ADVERTISEMENT
home / आपलं जग
सिक्किममध्ये फिरायला जाताय, मग या गोष्टी नक्की खरेदी करा 

सिक्किममध्ये फिरायला जाताय, मग या गोष्टी नक्की खरेदी करा 

सिक्किम (Sikkim) राज्यातील आल्हाददायक वातावरण, बर्फाच्छादित डोंगर, मठांमधून येणारे पवित्र ध्वनी आणि निसर्ग पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत राहतो. भूतान, टिबेट आणि नेपाळ या देशांनी वेढल्यामुळे या राज्यावर या तिनही देशांच्या संस्कृतीचा पगडा दिसून येतो. उंच डोंगरमाथ्यावर वसलेलं असल्यामुळे इकडे अनेक रोमांचक अॅक्टिव्हिटी करता येतात. बौद्ध भिक्खूंच्या मंत्रोच्चारातील शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मनाला सतत प्रसन्न ठेवते. या ठिकाणी फिरताना तुम्हाला अनेक मनमोहक गोष्टी खरेदी करण्याचा मोह आवरता येत नाही. यासाठीच जाणून घ्या सिक्किम राज्यात फिरायला गेल्यावर कोणत्या गोष्टी खरेदी करायलाच हव्या.

सिक्किममध्ये काय खरेदी कराल

सिक्किम राज्याची राजधानी असलेल्या गंगटोकमध्ये तुम्हाला एम जी रोड, लाल बाजार, न्यू मार्केट, ओल्ड मार्केटमध्ये तुम्हाला हव्या त्या गोष्टी खरेदी करता येतील.

चहा –

सिक्किममधील गंगटोक आणि पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये तुम्ही चहा खरेदी करू शकता. इथल्या लोकप्रिय अशा टेमी टी गार्डनमध्ये सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला चहा तुम्ही या ठिकाणची आठवण म्हणून नक्कीच खरेदी करू शकता. शिवाय सिक्किम राज्यात फिरून आल्यावर जवळच्या लोकांना भेट म्हणूनही तुम्ही हा चहा देऊ शकता. चहाच्या मळ्यांमध्ये तुम्हाला ताजा वाफाळता चहा टेस्ट करण्यासाठी दिला जातो. जवळ जवळ शंभर ते दोनशे रूपयांपर्यंत पतुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे चहाची पाकीटं खरेदी करता येतात. 

वॉल हॅंगिंग –

निरनिराळ्या ठिकाणी फिरताना घर सुशोभित करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी घेण्याची आवड असेल तर सिक्कीम संस्कृतीचे दर्शन घडवणारे वॉल हॅंगिंग्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तिबेटीयन कंदील अथवा रंगबिरंगी वॉल हॅंगिंग्स मार्केटमध्ये तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेतात. विशेष म्हणजे तुम्हाला या सर्व वस्तू अगदी पाचशे ते हजार रूपयांच्या आत मिळतात. 

ADVERTISEMENT

चांदीचे दागिने आणि मौल्यवान खडे –

गंगटोकमध्ये ड्रॅगन ज्वेलरी, मौल्यवान खडे आणि चांदीपासून बनवलेल्या वस्तू खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे जागोजागी तुम्हाला चांदीच्या दागिन्यांची दुकानं सापडतील. पण जर तुम्हाला खरंच यातील पारंपरिक आणि दुर्मिळ दागिने खरेदी करायचे असेल तर स्थानिक नागरिकांची मदत घ्या. मेटलच्या दागिन्यांची किंमत दोनशे पासून सुरू होते तर चांदीचे दागिने तुम्हाला हजार रू.पासून पुढील किंमतीत मिळतात. हिमालयन ज्वेलरी म्हणून टरकॉईज आणि निळ्या रंगाच्या स्टोनच्या दागिन्यांना जास्त मागणी असते.

सिक्किम कप –

सिक्किममध्ये नाजूक डिझाईन असलेलं क्रॉकरीचं साहित्यही तुमच्या मनाला सतत भुरळ घालत राहतं. मार्केटमध्ये सिरॅमिकपासून बनवलेले हे रंगीत कप तुम्ही खरेदी करू शकता. निरनिराळ्या आकाराचे आणि ड्रॅगन अथवा सिक्किम संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे कप तुम्ही भेटवस्तू म्हणूनही इतरांना देऊ शकता. या कपची किंमत अगदी पन्नास रू. पासून सुरू होते.

मुखवटे –

सिक्किममध्ये मिळणारी आणखी एक युनिक गोष्ट म्हणजे रंगीत आणि आकर्षक असे मास्क अथवा मुखवटे…सिक्किममध्ये हे मुखवटे बनवण्यासाठी खास कार्यशाळा असतात. सिक्किममधील अनेक पारंपरिक कार्यक्रमांमध्ये साधू आणि स्थानिक लोक हे मुखवटे परिधान करतात. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विविध आकाराचे आणि महाकाय असे मुखवटे दिसतात. झारू नावाच्या विशिष्ट झाडाच्या खोडाचा यासाठी वापर केला जातो. सिक्किमधील देवता आणि प्राण्यांचं दर्शन या मुखवट्यामधून होतं.

सिंगिग बाऊल –

सिंगिग बाऊल हे मंद स्वरनाद निर्माण करणारं एक कास्यांचे भांडे आहे. अनेक बौद्ध मोनेस्ट्री म्हणजेच मठांमध्ये याचा ध्यान आणि मंत्रोच्चारासाठी वापर केला जातो. या भांड्यावरून एका तालात लाकडाची काठी फिरवली की त्यातून मंद स्वरनाद निर्माण होतो. हा नाद आणि त्यातून निर्माण होणारी स्पंदने तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगली असतात. ज्यामुळे या सिंगिग बाऊललाही मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. प्रयत्न केल्यास तुम्हाला जुन्या काळातील अनेक साधूंनी वापरलेलं दुर्मिळ आणि पवित्र असं सिंगिग बाऊलही विकत मिळू शकतात. 

ADVERTISEMENT

प्रेअर व्हिल्स –

प्रेअर व्हिल्स म्हणजे दंडगोलाकार असे डबे असतात ज्यावर पवित्र मंत्र लिहीलेला असतो. एका काठीला ते जोडलेले असून ते फिरवल्यास त्यातून सुंदर नाद निर्माण होतो. अनेक मॉनेस्ट्रीमध्ये तुम्हाला असे प्रेअर व्हिल्स दिसतात. प्रेअर व्हिल्स फिरवताना होणाऱ्या नादातून वातावरणाची शुद्धता होते असा समज आहे. त्यामुळे याचं एक प्रतिक म्हणून विकत मिळणारे छोटे प्रेअर व्हिल्स तुम्ही खरेदी करू शकता.

दोर्जी बेल आणि थंडर बोल्ट –

सिक्किममध्ये तुम्हाला दोर्जी बेल आणि थंडर बोल्ट या धातूपासून बनवलेल्या दोन लोकप्रिय वस्तूही मिळतात. पुरूष आणि स्त्रीच्या उर्जेचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवल्या जातात. यातील थंडर बोल्ट पुरूष ऊर्जा आणि दोर्जी बेल हे स्त्री उर्जेचं प्रतिक मानलं जातं. घरात कौटुंबिक सौख्य नांदण्यासाठी या दोन वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता.

ऊबदार कपडे –

गंगटोक आणि दार्जिलिंग ही थंड हवेची ठिकाणं असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ऊबदार आणि लोकरीचे कपडे चांगले मिळतात.पश्मिना, स्वेटर, पोंचो, नेपाळी शॉल, स्टोल, मफ्लरसोबतच तुम्ही इथले पारंपरिक कपडेही खरेदी करू शकता. गंगटोक आणि दार्जिलिंगमध्ये जागोजागी या कपड्यांचे स्टॉल असतात. मात्र मार्केटमध्ये फिरल्यास तुम्हाला स्वस्त दरात हे कपडे खरेदी करता येतात. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
29 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT
good points logo

good points text