ADVERTISEMENT
home / ज्योतिष
surya-shukra-yuti-2022-effects-on-zodiac-signs-in-marathi

Surya-Shukra Yuti 2022 – 4 राशींसाठी ठरणार खास

शुक्र हा आकर्षण, ऐश्वर्य, सौभाग्य, धन, प्रेम आणि वैभव याचा कारक मानला जातो. शुक्र बलवान असेल तर वैवाहिक जीवन हे अत्यंत सुखी ठरते, तसंच आपल्या मुलांकडूनही सुख प्राप्त होते. याशिवाय शुक्राची कृपा ही धनधान्याच्या बाबतीतही चांगली राहाते. तर ज्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती कमजोर असते त्याच्या आयुष्यात याच्या विपरीत घडते. बुध आणि शनि हे दोन्ही ग्रह शुक्राचे मित्र ग्रह मानले जातात. मात्र सूर्य आणि चंद्रासह यांची शत्रुता आहे. अत्यंत शुभ अशा मानल्या जाणाऱ्या शुक्राचा 07 ऑगस्ट, 2022 रोजी रविवारी मिथुन राशीतून निघून कर्क राशीमध्ये प्रवेश होत आहे. कर्क राशीत सूर्य पहिल्यापासूनच असून यामुळे शुक्र आणि सूर्याची युती होणार आहे. या युतीचा काही राशींवर चांगला तर काही राशींवर वाईट परिणाम होणार आहे. याबाबत अधिक माहिती तुम्हाला या लेखातून देत आहोत. 

शुक्र 07 ऑगस्ट, 2022 रोजी रविवारी पहाटे 5.12 वाजता कर्क राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर संपूर्ण 23 दिवस याच राशीत स्थिरावेल. 31 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा शुक्र पुढील मार्गक्रमण करण्यास पुढे जाईल. 

कोणत्या राशींवर शुभ प्रभाव होईल 

मेष (Aries)

Aries

आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत आनंद येईल. जोडीदारासह तुमचे नाते अधिक घट्ट होईल. यादरम्यान आपल्या जवळच्या व्यक्तीसह अधिक वेळ घालविण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. शुक्राच्या कृपेने तुम्हाला कोणत्याही मोठ्या चिंतेत न राहता त्यातून मुक्ती मिळेल. त्याचप्रमाणे तुमचा सन्मान वाढेल. यादरम्यान तुम्हाला निरोगी राहाता येईल. कोणताही आजार होणार नाही. 

मिथुन (Gemini)

Gemini

कुटुंबात सुख, शांती आणि समाधान राहील. घरातील व्यक्तींसह अत्यंत चांगला वेळ जाईल. तुमच्या जवळच्या व्यक्तींचा तुम्हाला चांगला सहयोग मिळेल. वैवाहिक जीवन सुखी राहील. तुमच्या मुलांसाठी हा काळ अत्यंत चांगला ठरणार आहे. तसंच तुम्हाला एखादी चांगली बातमीही मिळेल. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींपासून त्रासले असाल तर तुमच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी हा योग्य काळ आहे. विवाह योग जुळून येतील

ADVERTISEMENT

कन्या (Virgo)

Virgo

प्रेम आणि रोमान्ससाठी हा अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचा काळ आहे. जोडीदारासह तुमची जवळीक वाढेल. तसंच तुम्ही तुमच्या नात्यात पुढचं पाऊल उचलण्याचाही विचार कराल. तर लग्न झालेल्या जोडप्यांसाठीही हा काळ सुखद आहे. जोडीदारासह तुम्हाला अधिक वेळ घालविण्यास मिळेल. तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी अधिक वेळ मिळेल. आरोग्यासंबंधित तक्रारी दूर होतील आणि या दरम्यान मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वास्थ्य चांगले राहील. 

मकर (Capricorn)

Capricorn

शुक्राच्या कृपेने वैवाहिक जीवन अत्यंत सुखद होणार आहे. आयुष्यात आनंदच आनंद येईल. या कालावधीत तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल आणि नात्यात नवेपणा तुम्हाला जाणवेल. याशिवाय तुमच्या दोघांमधील प्रेमात वृद्धी होईल. आरोग्याची चिंता दूर होईल. 

या युतीदरम्यान या राशींनी सांभाळून राहावे

कर्क (Cancer)

Cancer

शुक्र आणि सूर्याच्या युतीचा सर्वात जास्त परिणाम हा तुमच्या वैवाहिक आयुष्यावर पडेल. यादरम्यान तुमच्यामध्ये भांडण होऊ शकते. लहान सहान गोष्टींवरही वाद होऊ शकतात. तुमचा मानसिक तणाव वाढेल आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रीत होऊ शकणार नाही. यादरम्यान तुमच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढतील. 

तूळ (Libra)

Libra

तूळ राशीवरील संकटे वाढताना दिसून येतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होईल. जोडीदाराचा सहयोग न मिळाल्यामुळे तुम्ही निराश राहा आणि त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे तुमच्यामधील दरी वाढेल. तसंच या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्याही निर्माण होतील. त्यामुळे सतर्क राहा. अचानक तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

धनु (Sagittarius)

Sagittarius

तुम्हाला तुमच्या स्वतःसह तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी या काळात घ्यायला हवी. या युतीचा वाईट परिणाम तुमच्या दोघांच्याही आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. लहानात लहान समस्येकडेही दुर्लक्ष करणं चुकीचं ठरू शकतं. ताणतणावापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. 

कुंभ (Aquarius)

Aquarius

या काळात तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे कडवट शब्द वैवाहिक जीवनात कलह वाढवू शकतात. आपल्या जोडीदारासह बोलताना तोलूनमापून बोला. रागात असल्यास, भावनांवर नियंत्रण ठेवा. लहानसहान गोष्टींवरून भांडण होत असेल तर टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे काळजी घ्या. 

शुक्र – सूर्य युती ही काही काळापुरतीच आहे मात्र तुमची यापैकी कोणती रास आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्की काळजी घ्या. 

सूचना – आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. ज्योतिष हे एक शास्त्र आहे आणि त्याच्या अभ्यासानुसार ही माहिती देण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT