या जगात एकही माणूस असा नाही जो कधी खोटं बोलला नसेल. कधीतरी समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून खोटं बोलावं लागतं, तर कधीतरी काही गोष्टी लपविण्यासाठी खोटं बोललं जातं. पण बरेचदा नात्यामध्ये गरज नसतानाही खोटं बोललं जातं हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हीदेखील असं कधीतरी वागला असाल ना? तुमचा जोडीदार अथवा तुम्ही एकमेकांपासून खोटं बोलून काही लपवत तर नाही ना? अशी काय कारणे आहेत, ज्यामुळे नात्यात खोटं बोललं जातं. मनात वेगळं असतं पण तोंडातून वेगळं निघतं. डोकं असं का काम करतं आणि असं खोटं बोलण्याची गरज नक्की का भासते याची महत्त्वाची कारणं आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हालाही हे पटतंय का नक्की वाचून बघा आणि आम्हाला कळवा.
एखाद्यावर कायम आपला ताबा राहण्यासाठी
बऱ्याच लोकांसाठी खरं बोलण्याचा अर्थ म्हणजे आपल्या जोडीदाराला आपला संपूर्ण ताबा मिळवू देणे असा असतो. अनेकदा अनेक जण आपल्या निर्णयाला आपल्याला हवा तोच जोडीदाराकडून प्रतिसाद यावा यासाठी परिस्थिती पाहून खोटं बोलतात, जेणेकरून त्यांना हवं तेच मिळेल. अशा व्यक्ती आपल्या मनाचं खरं करण्यावर जास्त विश्वास ठेवतात, त्यामुळे खोटं बोलण्याचेही अशा व्यक्तींना काहीच वाटत नाही. त्यांना जे वाटेल तेच योग्य असतं आणि तेच व्हायला हवं असतं जेणेकरून आपल्या जोडीदारावर आपला कायम ताबा राहील अशाच पद्धतीने त्यांचे वागणे असते आणि त्यासाठी अनेकदा खोटं बोललं जातं. कधी कधी जोडीदाराच्या हे लक्षातही येते पण केवळ आपल्या नात्यात काही त्रास होऊ नये यासाठी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.
निराश होऊ नये म्हणून
अनेकदा नात्यामध्ये यासाठी खोटं बोलण्यात येतं, जेणेकरून आपला जोडीदार नाराज अथवा निराश होऊ नये. आपल्या खरं बोलण्याने मन दुखावले जाऊ नये यासाठी जोडीदाराशी खोटे बोलण्यात येते. पण त्याचे परिणाम नंतर नक्कीच चुकीचे होऊ शकतात. कधी कधी खरं बोलणे अधिक चांगले असते. कारण आपला जोडीदार आपल्याशी खोटं बोलला आहे हे मनाला अधिक लागते. तर कधीकधी आपल्या जोडीदाराचा मूड या निराशेतून खराब होऊ नये, रागाने काहीतरी बरंवाईट करू नये अथवा आपल्यासह वाईट वागू नये यासाठीही खोटे बोलले जाते.
खोट्याचा आधार
हा एक असा पाँईंट आहे, जो नेहमी महत्त्वपूर्ण ठरतो. अशा व्यक्ती जास्त विचार करणाऱ्या असतात. त्यामुळे बरेचदा खोट्याचा आधार घेतला जातो. तुम्ही जर आपल्या जोडीदारावर कोणत्याही गोष्टीसाठी प्रमाणापेक्षा अधिक ताण दिला तर एखादी गोष्ट लपविण्यासाठी खोट्याचा आधार घेतला जातो. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षेनुसार वागण्यासाठी खोट्याचा आधार घेत समोरच्या व्यक्तीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि त्यामुळे अनेकदा खोटं बोलले जाते.
खोटं बोलण्याचा आजार
काही व्यक्ती अशाही असतात ज्यांना खोटं बोलण्याचा आजारच असतो. अशा व्यक्ती लहान सहान गोष्टींसाठीही खोटं बोलतात. उदा. तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही ऑफिसबाबत प्रश्न विचारला तर त्याबाबतीही अगदी काहीही खोटं अशा व्यक्ती बोलू शकतात. असे जोडीदार खाण्यापासून ते अगदी कोणत्याही गोष्टीमध्ये लपवाछपवी करू शकतात आणि खोटं बोलू शकतात. खरं तर खोटं बोलण्याची गरज नसते. पण सवयीमुळे अशा व्यक्ती असं करतात. कारण तणावापासून वाचण्यासाठी त्यांना हा पर्याय योग्य वाटतो.
तुमचा जोडीदार वा जोडीदारीण यापैकी नक्की कोणत्या श्रेणीत येते ते तुम्ही नक्की तपासून पाहा किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीत आपल्या जोडीदाराशी खोटं बोलता तेदेखील तुम्ही पडताळून घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक