ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
कोणत्याही स्टार्टअपमध्ये नोकरी करण्याआधी जाणून घ्या या पाच गोष्टी

कोणत्याही स्टार्टअपमध्ये नोकरी करण्याआधी जाणून घ्या या पाच गोष्टी

तुम्हालाही आली आहे का स्टार्टअपमधून जॉबची ऑफर, तुम्ही ती स्वीकार केली आहे का? पण कोणत्याही स्टार्टअपमध्ये नोकरी स्वीकारण्याआधी काही गोष्टी माहीत करून घेणं आवश्यक आहे. मग भलेही त्यांच्याकडून कितीही चांगलं सॅलरी पॅकेज ऑफर करण्यात आलं तरी पुढील माहीती नक्की घ्या.

Shutterstock

आपल्या भारत देशात गेल्या काही वर्षात स्टार्टअप्सच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे नोकरीच्या संधीही भरपूर आहेत. अनेक स्टार्टअप्सकडून चांगली सॅलरीसुद्धा ऑफर केली जाते. तर दुसरीकडे अशीही माहिती समोर येत आहे की, हे स्टार्टअप मार्केटमध्ये बऱ्याच काळ टिकण्याच्या बाबतीत मात्र भरोश्याचे नाहीत. त्यामुळे जर तुम्ही स्टार्टअपमध्ये जॉब करण्याच्या विचारात असाल तर काही गोष्टींची काळजी नक्की घ्या.

ADVERTISEMENT

Shutterstock

लवकरच शोधावी लागू शकते दुसरी नोकरी : जर तुम्ही जास्त पैश्यांच्या मोहात स्टार्टअपमध्ये जॉब करण्याच्या विचारत असाल तर बाकीच्या गोष्टींचाही विचार करा. जसं तुम्हाला पैसै तर चांगले मिळतील पण जॉब सिक्युरिटी आणि इतर गोष्टींचं काय. कारण अशा स्टार्टअप्समध्ये अनेक सुविधा नसतात. कारण त्यांची नुकतीच सुरूवात असते. तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीतील नोकरी सोडून तिथे जाणार असाल तर तुम्हाला बाकीच्या बाबतीत तडजोड करावी लागू शकते. त्यामुळे कदाचित तुम्हाला दुसरी नोकरी शोधण्याची वेळही लगेचच येऊ शकते. 

आपल्या भूमिकेबाबत स्पष्टपणे विचारा : जेव्हा एखादं स्टार्टअप सुरू होतं तेव्हा तिथे सुरूवातील कमी फंड्स असतात. अशा वेळी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांकडून जास्त कामाची आणि जबाबदारीची अपेक्षा ठेवते. या काळात तु्म्हाला तुमच्या कामापेक्षा अधिकच्या जबाबदाऱ्याही दिल्या जातात. ज्यांचा तुम्ही कदाचित विचारही केला नसेल. अशावेळी हेच चांगलं ठरेल की, तुम्ही कोणताही स्टार्टअप जॉईन करण्याआधी एचआर किंवा सीईओशी आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट बोलून घ्या. 

ADVERTISEMENT

सॅलरी पॅकेज समजून घेणं महत्त्वाचं : स्टार्टअपमध्ये चांगल्या पगाराचं आमिष दाखवून नोकरीची ऑफर दिली जाते. पण सॅलरी पॅकेज हे बऱ्याच वेळा जसं दिसतं तसं नसतं. खरंतर स्टार्टअपमध्ये चांगल्या टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी एंप्लॉयी स्टॉक ऑप्शन्स (ESOPs) ची मदत घेतली जाते. जे कंपनीच्या शेअर्सशी निगडीत असतं. जर स्टार्टअप बंद झाला तर याचा काहीच फायदा नसतो. त्यामुळे कधीही स्टार्टअप जॉईन करण्यामागे हे कारण नसावे. त्यामुळ सॅलरी पॅकेज नीट समजून मग ऑफर स्वीकारा. 

फंडिंग आणि इन्व्हेस्टर्सबाबतही माहीती घ्या : ज्या स्टार्टअपमध्ये नोकरी करणार असाल त्याबाबत संपूर्ण माहिती घ्या. जसं कोण या स्टार्टअपसाठी पैसे देत आहे किंवा कोणाची गुंतवणूक आहे. किती पार्टनर्स आहेत. कोणत्या बँकेकडून लोन घेण्यात आलं आहे? यामुळे तुम्हाला कळेल की, नक्की किती गुंतवणूक असून गुंतवणूकदार कोण आहेत आणि पैसा नक्की कोणता आहे? 

पगाराची तारीख विचारा : स्टार्टअप कंपनीमध्ये इंटरव्ह्यूदरम्यान पगाराची तारीखही नक्की विचारा. इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना किंवा एचआरला याबाबत नक्की विचारा. कारण बरेचदा आपल्या लोनच्या ईएमआयची तारीखही एक असते त्यामुळे जर त्या तारखेला पगार मिळणार नसल्यास त्रासदायक ठरू शकते.

नोकरी बदलण्यासाठी ‘हे’ महिने आहेत बेस्ट

ADVERTISEMENT

#MoneyTips : या सोप्या ideas ने वाचवा तुमचे पैसे 

Canva

पण प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. एकीकडे मंदीमुळे बाजारात नोकरीच्या संधी कमी आहेत. पण स्टार्टअप्समध्ये तुम्हाला नोकरी तर मिळतेच पण अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्याने बरेच शिकताही येते. जर तुम्ही चांगल्या कामाच्या शोधात असाल तर सुरूवातीला अनुभवासाठी स्टार्टअपमध्ये काम करण्यास काहीच हरकत नाही. पण तरीही तिथे नोकरी स्वीकारण्याआधी वरील गोष्टी नक्की जाणून घ्या.

ADVERTISEMENT

‘या’ सोप्या टिप्स वापरून करा बचत आणि व्हा श्रीमंत

प्रत्येक महिन्याचा पॉकेटमनी वाचवायचा असेल तर 7 सोपे उपाय

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

ADVERTISEMENT
02 Mar 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT