भारतातील घराघरात भगवान श्रीरामांची पूजा केली जाते. मर्यादा पुरूषोत्तम अशी ख्याती असलेल्या श्रीरामाचे जीवन चरित्रावर आजवर अनेक मालिका आणि चित्रपट तयार करण्यात आले आहेत. एक काळ असा होता जेव्हा टिव्हीवर रामानंद सागर यांची रामायण ही मालिका सुरू झाली की संपूर्ण कुटुंब एकत्र बसून ही पौराणिक मालिका पाहत असे. लोक टिव्हीसमोर हात जोडून ही मालिका पाहत असत. या मालिकेचा प्रभाव आजही अनेकांवर दिसून येतो. म्हणून लॉकडाऊनच्या काळात दोनदा या मालिकेचे पुनःप्रसारण करण्यात आले. रामनवमी हा भगवान श्रीरामांचा जन्मदिवस… भारतात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यासाठीच या निमित्ताने जाणून घेऊ या कोणकोणत्या कलाकारांनी आजवर पडद्यावर श्रीराम साकारले आहेत आणि रामभक्तांना द्या या श्रीराम नवमीच्या शुभेच्छा आणि रामभक्त हनुमान जंयतीच्या शुभेच्छा
अरूण गोविल (Arun Govil)
आजवर रामायणावर आधारित अनेक मालिका आणि चित्रपट आले. ज्यामध्ये अनेकांनी श्रीरामाची भूमिका साकारली. मात्र या सर्वांमध्ये श्रीरामरूपात नेहमीच सर्वांच्या लक्षात राहिले ते अभिनेता अरूण गोविल. रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका 1986 मध्ये टिव्हीवर पहिल्यांदा प्रसारित झाली होती. ज्यामध्ये रामरूपात अभिनेता अरूण गोविल यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील श्रीरामाची भूमिका लोकांच्या इतकी स्मरणात आहे की आजही अरूण गोविल यांच्याकडे पाहून लोक आदराने हात जोडतात. अरूण गोविल यांनी रामायण व्यतिरिक्त अनेक हिंदी, भोजपूरी आणि ब्रिज भाषेतील मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. मात्र आजही लोक त्यांना श्रीराम या नावानेच ओळखतात.
गुरूमीत चौधरी (Gurmeet Choudhary)
अभिनेता गुरूमी चौधरीनेही श्रीरामाची भूमिका मालिकेमधून साकारली आहे. गुरूमीतने त्याच्या करिअरची सुरूवातच या मालिकेपासून केली होती. गुरूमीतने 2008 मध्ये टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या ‘रामायण’ मालिकेत ही भूमिका साकारली होती. त्यानंतर गुरुमीतने आजवर अनेक डॅशिंग हिरोच्या भूमिका साकारल्या असतील. मात्र त्याला खरी ओखळ रामायणामधील श्रीराम या भूमिकेनेच मिळाली होती.
पियुष सचदेव (Piyush Sachdeva)
‘देवों के देव महादेव’ ही मालिका भगवान शंकराचरित्रावर आधारित होती. ज्यामध्ये भगवान शंकराची भूमिका महित रैनाने साकारली होती. मात्र या मालिकेत एका छोट्या भूमिकेतून पियुष सचदेवलाही एक वेगळी ओळख मिळाली होती. पियुषने या मालिकेत काही काळासाठी श्रीरामाची भूमिका साकारली होती.
आशिष शर्मा (Ashish Sharma)
टिव्ही मालिकेतील श्रीरामाची लोकप्रियता पाहता अनेक मालिका श्रीरामाच्या चरित्रावर आधारित तयार करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये ‘सिया के राम’ या मालिकेचाही समावेश आहे. या पौराणिक मालिकेलाही चांगली लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत श्रीराम साकारले होते अभिनेता आशिष शर्माने. आशिषने या मालिकेआधी चंद्रगुप्त मौर्य, रंगरसिया अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलेलं असल्यामुळे आशिषची स्वतंत्र ओळख आधीच झालेली होती. मात्र सिया के राममधील त्याची रामाची भूमिका चाहत्यांना जास्त आवडली.
गगन मलिक (Gagan Malik)
२०१२ मध्ये आणखी एकदा टिव्हीवर ‘रामायण’ मालिका सुरू करण्यात आली. मात्र आधीच्या दोन रामायण मालिकांपेक्षा या मालिकेला जास्त प्रसिद्धी मिळू शकली नाही. या मालिकेत अभिनेता गगन मलिकने श्रीरामाची भूमिका साकारली होती. ही मालिका विषेश प्रसिद्ध झाली नसली तरी या मालिकेतील गगन मलिकच्या अभिनयाचे मात्र चांगलेच कौतुक झाले होते. ज्यामुळे त्याला नंतर संकटमोचन महाबली हनुमान या मालिकेतही हनुमान साकारण्याची संधी मिळाली. श्रीरामाची महती आणि महत्त्व जाणून घेण्यासाठी पाहा भारतातील ही प्रसिद्ध श्रीराम मंदिरे (Famous Ram Mandir In India In Marathi)
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम