ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
पालक भाजी

पालकची तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर …

पालेभाज्या खायला मुलांना काय खूप मोठ्यांनाही कंटाळा असतो. पण पालकामध्ये असलेले लोह आणि अन्य घटक हे तुमच्या शरीरासाठी खूपच चांगले असतात. पण पालकाची शक्यतो आपण पालक पनीरची भाजी करतो. पण पालक पनीर खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पालकापासून काही वेगळ्या आणि हटके भाज्या बनवू शकता. ज्या भाज्या तुमच्या तोंडाची चव वाढवण्यास नक्कीच मदत करतील. जाणून घेऊया पालकापासून तयार झालेल्या सोप्या रेसिपीज.

पालक सुकी

पालक भाजी

ज्या प्रमाणे आपण मेथीची सुकी भाजी करतो. अगदी त्याच प्रमाणे तुम्हाला पालकापासून सुकी भाजी करता येते. ही भाजी करण्यासाठी फारसा वेळही लागत नाही. पण याची चव अप्रतिम लागते. ही भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे 

साहित्य: बारीक चिरलेला पालक, चवीनुसार मिरचीचा ठेचा आणि मीठ, लसणीच्या पाकळ्या, तेल. शेंगदाण्याचा कूट 

कृती:  एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये मिरचीचा ठेचा घाला आणि लसणीच्या पाकळ्या ठेचून घाला. तेलात छान लालसर झाल्यावर मग त्यामध्ये बारीक चिरलेला पालक घाला. मीठ घालून शिजवून घ्या. पालक चांगला आवळला की, मग त्यामध्ये दाण्याचा कूट घाला. भाजी शिजवा. थोडी सुकीच करा ही भाजी चवीला एकदम मस्त लागते. 

ADVERTISEMENT

तुम्हाला मिरचीची चव लागावी असे वाटत असेल तर मिरचीचा ठेचा घालणेच चांगले. त्यामुळे त्याची चव चांगली लागते. 

कॉर्न पालक लसूणी

कॉ्र्न पालक लसूणी

पालक लसूणी हा प्रकार देखील तु्म्ही नक्कीच ऐकला असेल. जर तुम्हाला लसूणची ही चव आवडत असेल तर तुम्ही पालक लसूण रेसिपी देखील बनवू शकता. 

साहित्य: एक वाटी कॉर्न, 2 वाटी पालक चिरलेला, बारीक चिरलेला लसूण, लसणीची पेस्ट, क्रिम, मीठ, तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर 

कृती : एका भांड्यात पालक आणि मिरची चांगले वाफवून घ्या. वाफवून थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट करा. किंवा तसे ठेवले तरी देखील चालू शकेल. 

ADVERTISEMENT

एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये लसणीची फोडणी द्या. लसूण चांगली लाल झाली की, त्यामध्ये पालकाचा गर घाला. त्यामध्ये लसणीची पेस्ट घालून चांगले शिजवून घ्या. त्यामध्ये शिजवलेले कॉर्न घाला. वरुन थोडेसे क्रिम घालून ही भाजी शिजवून घ्या. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वरुन फोडणी देखील देऊ शकता.  त्यामुळे भाजी अधिक चुरचुरीत लागते. 

आता तुम्हाला काहीतरी वेगळे खायचे असेल तर तुम्ही मस्त पालकाची भाजी खाऊ शकता. 

अधिक वाचा

घरी खुसखुशीत सामोसा बनवायचा असेल तर, सोप्या ट्रिक्स

ADVERTISEMENT

शेपूची भाजी खाण्याचे फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत | Shepuchi Bhaji Benefits In Marathi


18 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT