ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
बॉलीवूडमध्ये ठरले अपयशी पण दुसरे करिअर निवडून झाले स्टार सेलिब्रिटी

बॉलीवूडमध्ये ठरले अपयशी पण दुसरे करिअर निवडून झाले स्टार सेलिब्रिटी

बॉलीवूडमध्ये रोज अनेक नवीन चेहरे डोळ्यात हजारो स्वप्नं घेऊन येत असतात. पण त्यापैकी काही जणांंची स्वप्नंच पूर्ण होतात. शिवाय कोणत्या अभिनेत्याला आणि अभिनेत्रीला इथे यश मिळेल आणि कोणाला नाही हेदेखील सांगता येत नाही. बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेता आणि अभिनेत्री आले ज्यांनी सुरुवातीला अगदी हिट चित्रपट दिले पण जास्त काळ ते बॉलीवूडमध्ये टिकले नाहीत. ते बॉलीवूडमध्ये अपयशी ठरले. पण त्यांनी असा काही वेगळा मार्ग निवडला आणि  त्यामध्ये मात्र ते स्टार सेलिब्रिटी बनले. पहिल्या चित्रपटात तुफान यश मिळाल्यानंतरही काही सेलिब्रिटींना बॉलीवूडमध्ये राज्य करता आलं नाही. म्हणून अपयशाला हे सेलिब्रिटी कवटाळून बसले नाहीत तर त्यांनी त्यानंतर आपला वेगळा असा उद्योग सुरू केला आणि त्यातून ते स्टार सेलिब्रिटी बनले. आज या स्टार्सना त्यांच्या व्यवसायातून तुफान यश मिळालं आहे आणि त्यातून त्यांना उत्तम उत्पन्नही मिळत आहे. आपण आज अशाच काही स्टार्सविषयी जाणून घेणार आहोत. 

1. ट्विंकल खन्ना

Instagram

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया हे दोघेही अतिशय गाजलेले स्टार्स आणि त्यांची मोठी मुलगी ट्विंकल खन्नाचा ‘बरसात’ हा चित्रपट गाजतवाजत आला. बॉबी देओलबरोबर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेली ट्विंकल खन्ना जास्त वेळ पडद्यावर कमाल दाखवू शकली नाही. 2001 मध्ये तिने अभिनेता अक्षयकुमारबरोबर लग्न केलं आणि त्यानंतर तिने आपल्या इंटिरिअर डिझाईनर आणि लेखिका या दोन्ही करिअरकडे व्यवस्थित लक्ष दिलं. आज एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ट्विंकल खन्नाची ओळख आहे. त्याशिवाय ती उत्तम इंटिरिअर डिझाईनर असून मोठमोठ्या कंपन्यांसाठी ती काम करते. तसंच आपल्या लिखाणाने तिने अनेकांची मनं जिंंकून घेतली आहेत. वृत्तपत्रात मिसेस फनीबोन्स या नावाने लिखाण करत ती नेहमीच समाजातील विविध विषयांकडे लक्ष वेधून घेत असते. ट्विंकल सामाजिक स्तरावरही उत्तम काम करत असून चित्रपटाची निर्माती म्हणूनही ती काम पाहते. 

ADVERTISEMENT

2. दिनो मोरिया

Instagram

दिनो मोरिया हा मॉडेलिंग क्षेत्रातील टॉपचा मॉडेल होता.  त्यानंतर अभिनय क्षेत्रात त्याने पाऊल ठेवलं आणि विक्रम भटच्या ‘राज’ चित्रपटाने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली.  पण त्यानंतर काही चित्रपट करून दिनो मोरिया गायब झाला. आता नक्की दिनो काय करतो याची माहिती तुम्हाला आहे का? मुंबईमध्ये दिनोची स्वतःची रेस्टॉरंट्स असून ही रेस्टॉरंट्स प्रसिद्ध आहेत. दिनो याचा मालक असून महिन्याला लाखो रूपये दिनो कमावतो.  केवळ बॉलीवूडमधील चित्रपटांवर अवलंबून न राहता दिनोने एक व्यावसायिक म्हणून स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. भलेही दिनोचे जास्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नसतील पण दिनोने एक व्यावसायिक अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. 

अबीर आणि मिष्टीच्या लग्नादरम्यान कलाकारांनी केली धमाल

ADVERTISEMENT

3. अमिषा पटेल

Instagram

हृतिक रोशनसारख्या तगड्या कलाकाराबरोबर बॉलिवूडमध्ये निर्माण केलेली अभिनेत्री अमिषा पटेल. पहिल्या चित्रपटाने तुफान यश मिळविल्यानंतर गोड चेहऱ्याच्या अमिषाच्या वाट्याला मात्र जास्त चित्रपट आले नाहीत. आपल्या अभिनयाने ती प्रेक्षकांना जिंकू शकली नाही. खासगी आयुष्यात सततच्या वादामुळे अमिषाचं बॉलीवूड करिअर कधीच उंचीवर गेलं नाही. पण अमिषाने हार मानली नाही. तिने स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस काढलं. तसंच तिच्या कंपनी आहेत ज्या बॉलीवूड संबंधित कामांशी निगडीत आहेत.  अमिषाने इकॉनॉमीमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं असून ती अभ्यासात अत्यंत हुशार होती. त्यामुळे तिने आपला मोर्चा व्यवसायाकडे वळवला. 

4. मयुरी कांगो

ADVERTISEMENT

Instagram

पापा कहते है, बेताबी, होगी प्यार की जीत, बादल आणि पापा द ग्रेट यासारख्या चित्रपटातून दिसलेला मराठमोठा चेहरा म्हणजे अभिनेत्री मयुरी कांगो. 1995 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट नसीममधून मयुरीने आपल्या बॉलीवूड करिअरला सुरूवात केली. पण मयुरीला यश मिळू शकले नाही. 2003 मध्ये एनआरआय आदित्य ढिल्लोसह लग्न करून ती US ला शिफ्ट झाली त्यानंतर तिने मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए केलं. आता ती गुगल इंडिया (Google India) ची हेड – एजन्सी बिझनेस आहे. मयुरीने बॉलीवूडपेक्षा एक वेगळंच क्षेत्र निवडून त्यामध्ये आपलं नाव कमावलं. आता ती गुरगावला असून मोठ्या पदावर कार्यरत आहे. 

नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेंडला इशारा, ‘माझ्या नावाचा वापर करण्याचं धाडस नको करू’

5. साहिल खान

ADVERTISEMENT

Instagram

आपल्या शरीरयष्टीसाठी ओळखला जाणारा साहिल खान हा 2001 मध्ये शरमन जोशीसह स्टाईल या चित्रपटातून सर्वांच्य समोर आला. पहिल्याच चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली. पण त्यानंतर साहिलला आपला जम बसवता आला नाही. पण साहिल आता एक उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. त्याचे गोव्यामध्ये फिटनेसचे ट्रेनिंग सेंटर आहे. साहिल सोशल मीडियावर अतिशय अॅक्टिव्ह असतो. मध्यंतरी त्याचे नाव आयेशा श्रॉफ अर्थात टायगर श्रॉफच्या आईसह जोडण्यात आले होते. पण याबाबत पुढे काहीही सिद्ध झाले नाही.

6. शिल्पा शेट्टी

Instagram

ADVERTISEMENT

गेल्या 13 वर्षांपासून शिल्पा शेट्टी बॉलीवूडपासून  दूर आहे. आता ती पुन्हा दोन चित्रपटातून येत असली तरीही ती आता एक उद्योजिका म्हणूनही प्रसिद्ध आहे. उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केल्यानंतर शिल्पाने IPL टीम विकत घेतली. त्यानंतरत तिने आपले योगा क्लास, स्पा सेंटर्स सुरू केले असून ती वेगवेगळ्या पातळीवर काम  करताना दिसत आहे. तिने आपले स्वतःचे अॅपही सुरू केले आहे. शिल्पा हे उत्तम आणि यशस्वी उद्योजिका म्हणून आता ओळखली जाते. बॉलीवूडमध्ये काही चित्रपट केल्यानंतर शिल्पाने आपला जम उद्योगात बसवला. आता पुन्हा एकदा ती बॉलीवूडमध्ये दुसरी इनिंग एन्जॉय करण्यासाठी तयार झाली आहे. 

Good news: शिल्पा शेट्टी पुन्हा आई, घरी आली लक्ष्मी

7. कुमार गौरव

Instagram

ADVERTISEMENT

कुमार गौरवने आपल्या करिअरची सुरुवात बॉलीवूडमधून केली. काही चित्रपट केल्यानंतर त्याने बॉलीवूडला रामराम ठोकला आणि मालदिव्स येथे टूरिझमचा व्यवसाय त्याने सुरू केला. एक उत्तम उद्योजक म्हणून कुमार गौरव आता काम करत आहे. त्याने 2002 मध्ये काटे या चित्रपटात संजय दत्तसह शेवटचे काम केले होते. त्याशिवाय कुमार हा संजय दत्तच्या बहिणीचा नवरा आहे हेदेखील फार कमी लोकांना माहीत आहे. पण बॉलीवूडमधील चित्रपट करून पैसे कमावण्यापेक्षा त्याने टूरिझमचा व्यवसाय करण्यात धन्यता मानली आहे. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

23 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT