वाहतुकीचे नियम सर्वांना सारखेच असतात. मग ती व्यक्ती सामान्य नागरिक असो वा कोणी मोठी सेलिब्रेटी. भर रस्त्यात बिना हेल्मेट बाईक चालवणं हा एक अपराध आहे आणि यासाठी चांगलाच दंड सर्वसामान्यांना भरावा लागतो. नुकतंच एका अभिनेत्री हा वाहतुकीचा नियम धाब्यावर रस्त्यावरून बिना हेल्मेट बाईक चालवली ज्यामुळे तिला चांगलाच दंड भरावा लागला. जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री जिला रस्त्यावर बाईक चालवताना हेल्मेट घालणं लक्षात नाही राहीलं.
या अभिनेत्री का चालवली हेल्मेट शिवाय बाईक –
बिना हेल्मेट बाईक चालवणारी ही अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ आहे. तापसी नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. आता ती हेल्मेटशिवाय बाईक चालवण्यामुळे चर्चेत आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने ही गोष्ट स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. बिनधास्त स्वभावाच्या तापसीने स्वतःच हा अपराध मान्य केला असून त्यासाठी तिने यासाठी दंड भरल्याची बातमीदेखील चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने तिचा बाईक चालवताना एक फोटो आणि त्यासोबत एक कॅप्शन सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहीलं आहे की, “हा फोटो काही काळापुर्वीचा आहे जेव्हा मला हेल्मेट न घातल्याबद्दल दंड भरावा लागला होता” या फोटोत तापसीने डेनिम जीन्स आणि जॅकेट परिधान केलेलं आहे. मागच्या बाजूने काढलेला बाईक चालवत असलेला हा तापसीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय तिच्या या प्रामाणिकपणाबद्दल तिचं चाहत्यांकडून कौतुकदेखील होत आहे.
तापसी पन्नू रश्मि रॉकेटसाठी करत आहे प्रचंड मेहनत –
तापसी पन्नूचा हा फोटो तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काढलेला आहे. हा फोटो रश्मि रॉकेट या शूटिंग सेटवरील आहे. ज्या चित्रपटात तापसी बाईक चालवताना दिसणार आहे. रश्मि रॉकेट हा एक स्पोटर्स ड्रामा असून तापसी त्यामध्ये अॅथलीटची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश खुराना करत असून या चित्रपटाची कथा नंदा पेरियासामी, अनिरूद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांनी लिहीलेली आहे. रोनी स्क्रुवाला, नेहा आनंद आणि प्रांजल फिल्मस या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
तापसी या चित्रपटासाठी तिच्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहे. कडक डाएट आाणि वर्कआऊट करून गेल्या दोन महिन्यामध्ये तापसीने जबरदस्त शरीरयष्टी कमावली आहे. ज्यामुळे ती खऱ्याखुऱ्या अॅथलीटप्रमाणे दिसत आहे. स्पोर्टस ग्राऊंडवर वर्क आऊट करत असलेले तापसीचे काही फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिवाय स्पोर्ट लुक दाखवण्यासाठी तापसी या चित्रपटा बाईक चालवतानाही दिसणार आहे. ज्या शूटिंग दरम्यानच तापसीला हेल्मेट न घातल्यामुळे दंड भरावा लागला होता. आता एवढी चर्चा झाल्यावर प्रेक्षकांना तापसीला या स्पोटर्स लुकमध्ये पाहण्याची नक्कीच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर तापसी हसीना दिलरूबा, शाबास मिठ्ठू, लूप लपेटा या आगामी चित्रपटांच्या तयारीला लागणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी तापसीचे एका पाठोपाठ धमाल चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
टीव्हीवर ठरले हिट, पण बॉलीवूडमध्ये अनफिट, कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या
सनी लिओनी वापरतेय असा वेगळा मास्क, मेकअप होत नाही खराब
Bigg Boss 14: कविता कौशिकचा सलमानवर गंभीर आरोप, सोडायचा आहे शो