पिस्तूलची आवश्यकता होती. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याच्या कारणामुळे पिस्तूल खरेदी करणे शक्य नव्हते. तसेच ज्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ती नेमबाजीचा सराव करत होती, तिथेदेखील तिला पिस्तूल चालवण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध होत नव्हता. नेमबाजीमध्ये सर्वप्रथम पिस्तूलचे वजन हाताळता येणं गरजेचं असतं, कारण पिस्तूलचे वजन १ कि.ग्रॅम हून अधिक असल्यामुळे, पिस्तूल चालवताना त्याचा हातासोबत समतोल आवश्यक असतो. सोनालीला हे चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे पिस्तूलच्या वजनाचा दगड हातात धरून ठेवत, तिने आपली होल्डिंग क्षमता वाढवली होती. ज्यामुळे ट्रेनिंगदरम्यान सोनालीला अगदी चपखलपणे पिस्तूल घेऊन इतरांच्या तुलनेत अधिक पेलेट मारणे शक्य झाले.  पूर्वतयारी आणि योग्य अंमलबजावणीच्या जोरावर आपण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो, हे सोनालीने याद्वारे सिद्ध करून दाखवले आहे. प्रतिकूल परिस्थितीमधून योग्य मार्ग काढून लक्ष्य साधता येते हेच सोनालीने पुन्हा एकदा सिद्ध केले.  सोनालीची हीच जिद्द आणि चिकाटी पुढे तिला यशस्वी अभिनेत्री बनण्यापर्यंत घेऊन गेली. आता ती बिगबॉसच्या घरात देखील अनेक प्रतिकूल परिस्थतीचा सामना करत आहे, पण तितक्याच जिद्दीने आणि चिकाटीने ती बिगबॉस मराठी 3 च्या विजेतेपदापर्यंत मजल मारते का? हे पाहणे तिच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरणारे आहे.

अधिक वाचा – Bigg Boss Marathi:घरात आलेत देवदूत आणि राक्षस, होणार राडा

ADVERTISEMENT

थोडेसे सोनालीविषयी 

सोनाली पाटीलचा जन्म हा इस्लामपूरमध्ये झाला असून कोल्हापूरमध्ये तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. सोनाली पाटीलने आपल्या करिअरची सुरूवात 2010 पासून केली. Aaron चित्रपटामधील स्वस्तिका मुखर्जी या व्यक्तिरेखेमुळे तिला ओळख मिळाली. शशांक केतकर (Shashank Ketkar) सह तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. तर 2019 मध्ये ‘जुळता जुळतंय की’ ही सोनालीची पहिलीच मालिका होती. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती ‘वैजू नंबर 1’ या मालिकेने. त्यानंतर ‘घाडगे अँड सून’ मधील सोनालीची प्रियांका ही व्यक्तिरेखादेखील गाजली. तर काही दिवसांपूर्वीच संपलेली मालिका ‘देवमाणूस’ यामध्ये सोनालीने आर्या देशमुख नावाची भूमिका साकारली होती. त्यामुळे अनेक मालिकांचा अनुभव तिच्या गाठीशी आहे. मात्र बिग बॉस मराठी मध्ये खरी सोनाली नक्की काय आहे हे प्रेक्षकांना दिसून आले आहे. 

अधिक वाचा – क्रिश 4′ साठी ह्रतिक रोशन बनला गायक,एक्शनसोबत दाखवणार गाण्याची जादू

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT