ADVERTISEMENT
home / Festive
Special Gajgamini collection of duppatas for Ganeshotsav

गणेशोत्सवानिमित्त ओढण्यांचे खास गजगामिनी कलेक्शन

गणेशोत्सवाचा आनंद काही औरच असतो. मागील वर्षी गणेशोत्सवाचा आनंद घरात बसूनच घ्यावा लागला होता. मात्र यंदा छोट्या प्रमाणावर का होईना प्रत्येकाला घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होता येणार आहे. घरात सणासुदीचे वातावरण  असले की मनदेखील प्रसन्न राहते. अशा सणासुदीसाठी मग खास कपडे आणि दागिन्यांची निवड केली जाते. या दिवसांत महिला आणि पुरूष विशेष पारंपरिक पेहराव करण्याला प्राधान्य देतात. जर तुम्ही यंदा एखादा एनथिक लुक करणार असाल तर तुमच्या कुर्तीची या गजगामिनी कलेक्शनने अधिक शोभा वाढेल. यंदाच्या गणेशोत्सवासाठी जयपोरने खास गजगामिनी हे मर्यादित आवृत्तीचे कलेक्शन सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये हँडक्राफ्टेड ओढण्यांचा समावेश असून त्याचे अभिजात व पारंपरिक रूप प्रत्येकाला भुरळ घालणारे आहे. या खास कलेक्शनमध्ये लाडक्या गणपतीची विविध रूपे पाहायला मिळतील. त्याची ही सर्व रूपे कुशल कलमकारी कारागिरांनी स्वतःच्या हाताने रंगवलेली आहे. ग्राहकांना कलमकारीच्या पारंपरिक कलेने सजलेली अऩोखी डिझाइन्स उपलब्ध करून देण्यासाठी या ब्रॅंडने हे कलेक्शन खास तयार केले आहे. जाणून घ्या या खास कलेक्शनविषयी… यासोबतच सर्वांना द्या गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया! (Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi)

Gajgamini collection

काय आहे गजगामिनी कलेक्शन 

गजगामिनी म्हणजे अशी स्त्री जिची चाल अगदी हत्तीच्या चालीप्रमाणे मंद आणि लयबद्ध आहे. बऱ्याचदा नायिकेच्या पाठमोऱ्या सौंदर्याची तुलना करताना गजगामिनीचा उल्लेख केला जातो. एम एफ हुसेन यांनी सौंदर्याची सम्राज्ञी माधुरी दीक्षितवर गजगामिनी नावाचा चित्रपटही काढला होता. आता जयपोर ब्रॅंडने खास महिलांसाठी गणेशोत्सवानिमित्त गजगामिनी ओढणीचे कलेक्शन सादर केले आहे. या कलेक्शनसाठी खास कारागीरांकडून सर्वोत्तम विणकाम, एम्ब्रॉयडरीज आणि डिझाइन्सची निर्मिती करण्यात आली आहे. हे कलेक्शन मर्यादित असून फक्त गणेशोत्सवासाठीच केले जाणार आहे. यासोबतच वाचा गणेश चतुर्थीची माहिती मराठीत (Ganesh Chaturthi Information In Marathi)

Gajgamini collection

5 दुपट्टे जे तुम्हाला मिळवून देतील वेगळा लुक, करा ट्राय

कलमकारी डिझाईन आहे याची खासियत

गजगामिनी ओढण्यांवर कलमकारीची प्राचीन कला वेगवेगळ्या गावांत प्रवास करत हिंदू पुराणातल्या कथा रंगवणाऱ्या चित्रकारांनी तयार केली. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील पारंपरिक कारागिरांनी या कलेला हे स्वरूप दिले आहे. गजगामिनी कलेक्शनमध्ये कलमकारीचे वैशिष्ट्यपूर्ण मोतिफ्स आणि गणेशाची विविध रूपे यांची नाजूक कलाकुसर केलेल्या ओढण्यांचा समावेश करण्यात आला आहे.यातील प्रत्येक ओढणी वन पीस असून त्यावरील मोतिफ्स आणि बारकाई केलेली कलाकुसर प्रत्येकीचे पारंपरिक किंवा आधुनिक रूप नक्कीच खुलवेल. हे मर्यादित कलेक्शन कलमकारी कौशल्य व भारताचा समृद्ध इतिहास गौरवणारे आहे. या ओढण्या खास हाताने रंगवलेल्या असून हस्तकारागिरी  हे या उत्पादनांचे खास वैशिष्ट्य आहे. यातील विविध रंग व डिझाइन्समुळे त्या इतर प्रॉडक्टपेक्षा खास वेगळ्या दिसू शकतील. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव खास करण्यासाठी तुम्हा या गजगामिनी ओढणीसह तुमचा लुक नक्कीच हटके करू शकता. गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस, कोट्स आणि मेसेज (Ganpati Bappa Visarjan Quotes In Marathi)

ADVERTISEMENT
Gajgamini collection

हॅंडलूम इकत साडी आणि ओढण्यांची कशी घ्यावी काळजी

जरी वर्कपेक्षाही शोभून दिसते गोटापत्ती वर्क, जाणून घ्या हा ट्रेंड

08 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT