ADVERTISEMENT
home / Uncategorized
The Best Creams That will Provide Intense Hydration

त्वचा मुलायम कशी राखावी आणि कोणते आहेत बेस्ट क्रिम्स

चेहरा टवटवीत आणि चमकदार दिसण्यासाठी गरज असते त्वचेची योग्य काळजी घेण्याची. जर तुम्ही तुमच्या त्वचेची योग्य निगा राखली तर त्याचा परिणाम तुमच्या सौंदर्यावर दिसू लागतो. वास्तविक दिवसभरात धुळ, माती, प्रदूषण, मेकअपमधील कण अशा अनेक गोष्टींचा संपर्क तुमच्या त्वचेसोबत येत असतो. ज्यामुळे त्वचा स्वच्छ करण्यासोबतच तिला पोषणाची गरज असते. त्वचा स्वच्छ करताना वापरण्यात येणाऱ्या क्लिंझर अथवा साबणामुळे तुमच्या त्वचेमधील नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवणाऱ्या क्रिम्स लावणं महत्त्वाचं ठरतं. तुम्हालाही तुमच्या त्वचेला असं पोषण द्यायचं असेल तर वापरा या काही बेस्ट क्रिम्स  (Best Creams) 

ऑर्गेनिक हार्वेस्ट व्हिटॅमिन सी फेस क्रिम (Organic Harvest Vitamin C Face Cream)

त्वचेची निगा राखण्यासाठी त्वचेला उजळपणा देणाऱ्या क्रिममध्ये पोषक घटकही योग्य प्रमाणात असायला हवेत. कारण जर तुमची त्वचा कोरडी असेल अथवा वातावरणातील बदलांमुळे ती सतत कोरडी पडत असेल तर तुम्हाला अशा क्रिमची खूप गरज आहे. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत ऑर्गेनिक हारवेस्टची एक अशी क्रिम शेअर करत आहोत. ज्यामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा तर मिळेलच पण तिचे उत्तम पोषण होईल. या क्रिममध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या यामुळे हळू हळू कमी होत जातात. चेहरा धुतल्यानंतर तुम्ही लगेच ही क्रिम त्वचेवर वापरू शकता. 

डेली नरिशिंग नाईट क्रिम ( Daily Nourishing Night Cream)

दिवसभर आपण त्वचेची काळजी घेतो मात्र रात्री झोपताना त्वचेची तितकीच निगा राखायला हवी. कारण रात्री त्वचेला जास्त आराम मिळतो. त्यामुळे एखादं क्रिम अथवा मास्क त्वचेत मुरण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यासाठीच आम्ही तुम्हाला एक नाईट क्रिम वापण्याचा सल्ला देत आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट आणि टवटवीत राहिल. विशेष म्हणजे ऑर्गेनिक हार्वेस्टचे सर्व प्रॉडक्ट हे शंभर टक्के नैसर्गिक घटकांपासून बनवण्यात आलेले आहेत. ज्यामुळे ही उत्पादने तुमच्या त्वचेचं नुकसान करत नाहीत. यासोबतच वाचा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी बेस्ट नाईट क्रीम (Best Night Creams For Every Skin Type)

मोरक्कन आर्गन ऑईल डे क्रीम (Moroccan Argan Oil Day Cream) 

आर्गन ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. जे तुमच्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचे ठरते. या क्रिममध्ये आर्गन ऑईल असल्यामुळे तुमच्या त्वचेला मॉईस्चराईझिंग आणि कंडिशनिंग केलं जातं. त्वचा हायड्रेट राहिल्यामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या यामुळे कमी होतात. स्कीन केअर रूटिनमध्ये या क्रिमचा समावेश करून तुम्ही तुमच्या त्वचेचं उत्तम पोषण करू शकता. विशेष म्हणजे सूर्यकिरणांमधील हानिकारक घटकांपासून संरक्षण करण्यासाठी यात एपीएफ 30 फॉर्म्युला वापण्यात आला आहे. सोबतच ट्राय करा या Best Cream For Pigmentation In Marathi | चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम

ADVERTISEMENT

हिमालयन ऑर्गेनिक्स पपाया फेस क्रिम्स (Himalayan Organics Papaya Face Cream)

स्कीन केअर रूटिनसाठी तुम्ही एखादं छान क्रिम शोधत असाल तर तुम्हाला या क्रिममुळे नक्कीच चांगला फायदा होईल. कारण या क्रिममध्ये पपई आणि नैसर्गिक घटकांचा अर्क वापरण्यात आलेला आहे. पपई त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेचा सैलपणा कमी होतो आणि घट्टपणा, उजळपणा येतो. शिवाय यातील नैसर्गिक घटकांमुळे त्वचेचा मऊपणा टिकून राहतो. पेराबेन फ्री आणि क्रुअल्टी फ्री असल्यामुळे तुम्ही ते बिनधास्त वापरू शकता. सोबतच जाणून घ्या चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी बेस्ट क्रीम (Best Cream For Acne Scar In Marathi)

काया सुपर हायड्रेटर (Kaya Super Hydrator)

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी ही क्रिम तुमच्या नक्कीच फायद्याची आहे. कारण आर्युवेदिक आणि नैसर्गिक घटकांपासून बनवनलेली ही जेल फॉर्म्युलामधील क्रिम तुमच्या त्वचेच्या मुळापर्यत पोषण करते. लाईटवेट आणि त्वचेवर चिकटपणा निर्माण करणारी ही क्रिम तुम्ही दिवसा वापरू शकता. या क्रिमच्या वापरामुळे तुम्हाला थंडावा आणि आराम जाणवेल. कारण यात त्वचा हायड्रेट राहण्यासाठी खास अॅक्वा होल्डिंग फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

10 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT