ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘ठाकरें’च्या मागील खरा चेहरा रोहन मापुस्कर

‘ठाकरें’च्या मागील खरा चेहरा रोहन मापुस्कर

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘ठाकरे’ चित्रपटाची. नवाजुद्दीन सिद्दीकी ठाकरेंच्या गेटअपमध्ये अगदी बाळासाहेब ठाकरेंसारखाच दिसत आहे. शिवाय त्याने उचललेली ठाकरेंची प्रत्येक अदा ही वाखाणण्याजोगी आहे. मात्र या भूमिकेसाठी नवाजुद्दीनच योग्य आहे हे नक्की कोण ठरवतं? कोणत्याही भूमिकेसाठी कोणता अभिनेता किंवा कोणती अभिनेत्री योग्य आहे हे नक्की कसं कळतं. त्या त्या भूमिकेसाठी हे कलाकार कसे परफेक्ट सूट होतात याचा विचार आपल्यासारख्या प्रेक्षकांच्या मनात नेहमीच येत असतो. अर्थात प्रत्येकाला कास्टिंगबाबत माहीत असतं. पण नक्की कास्टिंग म्हणजे काय? त्याची काय प्रक्रिया असते याची मात्र कल्पना आपल्याला नसते आणि याचं अप्रूप प्रत्येकालाच वाटत आलं आहे. वास्तविक आता यासाठी कास्टिंग डायरेक्टर्सही असतात. पण नक्की हे कास्टिंग डायरेक्टर काय करतात हा प्रश्न आपल्याला सर्वांनाच पडतो नाही का? तर या सगळ्या प्रश्नांनी उत्तरं मिळण्यासाठी ‘ठाकरे’ या चित्रपटाचा कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्करशी ‘POPxo Marathi’ ने बातचीत केली. रोहनकडून जाणून घेतल्या काही खास गोष्टी.

rohan mapuskar

रायगडमधील अप्रतिम सौंदर्य लाभलेल्या श्रीवर्धन या गावातून आलेल्या रोहन मापुस्करची स्वप्नं फार काही मोठी नव्हती. कास्टिंग हा तर खूप पुढचा मुद्दा याचा विचार केला नव्हता. पण जे काम करायचं हे अतिशय प्रामाणिकपणे करायचं हा त्याचा फोकस होता. रोहनचा मोठा भाऊ याच व्यवसायात होता. त्याच्याकडे बघून रोहनने या इंडस्ट्रीमध्ये यायचं ठरवलं आणि या व्यवसायात आल्यानंतर इथलं जग अजून आवडायला लागलं आणि मग संधी मिळाली ती राजकुमार हिरानी यांच्याबरोबर काम करण्याची. ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटासाठी रोहनने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. त्याच्या करिअरला वळण मिळालं ते यानंतर. राजकुमार हिरानीबरोबर एका अॅडमध्ये माणूस शोधण्याचं काम रोहनला करावं लागलं आणि तो परफेक्ट माणूस शोधून दिल्यानंतर कास्टिंग डायरेक्टर म्हणून एक वेगळं क्षेत्र त्याच्यासाठी उघडलं.

वाचा – संजय जाधव यांच्या ‘लकी’ (Luckee) चित्रपटाचं ट्रेलर रिलीज

ADVERTISEMENT

thackray
कास्टिंग म्हणजे नेमकं काय?

कास्टिंग म्हणजे नेमकं काय हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. कारण कास्टिंग काऊचबद्दलच आतापर्यंत चर्चा झाल्या आहेत. पण नक्की कास्टिंग होतं म्हणजे काय होतं याचा बऱ्याच प्रेक्षकांना काहीच मागमूस नसतो. याविषयी रोहनशी चर्चा केल्यावर रोहनने सांगितलेल्या व्याख्येत अगदी स्पष्टे होतं की, कास्टिंग म्हणजे नेमकं काय? रोहनने अतिशय कमी पण योग्य शब्दात याची व्याख्या केली आहे जी अगदी चपखल आहे. ‘चेहरा शोधून त्याला योग्य चेहरा फिट करणं हेच खरं कास्टिंग’. चित्रपटामध्ये नक्की काय कॅरेक्टर आहे आणि त्यासाठी कसा अभिनेता अथवा अभिनेत्री हवी याचा विचार होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी नेहमी नेहमी एकच चेहरा योग्य नसतो. प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी बाजू असते आणि त्यासाठी तुम्हाला योग्य चेहरा हवा असतो. त्यासाठी त्या कॅरेक्टरचा विचार करावा लागतो. त्यानुसार त्या कॅरेक्टरला साजेसा नक्की कोणता चेहरा आहे हे बघावं लागतं. त्यासाठी प्रत्येक वेळी अगदी नावाजलेला चेहराच हवा असं नाही. त्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे हे बघावं लागतं आणि त्यानुसार कास्टिंग होत असतं असं रोहननं सांगितलं. त्यामुळे ठाकरे या चित्रपटाच्या मागील खरा चेहरा रोहन मापुस्कर आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

वाचा – ‘टोटल धमाल’चं धमाल ट्रेलर, अजय – अनिल- माधुरीचा तडका

‘व्हेंटिलेटर’चं कास्टिंगही रोहनने केलं

ADVERTISEMENT

मराठी चित्रपटामध्ये ‘व्हेंटिलेटर’या चित्रपटाचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. कारण यातील प्रत्येक पात्र अगदी आजही प्रेक्षकांच्या मनात राहिलं आहे. अगदी हळवी कथा असली तरीही त्यातील प्रत्येक लहान – सहान पात्रही तितकंच महत्त्वाचं होतं. हा चित्रपट असा होता ज्यामधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं आहे. अगदी बऱ्याच वर्षांनी चित्रपटामध्ये दीपक शिर्केंना पाहून प्रेक्षकांनाही आनंद झाला होता आणि ती व्यक्तिरेखा दीपक शिर्केंनेही अप्रतिम साकारली होती. मग अशावेळी कोणता कलाकार कोणत्या भूमिकेसाठी योग्य आहे हे लक्षात आणून देणं आणि पटवून देणं हेदेखील कास्टिंग डायरेक्टरसाठी महत्त्वाचं असतं. रोहनने हे अगदी व्यवस्थित ओळखलं आहे आणि म्हणूनच त्याचं कास्टिंग चित्रपटासाठी योग्य अभ्यास करूनच करण्यात आलेलं आहे हे आपल्याही लक्षात येतं.

‘पानीपत’चा वेगळा अनुभव

panipat

वास्तविक कास्टिंग करताना त्यावेळचा काळ कोणता आहे त्याप्रमाणे माणसं लक्षात घ्यायला हवीत. आगामी आशुतोष गोवारीकरच्या पानिपतसाठीही रोहनने कास्टिंग केलं आहे. पानीपत म्हणजे पेशवे आणि मुघल हे दाखवणं अतिशय आव्हानात्मक काम. त्याकाळी अतिशय वेगळी व्यक्तिमत्त्व होती. अतिशय धिप्पाड आणि वेगळीच माणसं होती. त्याप्रमाणे या चित्रपटात कलाकार निवडायचे होते. प्रत्येक चेहऱ्यात एक क्वर्किनेस हवा असं रोहनचं मत आहे. त्यामुळे प्रत्येक कास्टिंग करताना प्रत्येक चित्रपटासाठी कास्टिंग करण्याची गंमत वेगळी आहे. कॅरेक्टर जसं डेव्हलप होतं त्याप्रमाणे सहसा कास्टिंग ठरवलं जातं. पण अगदीच तसं नसेल तर नक्की कसा माणूस हवा स्केच काढूनही ठरवण्यात येतं. त्यासाठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी चर्चा करून ठरवण्यात येतं.

ADVERTISEMENT

वाचा – ‘ठाकरे’ चित्रपटाचं ट्रेलर लाँच

रोहनच्या म्हणण्याप्रमाणे अजूनही कास्टिंग डायरेक्टरला किंवा कास्टिंगला तेवढं महत्त्व आलं नाहीये. पण आता हळूहळू याला महत्त्व यायला लागलं आहे आणि कास्टिंग करणं विकसित व्हायला लागलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या चित्रपटांमध्ये जास्त चांगलं कास्टिंग प्रेक्षकांना पाहता येईल असा विश्वासही रोहनने व्यक्त केला आहे. आता ठाकरे प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कास्टिंग बघून तुम्हालाही याचा अंदाज नक्कीच येईल.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

22 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT