फेब्रुवारीदेखील (February) अन्य महिन्यांप्रमाणेच आहे पण व्हॅलेंटाईन महिना (valentine month) असल्यामुळे प्रेमी युगुलांमध्ये याची उत्सुकता अधिक दिसून येते. सगळीकडे आपल्याला प्रेमळ जोडपी नजरेला येतात. सिंगल असणाऱ्या व्यक्तींसाठी मात्र विशेषतः व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) वेगळाच असतो. त्यांना कोणीच सोबत नाही याचे नक्कीच वाईट वाटत असते. तुम्ही यावर्षीदेखील सिंगल असाल आणि कोणीच डेट करत नसेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमच्यासाठी हा दिवस तुम्ही नक्कीच खास करू शकता. एकटे आहात म्हणून कुढत बसण्यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी करा. रडत बसून काहीच फायदा नाही. तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे अशा प्रकारे करा साजरा आणि द्या स्वतःच स्वतःला आनंद! व्हॅलेंटाईन डे च्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि हा दिवस प्रत्येकाने साजरा करावा असाच आहे. तुम्हाला व्हॅलेंटाईन डे चा अर्थ कळलाय का? मग दुःखी राहण्यात काहीच अर्थ नाही. चला जाणून घेऊया सिंगल असणाऱ्या व्यक्ती नक्की काय करू शकतात.
पार्टी (Party)
तुम्हाला पार्टी करायला आवडते का? मग तुम्ही नक्की कसली वाट पाहत आहात, 14 फेब्रुवारी (14 February) च्या दिवशी अँटी – व्हॅलेंटाईन डे च्या नावे तुम्ही मस्त तुमच्या सिंगल मित्रमैत्रिणींसह पार्टी करू शकता. तुमच्या ग्रुपमध्ये जितके सिंगल्स आहेत, त्यांना एकत्र बोलवा आणि तुमच्या आवडत्या ठिकाणी मस्तपैकी खायला जा अथवा तुम्ही ड्रिंक्स घेत असाल तर अशा ठिकाणी जाऊन तुमचे सिंगल आयुष्य मस्तपैकी एन्जॉय करा. त्याचा आनंद घ्या.
फूडी नाईट (Foodie Night)
तुम्हाला जर जेवण बनवायला आणि ते सर्व्ह करायला आवडत असेल तर हा दिवस अधिक चांगला आहे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवा आणि व्हॅलेंटाईन डे हा चीट डे म्हणून साजरा करा. या दिवशी तुम्ही कोणत्याही डाएटचा विचार करू नका आणि चॉकलेट, केस, कँडी, गोड पदार्थ तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही बिनधास्त खा आणि खायला घाला.
स्वतःला द्या ट्रीट (Treat to yourself)
व्हॅलेंटाईन तर एक बहाणा आहे, तुम्ही स्वतःसाठी काहीतरी चांगलं नक्कीच करू शकता. तुम्हाला स्वतःला जर आनंदी ठेवायचं असेल तर कोणाही दुसऱ्याची गरज नाही. तुम्हाला एखाद्या दिवशी कोणती गोष्ट आवडली होती, पण काही कारणाने तुम्ही टाळली होती, त्याबाबत आठवा आणि या दिवशी स्वतःला ट्रीट देत ही गोष्ट पूर्ण करा. जर तुम्हाला काहीच आठवत नसेल तर स्वतःसाठी खरेदी करा, शॉपिंग करा.
कॉन्सर्ट (Concert)
तुम्हाला व्हॅलेंटाईन डे च्या संध्याकाळी जर कंटाळा आला असेल तर तुम्ही एखाद्या कॉन्सर्टला जायचा प्लॅन करा. तिथले वातावरण तुम्हाला अनेक चिंतांपासून काही काळ दूर ठेवण्यास मदत करेल. इतकंच नाही तर तुमच्या आवडीची गाणी असतील तर तुम्ही त्या गाण्यांवर थिरकूही शकता आणि अशा ठिकाणी नव्या ओळखीदेखील होतात जेणेकरून तुमचा मूड अधिक चांगला होण्यास मदत मिळते. तसंच एकटं जायचा कंटाळा आला असेल तर घरातील तुमच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीला घेऊन जा आणि तुमचे प्रेम आणि वेळ त्यांच्याबरोबर शेअर करा.
तुमच्या आवडींना वेळ द्या
व्हॅलेंटाईनचा अर्थ आहे प्रेमाचा दिवस. तुम्हाला या दिवशी सर्वात जास्त जी गोष्ट आवडते ती तुम्ही करा. तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून आपल्या आवडी जपायच्या असतील तर तुमच्यासाठी हा योग्य दिवस आहे. तुम्ही याच दिवशी आपल्या आवडी पुन्हा जपायला सुरूवात करा. स्वतःला वेळ द्या. तुमच्या मनामध्ये जे वाटत आहे तेच करा. दिवसभर पायजमा घालून सुट्टी घ्यावी वाटत असेल, लोळावे, आराम करावा वाटत असेल तर तुम्ही स्वतःसाठी तेदेखील करा. हवं तर एकट्याने फिरायला जा.
खरं तर या दिवशी तुम्ही एकटे आहात याबाबत वाईट वाटून घेण्यापेक्षा तुमच्या सिंगल असण्याचा आनंद व्यक्त करा. आपल्या मनानुसार राहा आणि आयुष्याचा आनंद घ्या!