ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सुव्रत जोशी साकारणार एक आगळी वेगळी भूमिका

सुव्रत जोशी साकारणार एक आगळी वेगळी भूमिका

दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला सुजय अर्थात आपला सुव्रत जोशीने अनेकांची मनं जिंकली होती. या मालिकेतील त्याचा कॉमेडी टायमिंग एकदम परफेक्ट होता. आता सुव्रत जोशी पुन्हा  एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. सुव्रत आता फुलवाल्याची भूमिका साकारणार आहे. शंतनू गणेश रोडे दिग्दर्शन करत असलेल्या “गोष्ट एका पैठणीची”या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू झालं आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेच्शो फिल्म्स गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अभिनेत्री सायली संजीव या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सायलीसह सुव्रत जोशीचीही अतिशय वेगळी आणि महत्त्वाची भूमिका आहे. भोर इथं या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. फुलवाल्याच्या भूमिकेसाठी फुलपुडी बांधण्यापासून  ते बुके तयार करण्यापर्यंत काही खास कौशल्यं सुव्रतनं शिकून घेतली आहेत. 

सुव्रत साकारणार हटके भूमिका

‘माझ्या रोजच्या जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं असलेल्या, मी कधीही अनुभव न घेतलेल्या विश्वातल्या भूमिका मला करायला आवडतात. कारण अभिनेता म्हणून त्यात आव्हान असतं. या  चित्रपटातील फुलवाल्याची भूमिकाही तशीच आहे. या भूमिकेसाठी कित्येक फुलवाल्यांचं तासनतास निरीक्षण केलं. फुलपुडी बांधणं, झटपट हार करणं, बुके तयार करणं शिकून घेतलं. ही कामं एका अर्थानं कलाच आहे असं मला वाटतं. “गोष्ट एका पैठणीची”या चित्रपटाची कथा अतिशय सुंदर आहे. या चित्रपटाचा मी एक भाग आहे हा आनंदाचा आणि समृद्ध करणारा अनुभव आहे,’ असं सुव्रतनं सांगितलं. सहाजिकच सुव्रतला या हटके भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत.

सुव्रत आणि सखीची लव्हस्टोरी

एप्रिल महिन्यात सुव्रत जोशी आणि सखी गोखले लग्नबंधनात अडकले. त्या आधी अनेक वर्ष ही दोघं  एकमेंकांना डेट करत होते. सखी गोखले ही अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे. सुव्रत आणि सखीच्या प्रेमाचं सूत’ दिल, दोस्ती, दुनियादारी’मध्ये जुळलं होतं. दिल दोस्ती दोबाराच्या दुसऱ्या भागातमध्येही हे दोघं एकत्र होते. त्यानंतर त्यांनी मराठी नाटक अमर फोटो स्टुडिओमध्येही एकत्र काम केलं  होतं. सोशल मीडियावरील अनेक पोस्टवरून त्यांनी एकमेकांचे प्रेम जगजाहीर केलं होतं. सखी गोखले आता लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत आहे तर सुव्रतचा डोक्याला शॉट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला होता.

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

#brokenbutbeautiful: विक्रांत मेस्सीने साखरपुडा झाल्याची गोड बातमी केली शेअर

ADVERTISEMENT

‘तारक मेहता’मधील अभिनेत्री प्रिया अहुजाच्या घरी आला नवा पाहुणा, शेअर केला फोटो

प्रियांका चोप्रा जगभरात गुगल सर्चवर सर्वात पुढे

चर्चा तर होणारच! अर्जुनसंदर्भात सर्वांसमोर मलायकानं केलं मोठं विधान

 

ADVERTISEMENT
08 Dec 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT