या राशीची लोकं करतात लवकर ब्रेकअप

या राशीची लोकं करतात लवकर ब्रेकअप

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, काही लोकांचं रिलेशनशिप खूप वर्ष चालतं आणि तर काहींचं खूप कमी वेळातच ब्रेकअप होतं. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीची लोकं अशी असतात की, ज्यांच्यामध्ये नातं टिकवण्याची क्षमता इतरांपेक्षा कमी असते. अशा लोकांना कमिटमेंटचा भार वाटू लागतो किंवा ते एखाद्या रिलेशनशिपमध्ये असताना त्यांना पिंजऱ्यात अडकल्यासारखं वाटू लागतं. या परिस्थितीत ते रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी धडपड करतात आणि ब्रेकअप करतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी.

मेष (21 मार्च - 19 एप्रिल)

या राशीची लोकं नेहमीच दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी असल्याचं भासवतात. पण त्यांना मनातूनही तसंच वाटतं असं नाही. त्यांच्या पार्टनरला नेमकं हेच खटकतं. ज्यामुळे त्यांचं रिलेशनशिप काही फार काळ टिकत नाही. या राशीची लोकं छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतात आणि ब्रेकअप करण्याची धमकी देणं हे त्यांचं नेचर असतं. अशी लोकं जितक्या लवकर एखाद्या रिलेशनशिपमध्ये पडतात. तितक्याच लवकर ते तोडतातही. मेष राशीची लोकंही खूप समजूतदारही असतात. त्यामुळे त्यांना आपल्या रिलेशनचं भविष्य आधीच माहीत असतं आणि वेळ येताच ते त्यांचा निर्णय घेतात.

तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)

या राशीची लोकं नेहमी बॅलेन्स्ड आयुष्य जगतात आणि प्रत्येकबाबतीत अगदी मोजून मापून व्यवहार करतात. कदाचित याच स्वभावामुळे ते कोणत्याही रिलेशनशिपमध्ये जास्त काळ अडकून राहत नाहीत. परिणामी त्यांचा लवकर ब्रेकअप होतो. अशी लोकं आपल्या मनमर्जीनुसार वागतात आणि जेव्हा यांच्या मनाप्रमाणे काही होत नाही. तेव्हा ते नातं तोडणं चांगल समजतात. ब्रेकअपला अशा व्यक्ती आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्नांपैकी एकही समजतात.

वृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)

या राशीची लोकं शिस्तप्रिय असतात आणि त्यांना दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार वागणं आवडत नाही. ही लोकं प्रत्येक गोष्ट मनावर घेतात. रिलेशनशिपच्याबाबतीतही यांची हीच परिस्थिती असते. जेव्हा त्यांना वाटतं की, त्यांचा पार्टनर त्यांच्या इच्छा पूर्ण करत नाहीयं तेव्हा ते मन बदलतात आणि नातं तोडतात. या व्यक्तींना त्यांचं प्रेम विसरायला वेळ लागत नाही. त्यांची नेहमी अशी इच्छा असते की, नेहमी आपल्या पार्टनरपेक्षा वरचढ असावं.

कुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)

या राशीची लोकं जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा जास्त विचार करत नाहीत. तसंच नातं तोडतानाही जास्त विचार करत नाहीत. यांच्यासाठी कमिटमेंट एखाद्या ओझ्यासारखं असतं आणि जेव्हा यांना वाटतं की, पाणी डोक्यावरून जातंय तेव्हा ते नातं तोडतात. हे खूप लवकर नकारात्मक विचार करतात आणि याच सवयीमुळे पार्टनरपासून लांब जातात. या राशीच्या लोकांना अजिबात आवडत नाही की, त्यांच्या पार्टनरने त्यांना सोडावं किंवा ब्रेकअप करावा. म्हणून ते स्वतःच पुढाकार घेतात.

मीन ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)

या राशीची लोकं खूप इमोशनल असतात आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं असतं की, नातं तुटू नये. त्यामुळे हे रिलेशनशिपला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करतात पण नंतर ते तोडूनही टाकतात. पण या राशीची लोकं दुसऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन नातं तोडत नाहीत. जेव्हा यांना मनातून असं वाटतं तेव्हाच ते नातं तोडतात.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.