ADVERTISEMENT
home / Recipes
थालिपीठाची भाजणी

खमंग भाजणी थालीपीठ रेसिपीज (Thalipeeth Bhajani Recipe In Marathi)

कांदे पोहे, साबुदाणा खिचडी, उपमा, साबुदाणे वडे, भाजीपोळी, भाकरी भाजी, थालिपीठ, घावण…. असा नाश्ता सर्वसाधारणपणे प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात केला जातो.  या नाश्त्यािवाय कोणत्याही महाराष्ट्रीयन घराची ओळख होऊच शकत नाही. नाशत्यासाठी थालिपीठ हा पर्याय खूप जणांना आवडतो. गरम गरम थालिपीठ त्यावर मस्त लोण्याचा गोळा किंवा दही हे कॉम्बिनेशन खूप जणांना आवडते. थालिपीठाची भाजणी खपू जण घरीच करतात. तर काही जण रेडीमेड भाजणीचा पर्याय स्विकारतात.  पण थालिपिठाती भाजणी घरी करणं फारच सोपं आहे. हे करण्यासाठी फारसा वेळ जात नाही. योग्य प्रमाण घेतलं तर भाजणी ही नेहमीच छान परफेक्ट होते. या परफेक्ट झालेल्या भाजणीमध्ये तुम्ही कांदा, कोथिंबीर घातली आणि कणीकप्रमाणे पाणी घालून भाजणी छान मळून घेतली की, त्याची खुसखुशीत आणि कुरकुरीत थालिपीठं तयार होतात. थालिपीठाची कृती वाचूनच खूप जणांना तोंडाला पाणी सुटलं असेल नाही का ? मग थालीपीठ भाजणी रेसिपी मराठी (Thalipeeth Bhajani Recipe) जाणून घेऊया.

पारंपारिक भाजणीचे थालीपीठ रेसिपी मराठी (Traditional Thalipeeth Bhajni Recipe In Marathi)

सौजन्य : Instagram

पारंपरिक भाजणीचे थालीपीठ खाल्ले असेल तर त्याला एक वेगळाच खुसखुशीतपणा असतो. अशी भाजणी कशी तयार करायची त्याचे योग्य प्रमाण जाणून घेऊया.

साहित्य : 1 वाटी मूगाची डाळ, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी चण्याची डाळ, १ वाटी मटकी, 1 वाटी गव्हाचे पीठ , धणे


कृती :

– सगळ्या डाळी स्वच्छ करुन त्या कडक उन्हात वाळवून घ्या. 
– डाळी छान वाळल्यानंतर एका मोठ्या कढईत सगळ्या डाळी एक एक करुन भाजून घ्या. 
– डाळी तांदूळ छान खरपूस भाजून झाल्या की ताटात काढून घ्या. त्याच कढईत मूठभर धणे घालून भाजून घ्या.
– सगळ्या डाळी थंड झाल्यानंतर आता वाटून घ्या. 
– कमी प्रमाण असेल तर तुम्हाला घरीच भाजणी दळता येईल. त्यात गव्हाचे पीठ घाला. 
– तुमची थालिपीठाची भाजणी तयार आहे. आता याचे थालिपीठ बनवताना थालिपीठाची हवी तेवढी भाजणी घ्या. 
– त्यात हळद, तिखट, मीठ, बारीक चिरलेला कांदा- कोथिंबीर घाला. 
– पीठ पाणी घालून मळून घ्या. त्याचे थालिपीठ थापून मस्त लोण्यासोबत सर्व्ह करा.

ADVERTISEMENT

उपवास थालीपीठ भाजणी रेसिपी मराठी (Upwas Thalipeeth Bhajani Recipe In Marathi)

सौजन्य : Instagram

उपवासाच्या दिवशी नेहमीची मिश्र डाळीची भाजणी केलेले थालिपीठ खाता येत नाही. अशावेळी तुम्ही उपवास थालीपीठ भाजणी करु शकता. ही भाजणी करणे देखील फारच सोपे आहे. 

साहित्य : 1 कप साबुदाणा, 1 कप राजगिरा, 1 ½ कप वरई, 1 चमचा जीरे

कृती :  

– एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये सगळ्यात आधी साबुदाणे भाजून घ्या.
– साबुदाणा भाजायला घेतल्यानंतर तो छान फुलेस्तोवर भाजायचा असतो. साबुदाणा छान भाजला की, तो अधिक पांढराशुभ्र आणि हलका दिसू लागतो.
– साबुदाणा काढून घ्या आणि आता त्यामध्ये राजगिरा घालून तो छान परतून घ्या. वरईदेखील अशाच पद्धतीने छान भाजून घ्या.सगळ्यात शेवटी जीरे भाजा.
– सगळे साहित्य एकत्र करुन घ्या. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. रव्याच्या चाळणीतून चाळून घ्या. 
– ही भाजणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये मिरची, कोथिंबीर, मीठ आणि थोडीशी हळद घालून कणीक मळून थालिपीठ थापून छान खरपूस भाजा. 
– मस्त दह्यासोबत हे थालिपीठ सर्व्ह करा. 

ADVERTISEMENT

पौष्टिक थालीपीठ भाजणी रेसिपी मराठी (Protein Rich Thalipeeth Bhajni Recipe Marathi)

 

Thalipeeth Bhajani Recipe Marathi

थालिपीठ हा असा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो अत्यंत पौष्टिक आहे. या थालिपीठाला तुम्हाला अधिक पौष्टिक करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पौष्टिक थालिपीठ बनवू शकता.

साहित्य :

1 कप तांदूळ, 1 कप गहू, 1 कप बाजरी, 1 कप नाचणी, 1 ज्वारी, ½ वाटी धणे

कृती :

ADVERTISEMENT

– कढई गरम करुन त्यामध्ये एक-एक करुन तांदूळ, गहू, बाजरी, नाचणी, ज्वारी चांगले भाजून घ्या. 
– भाजलेले साहित्य थंड झाले की, ते मिक्सरमध्ये हळुहळू करुन वाटून घ्या. 
– रव्याच्या चाळणीमध्ये ते छान चाळून घ्या. 
– थालिपीठ बनवण्याची ही कृती अगदी तशीच आहे. 
– तुम्ही असे थालिपीठ यामध्ये काकडीचा गर घालू शकता. 

मिक्स व्हेज थालीपीठ भाजणी रेसिपी मराठी (Mix Veg Thalipeeth Bhajani Recipe Marathi)

सौजन्य : Instagram

मिक्स थालिपीठ हे देखील चवीला फारच छान लागते. थालिपीठाच्या भाजणीमध्ये काही ताज्या भाज्या घालूनही तुम्हाला असे मिक्स व्हेज थालिपीठ करता येतात.

साहित्य :

थालिपीठाची भाजणी, आवडीच्या भाज्या काकडी, गाजरचा किस, बटाटाच्या किस (किंवा आवडीच्या कोणत्याही भाज्यांचा किस)

कृती :

ADVERTISEMENT

– थालिपीठाच्या भाजणीमध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यांचा किस घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. 
– काही भाज्यांना पाणी सुटते त्यामुळे सगळ्यात शेवटी त्यामध्ये गरजेनुसार पाणी घाला.
– थालिपीठ भाजून घ्या. मस्त लोण्याच्या गोळ्यासोबत थालिपीठ खा. 

मिक्स डाळींचे भाजणी थालिपीठ (Mix Cereals Thalipeeth Bhajani Recipe In Marathi)

सौजन्य : Instagram

मिक्स डाळींचा उपयोग करुन देखील तुम्ही थालिपीठ भाजणी रेसिपी करु शकता. तुम्ही ही भाजणी करुन थालिपीठ करु शकता

साहित्य :

1 वाटी मुगाची डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, मूग, मटकी, मीठ,जीरे, धणे.

ADVERTISEMENT

कृती : 

– सगळे साहित्य एक एक करुन चांगले भाजून घ्या
– सगळ्यात शेवटी धणे-जीरे भाजून घ्या. आता मिक्सरमधून हे सगळे साहित्य वाटून घ्या तुमची मिक्स डाळींची भाजणी तयार
– आता एका परातीत भाजणी घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ, घाला.
– थालिपीठ तव्यावर भाजून थापून घ्या. लोण्याच्या गोळ्यासोबत सर्व्ह करा.

घरगुती थालीपीठ भाजणी करण्याच्या टिप्स (Tips For Perfect Thalipeeth Bhajni At Home)

  1. थालीपीठाची भाजणी घरी करणे हे फारच सोपे असते. थालिपीठीची भाजणी बनवण्यासाठी तुम्हाला  चांगल्या डाळी आणि कडधान्यांची गरज असते.  त्यासाठी वेगवेगळ्या डाळींचा उपयोग करा. 
  2. थालिपीठासाठी डाळी वापरताना तुम्ही त्या डाळी स्वच्छ धुवून ठेवा. डाळी कोरड्या झाल्याशिवाय तुम्ही त्याचा वापर करु नका. नाहीतर पीठ खराब होतात
  3. थालिपीठाची भाजणी ही जास्तीत जास्त दोन महिने ठेवा. नाहीतर त्याचा फ्लेवर उडून जातो. त्यामुळे ही काळजी घ्यायला विसरु नका. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1.उपवासाची भाजणी म्हणजे काय ?

उपवासाला जे थालिपीठ केले जाते त्यामध्ये डाळी नाही तर उपवासाचे घटक असतात. उपवासाच्या या भाजणीमध्ये शिंगाडा पीठ, राजगीरा पीठ, रताळ्याचे पीठ, भगरीचे पीठ अशा वेगवेगळ्या पीाठांचा समावेश असतो. यामध्ये उकडलेला बटाटा घालून तुम्ही मस्त थालिपीठ बनवू शकता. 

2. थालिपीठाची रेडीमेड भाडणी उत्तम पर्याय आहे का ?

ज्यांना थालिपीठाची भाजणी करायची माहीत नसते अशी लोकं खूप वेळा रेडिमेड भाजणीचा पर्याय निवडतात. जे घरी बनवलेल्या भाजणीपासून थालिपीठ खातात. त्यांना नक्कीच रेडिमेडची चव आवडणार नाही. पण ज्यांनी थालिपीठाचा आनंद कधीच घेतला नाही त्यांना थालिपीठाची ही चव आवडू शकते. त्यामुळे ज्यांना वेळ नाही आणि ज्यांच्याकडे सोय नाही त्यांच्यासाठी रेडिमेड भाजणी हा एक उत्तम पर्याय आहे.

ADVERTISEMENT

3. एका थालिपीठामध्ये किती कॅलरीज असतात ?

थालिपीठ हा अतिशय पौष्टिक असा महाराष्ट्रीयन नाश्त्याचा प्रकार आहे. खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने थालिपीठ करतात. एका थालिपीठामध्ये 70 ते 100 कॅलरीज असतात. तुम्ही डाएटवर असलात तरी देखील तुम्ही थालिपीठ खाऊ शकता. कारण हा पूर्णान्न असा आहार आहे.

अधिक वाचा :


अशी बनवा चमचमीत घेवड्याची भाजी रेसिपी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)

चमचमीत पास्ता रेसिपी मराठीत (Pasta Recipe In Marathi)

ADVERTISEMENT

चिकनच्या मस्त रेसिपीज मराठीत (Chicken Recipes In Marathi)

11 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT