ADVERTISEMENT
home / मनोरंजन
YEAR ENDER : बॉलीवूडमधल्या या जोड्यांचं झालं ब्रेकअप

YEAR ENDER : बॉलीवूडमधल्या या जोड्यांचं झालं ब्रेकअप

बी-टाऊनमध्ये जोड्या जुळणं आणि मग ब्रेकअप होणं ही काही मोठी गोष्ट नाही. आत्तापर्यंत तुम्ही अशा कित्येक नात्यांबद्दल ऐकलं असेल जी नंतर तुटली. जोड्या जुळण्याची बातमी कानावर येईपर्यंत कधी कधी ब्रेकअपही झालेला असतो. कधी कधी सिनेमाच्या पब्लिसिटीसाठी केलेलं अफेअर असल्याचीही बरेचदा शंका येते. असो…आता 2019 संपत आलं आहे. या निमित्ताने पाहूया 5 सेलिब्रिटी कपल्स ज्यांनी यंदा आपलं नातं जोडलं आणि तोडलंही.

सारा-कार्तिक

सारा अली खान  आणि कार्तिक आर्यनच्या अफेयर चर्चा बॉलीवूडमध्ये खूपच गरम होत्या. अगदी त्यांनी एकमेंकाना पाठवलेल्या चिठ्ठ्यांच्या चर्चांपासून ते साराला तिची आई अमृता सिंग कार्तिकला भेटण्यास विरोध करत आहे इथपर्यंत किस्से व्हायरल झाले होते. या अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या त्या ‘लव आजकल 2’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान. ज्यामध्ये हे दोघंही पहिल्यांदा एकत्र काम करत होते. इथेच त्यांचं जुळलं अशी चर्चा होती. अनेकवेळा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. अगदी सारा आणि कार्तिक एकमेकांच्या घराबाहेर दिसल्याचं आढळलं होतं. पण अचानक या दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली. सूत्रानुसार आपापल्या करिअरवर लक्ष देण्यासाठी या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.  

विकी कौशल आणि हरलीन

आपल्या लुक्स आणि अभिनयाने थोड्याच वेळात अनेकींच्या मनात जागा मिळवलेल्या विकीचं नाव जोडलं गेलं ते मॉडेल, अभिनेत्री आणि डान्सर हरलीन सेठीशी. या दोघांच्या डेटींगच्या चर्चा होताच अनेकींची मन नक्कीच दुखावली होती. पण विकीसाठी आनंदही होता. पण माशी कुठे शिंकली माहीत नाही. एका वर्षातच त्यांच्या ब्रेकअप झाला. हे तेव्हा कळलं की, जेव्हा हरलीनने विकीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. पण हरलीनच्या इन्स्टा अकाउंटवर विकीसोबतचे फोटो अजूनही आहेत. विकीला अनफॉलो केल्यानंतर हरलीनने काही हार्ट ब्रेकिंग पोस्टही लाईक केल्या होत्या. या ब्रेकअपनंतर मात्र विकीच्या फॅन फॉलोइंग नक्कीच परिणाम झाल्याचं जाणवलं. एकीकडे काही फॅन्सना तो पुन्हा सिंगल झाल्याचा आनंद होता तर काहींना या दोघांच्या ब्रेकअपचं दुःख.

इलियाना डिक्रूज-अँड्रयू नीबोन

इलियाना गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्रयू नीबोनला डेट करत होती. त्यांचं लग्न ठरलं असल्याची बातमीही आली होती. तसंच इलियाना प्रेग्नंट असल्याच्याही चर्चा होत्या. पण नंतर बातमी आली ती इलियाना आणि अँड्रयूचं नातं तुटल्याची. इलियाना सोशल मीडियावर खूपच एक्टिव आहे आणि अँड्रयूसोबतचे फोटोही तिने शेअर केले होते. पण ब्रेकअपनंतर इलियानाने अँड्रयूसोबतचे सर्व फोटो डिलीट केले.

ADVERTISEMENT

या राशीची लोकं करतात लवकर ब्रेकअप

श्रुती हसन-मायकल कॉर्सेल

श्रुती बऱ्याच काळापासून विदेशी बॉयफ्रेंड मायकल कॉर्सेलला डेट करत होती. दोघांना अनेकदा इव्हेंट्सलाही एकत्र पाहण्यात आलं होतं. पण नंतर बातमी आली ती श्रुती आणि मायकलच्या ब्रेकअपची. ब्रेकअपाधी श्रुतीने मायकलसोबतचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. पण नंतर मात्र ते तिने डिलीट केलं. तसंच या ब्रेकअपमुळे श्रुती खूप डिस्टर्ब असल्याची आणि डिप्रेशनमध्ये गेल्याच्याही बातम्या होत्या.

तापसी पन्नूने मिळवली अजून एक लक्षवेधी भूमिका

नर्गिस फाकरी-मॅट अलांजो

रणबीर कपूरसोबत रॉकस्टारमध्ये झळकलेली नर्गिस फाकरी हिचं नाव हॉलीवूडच्या म्युझिक कंपोजर आणि डायरेक्टर मॅट अलांजोसोबत जोडलं गेलं होतं. दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. नर्गिसने कधी मीडियासमोर या नात्याचा खुलेपणाने उल्लेख केले नाही. पण त्यांच्याही ब्रेकअपची बातमी आलीच. नर्गिस आणि मॅट 2017 पासून लॉस एंजेलिसमध्ये लिव-इनमध्ये राहत होते. दोघंही 2019 मध्ये लग्नही करणार होते.

ADVERTISEMENT

अर्जुनसंदर्भात सर्वांसमोर मलायकानं केलं मोठं विधान

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

04 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT