ADVERTISEMENT
home / Recipes
Chicken Recipes In Marathi

चिकनच्या मस्त रेसिपीज मराठीत (Chicken Recipes In Marathi)

 

रविवार असेल आणि चिकनचा मस्त बेत असेल तर रविवार हा रविवार असल्यासारखा वाटतो. साधारण पावसाळा सुरु झाला की, एकदा तरी मृग नक्षत्रात चिकनचा बेत केला जातो. सगळ्यांची आवडती चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi) किंवा गावरान चिकन आणि वडे हे मालवणी पद्धतीचे कॉम्बिनेशन. नागपूर म्हटले की सावजी चिकन, घाटावर गेल्यानंतर चिकनचा तांबडा- पांढरा रस्सा असे काही प्रकार अगदी आवर्जून खाल्ले जातात. पण रोज रोज चिकनच्या त्याच त्याच रेसिपी खाऊन कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी चिकनच्या काही वेगळ्या आणि हटके रेसिपीज निवडल्या आहेत. अगदी स्टाटर्सपासून ते मेनकोर्सपर्यंत अशा या सगळ्या रेसिपीजचा यामध्ये समावेश असून या सगळ्या रेसिपी एकदम झक्कास होतात. चिकन हे प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. जर तुम्ही चिकन खात असाल तर तुम्ही आहारात वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा समावेश करायला हवा. चला जाणून घेऊया चिकन रेसिपी मराठी (Chicken Recipe In Marathi). सगळयात आधी जाणून घेऊया काही ग्रेव्ही रेसिपीज.

चिकन ग्रेव्ही रेसिपी (Chicken Gravy Recipes In Marathi)

 

मेनकोर्ससाठी जर तुम्हाला चिकनच्या काही ग्रेव्ही रेसिपीज करायच्या असती तर तुमच्यासाठी काही मस्त चिकन ग्रेव्ही रेसिपीज निवडल्या आहेत. ज्या तुम्ही नक्की ट्राय करायला हव्यात.

मालवणी चिकन (Malvani Chicken)

Malvani Chicken

Malvani Chicken

 

कोणतीही चिकनची डिश ही मालवणी चिकनशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. चिकन म्हटले की, मालवणी चिकन हे अगदी आवर्जून खाल्ले जाते.  मालवणी चिकन बनवणेे तसे फार कठीण ही नाही.

ADVERTISEMENT

साहित्य: 1 किलो ब्रॉयरल चिकन किंवा गावठी कोंबडी, एक मध्यम आकाराचा नारळ, 2 मोठे कांदे,  मालवणी मसाला, गरम मसाला, कडिपत्ता,  आलं-लसूण, मीठ, तेल चवीनुसार

कृती :

  • मालवणी चिकनमध्ये सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे ग्रेव्ही. ही ग्रेव्ही कांदा खोबऱ्याचे वाटप असते. 
  •  त्यासाठी वरील दिलेल्या मापानुसार आणि तुम्ही घेतलेल्या प्रमाणानुसार कांदा आणि ओले खोबरे घ्यावे.
  •  तव्यावर तेल गरम करुन त्यामध्ये आलं- लसूणचे तुकडे परतून  कांदा घालावा. कांदा छान भाजला गेला की, त्याध्ये खोबरं घालून थोडे खरपूस भाजून घ्यावे.( या दरम्यान आवडत असल्यास तुम्ही थोडी काळीमिरी, लवंग आणि तमालपत्र घालते तरी चालेल)
  • थंड झाल्यानंतर त्याचे छान मध्यम दळ असलेले वाटप करुन घ्यावे. मिक्सरमध्ये वाटताना यामध्ये मालवणी मसाला घातले तरी चालेल.
  • आता चिकनला फोडणी देण्यासाठी एका कढईत तेल गरम करुन घ्या. तेलात कडिपत्ता घालून स्वच्छ धुतलेले चिकन घाला. त्यावर मीठ, हळद घालून चिकन चांगले शिजू द्या. आवडत असेल तर थोडी आलं-लसूण पेस्ट घातली तरी चालेल. चिकन चांगले शिजू द्या. त्यानंतर त्यामध्ये तयार केले वाटप घालून चिकनला चांगले आदाण येऊ द्या.
  •  चिकन मस्त वडे आणि कांदा- लिंबू सोबत सर्व्ह करा.

चिकन मसाला (Chicken Masala)

Chicken Masala

Chicken Masala

 

चिकन मसाला हा प्रकार तुम्ही हॉटेलांमध्ये नक्कीच चाखला असेल. हा चिकन मसाला प्रकार तुम्ही घरीच ट्राय करु शकता. एकदम फर्स्ट क्लास अशी ही रेसिपी आहे.

ADVERTISEMENT

साहित्य: १ किलो चिकन, ½ किलो कांदे, टोमॅटो, लाल तिखट, हळद, आलं-लसूण पेस्ट, मीठ,तेल, गरम मसाला

कृती:

  • एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये कांदे आणि आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यामध्ये टोमॅटो आणि मसाले घाला. टोमॅटो चांगले शिजले की त्यामध्ये स्वच्छ केलेले चिकन घाला.
  • चिकन चांगले शिजू द्या. मीठ आणि घालून एकजीव करुन कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

मोघलाई चिकन (Mughlai Chicken)

Mughlai Chicken

Mughlai Chicken

 

थोडीशी रिच अशी रेसिपी खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही मोघलाई पद्धतीचे चिकन खाऊ शकता. ही रेसिपी देखील तुम्ही नक्की ट्राय करुन बघा.

ADVERTISEMENT

साहित्य: ½ किलो चिकन, काळीमिरी पूड, मीठ, दोन मोठे कांदे,हिरव्या मिरच्या, जीरे पूड, गरम मसाला, टोमॅटो प्युरी, दही

कृती :

  • चिकन स्वच्छ करुन ते मॅरिनेट करण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घ्या. बाऊलमध्ये चिकन, काळीमिरी पूड आणि मीठ घालून साधारण तासभरासाठी ठेवून द्या.
  • कांद्याची पेस्ट करुन घ्या. आता कढईत तेल गरम करुन त्यामध्ये कांद्याची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट घाला. त्यामध्ये चिकन घालून लाल तिखट,गरम मसाला, जीरे पूड घाला. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घाला.
  • दही थोडेसे फेटून घ्या. आता चिकनमध्ये दही घाला. त्याला चांगली उकळी येऊ द्या. आता त्यामध्ये हिरव्या मिरच्या चिरून घाला ( तिखट हवे असल्यास) मोघलाई क्रिमी चिकन तयार

बटर चिकन (Butter Chicken Recipe In Marathi)

Butter Chicken Recipe In Marathi

Butter Chicken Recipe In Marathi

 

हॉटेलमध्ये गेल्यानंतर चिकनचा आवडणारा पदार्थ म्हणजे बटर चिकन. ही रेसिपी करायला तशी किचकट आणि लांब असली तरी देखील याची चव एकदम छान लागते.

ADVERTISEMENT

साहित्य: 1 किलो बोनलेस चिकन, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, कसुरी मेथी, तेल, गरम मसाला, काळे मीठ, कांदा, टोमॅटो,मिरच्या,दही.
मसाल्यासाठी : तेल, उभे चिरलेले कांदे, हिरवी मिरच्या, टोमॅटो,कोथिंबीर, आलं-लसूण

कृती :

  • चिकन मॅरिनेट  करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात दोन चमचे तेल, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, कसुरी मेथी, गरम मसाला, काळे मीठ घाला. त्यामध्ये घट्ट दही घालून एक बॅटर तयार करुन घ्या. त्यामध्ये चिकनचे तुकडे घालून मॅरिनेट करुन घ्या. त्याला थोडा स्मोकी वास येण्यासाठी कोळसा गरम करुन त्यावर तूप सोडा आणि ते चिकनच्या भांड्यात घालून रात्रभर ठेवा.
  • मसाल्यासाठी एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये जीरे तडतडू द्या. त्यामध्ये कांदा, आलं-लसूण घालून परतून घ्या. कोथिंबीरच्या काड्या घालून घ्या. टोमॅटो आणि मीठ घालून चांगले परतून घ्या. टोमॅटो चांगले शिजले की त्याचे वाटप करुन घ्या. तयार वाटप जाळीतून  काढून घ्या.
  • आता मॅरिनेटेड चिकन तव्यावर चांगले भाजून घ्या.त्याचे तुकडे करुन घ्या. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये फोडणीसाठी बारीक कांदा घाला. तयार  वाटप घालून चांगले परतून घ्या. तेल सुटले की, त्यामध्ये चिकनचे तुकडे घाला. चांगली उकळी आली की त्यामध्ये क्रिम घाला. बटर चिकन तयार 

हैदराबादी ग्रीन चिकन (Hyderabadi Green Chicken)

Hyderabadi Green Chicken

Hyderabadi Green Chicken

 

काही चिकनच्या रेसिपी या चांगल्याच प्रसिद्धी असतात.तशीच आहे ही हैदराबादी ग्रीन चिकन रेसिपी.  

ADVERTISEMENT

साहित्य : 1किलो चिकन, आलं-लसूण पेस्ट,हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, लाल तिखट, धणे-जीरे पूड, दही, कांदे, काजू, बदाम,पिस्ता, तेल,खडा मसाला

कृती :

  • सगळ्यात आधी चिकन मॅरिनेट करुन घ्या. त्यासाठी चिकन एका भांड्यात घेऊन त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, धणे-जीरे पूड घाला.
  • त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, दही घालून त्याची एक पेस्ट तयार करा आणि ती चिकमध्ये घाला. चिकन चांगले रात्रभर मॅरिनेट करा.
  • सुकामेवा भाजून घ्या. कांदा तळून त्या सगळ्याची पेस्ट करुन घ्या. हे सगळं चिकनमध्ये घाला.
  • आता एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये खडा मसाला घाला. मॅरिनेट केेलेले चिकन घालून हे चिकन चांगले शिजवून घ्या. वरुन थोडी तुपाची धार सोडा. तुमचे शाही हैदराबादी ग्रीन चिकन तयार. 

वाचा – जाणून घ्या खेकडा खाण्याचे फायदे

चिकन राईस रेसिपी (Chicken Rice Recipe In Marathi)

चिकन आणि राईस एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे. जर तुम्हाला भाताचा प्रकार आवडत असेल तर या काही चिकन राईस रेसिपी तुम्ही ट्राय करायला हव्यात.

ADVERTISEMENT

चिकन फ्राईड राईस (Chicken Fried Rice Recipe In Marathi)

Chicken Fried Rice Recipe In Marathi

Chicken Fried Rice Recipe In Marathi

जर तुम्हाला चायनीजचे प्रकार खायला आवडत असतील तर तुम्हाला नक्कीच हा उडता प्रकार करायला हवा. चिकन फ्राईड राईसची ही रेसिपी फारच सोपी आणि पटकन होणार आहे.

साहित्य: ¼ किलो बोनलेस चिकन, 2 वाटी शिजलेला बासमती तांदुळ किंवा मोठा तांदूळ, बारीक चिरलेले आलं-लसूण, कांदा पात, सोया सॉस, व्हिनेगर, 1अंड कॉर्नफ्लोअर, काळीमिरी पूड, तेल आणि मीठ

ADVERTISEMENT

कृती:

  •  फ्राईड राईस हा नेहमी कढईतच चांगला बनतो. याला वोक कढई असे म्हणतात. हा राईस करण्यासाठी तुमच्याकडे अशी कढई असेल तर राईस उत्तम बनेल.
  •  सगळ्यात आधी चिकनची तयारी करुन घेऊया. एका भांड्यात बोनलेस चिकनचे तुकडे, काळीमिरी पूड, मीठ, कॉर्नफ्लॉअर,सोया सॉस घालून ते मॅरिनेट करुन घ्या. एका कढईत तेल गरम करुन चिकन त्यामध्ये चांगले शिजवून घ्याय चिकन हे चांगले शिजायला हवे.
  •  आता एका वोक कढईमध्ये तेल गरम करुन घ्या. त्यामध्ये तेल गरम करुन आलं-लसूण घाला. त्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घाला. एक अंडे फेटून त्यामध्ये घाला. ते चांगले परतून घ्या.
  •  हाय फ्लेमवरच चिकनचे तुकडे घालून त्यामध्ये शिजलेला भात घाला. भातावर व्हिनेगर आणि सोया सॉस घालून ते चांगले परतून घ्या. वरुन पातीचा कांदा घाला. तुमचा चिकन फ्राईड राईस तयार हा राईस तुम्ही मस्त शेजवान चटणीसोबत खाऊ शकता.

चिकन बिर्याणी (Chicken Biryani)

Chicken Biryani

Chicken Biryani

चिकनचा एखादा पदार्थ ऑर्डर करायचा असेल तर पहिली आपल्याड डोळ्यासमोर येते ती बिर्याणी. आता बिर्याणी म्हटली की केवढा तो ताप असे होणे स्वाभाविक आहे. पण आज सोप्या पद्धतीने चविष्ट बिर्याणी कशी बनवायची ते जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

साहित्य: ¼ किलो चिकन, अख्खा खडा मसाला, 3 ते 4 मोठे कांदे, बिर्याणी मसाला, गरम मसाला, लाल तिखट, दही, आलं-लसूण पेस्ट, तेल, पुदिन्याची पानं, चवीपुरतं मीठ

कृती:

  •  सगळ्यात आधी बिर्याणीसाठी चिकन मॅरिनेट करायचे आहे. त्यासाठी चिकन स्वच्छ करुन त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, थोडासा बिर्याणी मसाला, दही, लिंबाचा रस आणि मीठ घालून चिकन साधारण रात्रभर मॅरिनेट होऊ द्या. ही बिर्याणी फारच चविष्ट लागते.
  •  तांदूळ स्वच्छ धुवून तो साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी निथळत ठेवा. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये अख्खे खडे मसाले घाला. (तमालपत्र, लवंग, काळीमिरी, स्टारफुल, दालचिनी, मोठी वेलची, छोटी वेलची) त्यामध्ये निथळत ठेवलेला तांदूळ आणि थोडेसे तेल घालून भात ¾ शिजवून घ्या. त्यामध्ये काही पुदिन्याची पानं टाकली तरी चालू शकेल.
  •  कांदे उभे चिरुन ते तेलात छान तळून घ्या. बिर्याणीवर कुरकुरीत कांदा फारच छान लागतो.
  •  आता बिर्याणीसाठी चिकन फोडणीला देताना एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन थेट घाला. गॅस बारीक करुन चिकन चांगले शिजू द्या.
  •  चिकनमध्ये तळलेला कांदा घातला तरी चालेल. त्यामुळे त्याला छान ग्रेव्ही मिळते. चिकनची एक ग्रेव्ही तयार झाल्यावर ती भांड्यात पसरुन घ्या. त्यावर तयार भात पसरुन घ्या. तयार बिर्याणीमध्ये थोडी जागा करुन त्यामध्ये थोडेसे केशर दूध घालावे. त्यामुळे बिर्याणी शिजण्यास आणि त्याला एक फ्लेवर मिळण्यास मदत मिळेल.
  •  बिर्याणी असेंबल झाल्यानंतर गॅस बारीक करुन तिला चांगला 5 ते 7 मिनिटं दम द्या. बिर्याणी तयार

हैदराबादमध्ये जाणार असाल तर इथे खा चविष्ट चिकन बिर्याणी

चिकन पुलाव (Chicken Pulao)

Chicken Pulao

ADVERTISEMENT

Chicken Pulao

एक फुल मिल खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही चिकन पुलाव अशी डिशही करु शकता ही रेसिपी करणेही तसे सोपे आहे.

साहित्य: ¼ किलो बोनलेस चिकन, बिर्याणीचा तांदूळ, अख्खा खडा मसाला, गरम मसाला, पुलाव मसाला, मीठ, तेल, पुदिन्याची पाने , कांदा

कृती: 

ADVERTISEMENT
  • पुलाव ही झटपट होणारी रेसिपी आहे. ज्या प्रमाणे आपण व्हेज पुलाव करतो अगदी तसाच तुम्ही चिकन पुलाव करु शकता
  • कुकरमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये अख्खे खडे मसाले घाला. त्यावर आलं-लसूण पेस्ट आणि कांदा घालून परतून घ्या. चिकनचे तुकडे घालून त्यावर गरम मसाला, लाल तिखट, पुलाव मसाला घालून चिकन दोन मिनिटांसाठी शिजवा.
  • तांदूळ स्वच्छ करुन ते निथळत ठेवा. कुकरमध्ये तांदूळ घालून त्यात मीठ घालून परतून घ्या. आता कुकरचे झाकण लावून शिट्टी लावा. दोन ते तीन शिट्टया काढा तुमचा चिकन पुलाव तयार

चिकन टिक्का बिर्याणी (Chicken Tikka Biryani)

Chicken Tikka Biryani

Chicken Tikka Biryani

चिकनचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही चिकन टिक्का बिर्याणी नक्कीच करुन बघायला हवी. चिकन टिक्का बिर्याणी करण्यासाठी थोडे कष्ट लागतात .पण ही बिर्याणी एकदम चविष्ट बनते.

साहित्य: 1 किलो बोनलेस चिकन, लिंबाचा रस, चिकन मसाला (रेडिमेड), आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, दही (पाणी काढून टाकलेले), गरम मसाला, हळद, जीरे पूड, तेल, मीठ

ADVERTISEMENT

कृती:

  • सगळ्यात आधी चिकन मॅरिनेट करुन घ्या. त्यासाठी एका बाऊलमध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्यामध्ये मीठ, लिंबाचा रस, आलं-लसूण पेस्ट घालून ठेवा.
  • दुसऱ्या भांड्यात टिक्काचा मसाला करण्यासाठी दही, गरम मसाला, लाल तिखट, चिकन मसाला, हळद, जीरे पूड आवडत असल्यास कसुरी मेथी कुस्करुन घाला. त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून एकजीव करुन साधारण 30 मिनिटे बाजूला ठेवून द्या.
  • दोन्ही गोष्टी मॅरिनेट झाल्या की, त्यामध्ये चिकनचे तुकडे घालून ते पुन्हा एकदा घोळवून मॅरिनेट करण्यासाठी साधारण 30 मिनिटं ठेवून द्या.
  • आता  भाजण्यासाठी गॅसवर एखादी जाळी ठेवा. तंदूर स्टीकवर चिकनचे एक एक तुकडे घालून चिकन टिक्का शिजवून घ्या. आधी मंद गॅसवर आणि मग थोड्या मध्यम आचेवर शिजवून घ्या. चिकन टिक्का तयार
  • वर दाखवलेल्या बिर्याणीप्रमाणे भात शिजवून कांद्याची ग्रेव्ही तयार करा आणि त्यावर एक एक तुकडा टिक्का घालून बिर्याणी सर्व्ह करा. 

चिकन स्टाटर्स रेसिपी (Chicken Starter Recipe In Marathi)

कोणतीही पार्टी असली की, चिकनची स्टार्टर रेसिपी असायलाच हवी. तरच पार्टीला रंगत येते. बाहेरुन विकत न आणता तुम्ही घरीच चिकनच्या मस्त रेसिपी बनवू शकता. या रेसिपीज फारच सोप्या आहेत.

चिकन क्रिस्पी (Chicken Crispy)

Chicken Crispy

Chicken Crispy

ADVERTISEMENT

ज्यांना चिकन आवडते त्यांना चिकन क्रिस्पी हा पदार्थ अगदी हमखास आवडेल असा आहे. ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करायला हवी अशी आहे.

साहित्य: ¼ किलो बोनलेस चिकन, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट,लिंबाचा रस किंवा व्हिनेगर,मीठ, तेल, मैदा, कॉर्नफ्लॉवर, ढोबळी मिरची, बारीक चिरलेला लसूण, सोया सॉस, रेड चिली सॉस, अंड

कृती :

  • चिकन मॅरिनेट करण्यासाठी एका बाऊलमध्ये चिकन घेऊन त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, लिंबाचा रस, कॉर्नफ्लॉवर,मैदा आणि अंड घालून ते मॅरिनेट करुन घ्या
  • कढईत तेल गरम करुन त्यामध्ये चिकन तळून घ्या. आता फोडणीसाठी एका वोक कढाईमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये बारीक चिरलेले आलं-लसूण घाला. भाज्या घालून त्यामध्ये सगळे सॉस घाला.
  • सॉसचा चांगला वास येऊ लागला की, त्यामध्ये चिकनचे तुकडे घालून एकजीव करुन घ्या मस्त चिकन क्रिस्पी सर्व्ह करा.

चिकन 65 (Chicken 65)

Chicken 65

ADVERTISEMENT

Chicken 65

चिकनच्या स्टाटर्स प्रकारापैकी एक असलेला प्रकार म्हणजे चिकन 65. या रेसिपीचे नाव इंग्रजी असले तरी देखील त्याला एक देसी टच आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी हमखास ट्राय करायला हवी अशी आहे.

साहित्य: ½ किलो बोनलेस चिकनचे तुकडे, मैदा, तांदुळाचे पीठ, कॉर्नफ्लोअर, मीठ, काश्मिरी लाल तिखट, तेल, कडीपत्ता, मिरचीचे तुकडे,अंडे

कृती :

ADVERTISEMENT
  • चिकन मॅरिनेशनसाठी एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यामध्ये लाल तिखट, मीठ, तांदूळाचे पीठ, कॉर्न फ्लोअर, मैदा घालून एकजीव करा. त्यामध्ये अंडे घालून तेलात चिकनचे पीस तळून घ्या.
  • आता एका भांड्यात तेल गरम करुन लसणीची फोडणी द्या. त्यात हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या घालून कडीपत्ता घाला चिकनचे पीस घालून थोडासा पाण्याचा हबका मारुन मस्त परतून घ्या. चिकन 65 तयार

चिकन फ्राय (Chicken Fry)

Chicken Fry

Chicken Fry

एखादी पार्टी असेल तर चिकन फ्राय तर आलेच.चिकन फ्राय ही स्टाटरमधली सगळ्यात सोपी रेसिपी आहे.

साहित्य: ½ किलो चिकन, कोल्हापुरी लाल तिखट, हळद, आलं-लसूण पेस्ट, कोळसा, मीठ आणि तूप

ADVERTISEMENT

कृती:

  •  चिकन फ्राय ही झटपट होणारी रेसिपी आहे. एका भांड्यात स्वच्छ केलेले चिकन, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून ते चांगले मॅरिनेट करायला ठेवा. जर तुम्हाला स्मोकी फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही कोळसा गरम करुन त्यामध्ये तूप घाला आणि ते भांडं बंद करुन ठेवा.
  • रात्रभर असं ठेवता आलं तर ठीक. नाहीतर किमान दोन तास तरी चिकन मॅरिनेट होऊ द्या.
  • कढईत तेल गरम त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन तसेच्या तसे टाका आणि चांगले शिजवून घ्या. फ्राय चिकन तयार हे चिकन कोरडेच असते. त्यामुळे त्यामध्ये पाणी घालू नका.

चिकन कबाब (Chicken Kabab)

हल्ली हॉटेलमध्ये गेल्यानंतर कबाब हे हमखास ऑर्डर केले जातात. कबाबचे खूप प्रकार आहेत. त्यातील सोप्यात सोपे टिक्की फॉर्ममध्ये असलेले चिकन कबाब घरी करण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.

साहित्य: ¼ किलो चिकन खिमा, पुदिना- कोथिंबीर-मिरचीची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, मीठ, तेल,

कृती : एका बाऊलमध्ये चिकन खिमा घेऊन सगळे साहित्य एकत्र करा. त्याच्या छोट्या छोट्या पॅटी करुन त्या शॅलो फ्राय करा. सोपे चिकन कबाब तयार.

ADVERTISEMENT

चिकन टिक्का (Chicken Tikka)

Chicken Tikka

Chicken Tikka

स्टाटर्स या प्रकारातील सगळ्यात जास्त आवडणारी अशी रेसिपी म्हणजे चिकन टिक्का जी खूप जणांच्या आवडीची आहे. ती देखील तुम्हाला अगदी सहज घरी बनवता येईल.

साहित्य: 1 किलो बोनलेस चिकन, लिंबाचा रस, चिकन मसाला (रेडिमेड), आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, दही (पाणी काढून टाकलेले), गरम मसाला, हळद, जीरे पूड, तेल, मीठ

ADVERTISEMENT

कृती:

  • सगळ्यात आधी चिकन मॅरिनेट करुन घ्या. त्यासाठी एका बाऊलमध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्यामध्ये मीठ, लिंबाचा रस, आलं-लसूण पेस्ट घालून ठेवा.
  • दुसऱ्या भांड्यात टिक्काचा मसाला करण्यासाठी दही, गरम मसाला, लाल तिखट, चिकन मसाला, हळद, जीरे पूड आवडत असल्यास कसुरी मेथी कुस्करुन घाला. त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून एकजीव करुन साधारण 30 मिनिटे बाजूला ठेवून द्या.
  • दोन्ही गोष्टी मॅरिनेट झाल्या की, त्यामध्ये चिकनचे तुकडे घालून ते पुन्हा एकदा घोळवून मॅरिनेट करण्यासाठी साधारण 30 मिनिटं ठेवून द्या.
  • आता भाजण्यासाठी गॅसवर एखादी जाळी ठेवा. तंदूर स्टीकवर चिकनचे एक एक तुकडे घालून चिकन टिक्का शिजवून घ्या. आधी मंद गॅसवर आणि मग थोड्या मध्यम आचेवर शिजवून घ्या. चिकन टिक्का तयार

चिकन लॉलीपॉप (Chicken Lollipop Recipe In Marathi)

Chicken Lollipop Recipe In Marathi

Chicken Lollipop Recipe In Marathi

लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी म्हणजे चिकन लॉलीपॉप. ही रेसिपी करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत. तुम्ही चिकन लॉलीपॉप या पद्धतीने करुन पाहा.

ADVERTISEMENT

साहित्य : चिकन लॉलीपॉप (बाजारात कच्चे लॉलीपॉप आकारात करुन मिळतात), आलं-लसूण पेस्ट, मीठ, काळीमिरी पूड, कॉर्नफ्लेक्स, अंड, लाल तिखट, मैद्याची पेस्ट, तळण्यासाठी तेल, तंदूर लाल रंग( आवश्यक असल्यास)

कृती :

  • एका भांड्यात  आलं-लसूण पेस्ट,लाल तिखट,तंदूरचा लाल रंग असे एकत्र करुन घ्या. त्यामध्ये एक अंड फोडून त्याचे एक बॅटर तयार करा.
  • आता एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करुन घ्या. तर दुसरीकडे मैद्याच्या पेस्टमध्ये चिकन लॉलीपॉप डीप करुन मग तो कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवा. गरम तेलात मस्त लॉलीपॉप तळून घ्या. शेजवान चटणीसोबत सर्व्ह करा.

आता चिकनच्या या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा.

23 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT