कोणत्याही आवडीच्या ब्रँडमध्ये सेल लागला की त्याचा आनंद हा वेगळाच असतो. कधी एकदा सेलमध्ये जातो आणि खरेदी करतो असे खूप जणांना होऊन जाते. पण दोन वर्षामध्ये कोव्हिडच्या काळात मॉलमध्ये बऱ्याच काळासाठी सेल दिसून आला. हा सेल पहिल्यापहिल्यांदा खूप चांगला होता. पण आता सेलमध्ये खरेदी करण्याचा स्पीड खूपच कमी झाला आहे. तुम्हालाही येत्या काही काळात सेलमध्ये काहीतरी घ्यायचे असेत तर तुम्ही एकदा ही महत्वाची माहिती नक्की वाचायला हवी. जाणून घेऊया सेलमध्ये कपडे खरेदी करताना काय करायला हवे ते
साड्यांची खरेदी
साड्यांची खरेदी ही खूप महिलांसाठी फार महत्वाची असते. सेल लागल्यावर साड्यांची खरेदी करणे खूप जणांना आवडते. जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात साड्या घ्यायच्या असतील तर चांगल्या ओळखीच्या दुकानात जाऊनच करा.साड्या अर्ध्या किंमतीत असतील तर तुम्ही गिफ्टींगसाठी त्याची खरेदी करा. त्यामुळे साड्यांची खरेदी करताना तुम्हाला साड्या कशाला हव्या आहेत ते देखील बघा. साड्या पूर्ण उघडून बघा. अनेकदा खूप मोठे ब्रँडदेखील आपल्या साड्या काढण्यासाठी त्यांची किंमत कमी करतात. अशा साड्यांची डिझाईन प्रिंट नीट बघून घ्या. कारण कधी कधी त्यामध्ये काहीतरी फॉल्ट असण्याची शक्यता असते.
मॉलमध्ये कपड्यांची खरेदी करताना
मॉलमध्ये आता खूप ठिकाणी सेल सुरु आहे. येथील मोठ्या ब्रँडमध्ये खरेदी करताना तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवले की, यामध्ये अनेक कपडे जे आहेत ते खूप जुने असतात. ते तुम्हाला हवे असतील तर त्यांची खरेदी करा. कधी कधी आऊटडेटेड फॅशनचे असतात. पण काहींना असे कपडे चालून जातात. पण तुम्हाला जर असे कपडे नको असतील तर तुम्ही अजिबात असे कपडे घेऊ नका. इतकेच नाही तर मॉलमध्येही अनेक कपड्यांना घालताना डाग लागल्यानंतर ते कपडे सेलमध्ये काढले जातात. अशा कपड्यांना लागलेले डाग नीट तपासून घ्या. कारण नंतर असे कपडे बदलून मिळत नाहीत. म्हणून तुम्ही ते घेताना विशेष काळजी घ्या.
सेलमध्ये बॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरेदी करा हे प्रकार
इनरवेअर खरेदी करताना
आता सेल म्हटला की खूप ठिकाणी सेलमध्ये इनरवेअर असतात. खूप जणांना वर्षभरासाठी इनरवेअर घ्यायला आवडतात. इनरवेअर खरेदी करताना देखील तुम्हाला खूप विचार करावा लागतो. पण ब्रा घेताना विशेष काळजी घ्या. तुमची साईज नक्की तीच आहे की नाही हे देखील पाहा. कारण सेलमध्ये काही ठराविक साईज या सोल्ड आऊट झालेल्या असतात. त्याला पर्याय म्हणून तुम्हाला काही क्रॉस साईज दिल्या जातात. पण तुम्ही त्या टाळलेल्याच बऱ्या असतात. इनरवअर हा तुमचा खूप खासगी हायजिनचा प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. पँटीज घेताना देखील तुम्ही साईज, कपड्यांचा पोत आणि ते स्वच्छ आहेत की नाही ते देखील बघा. कारण बरेचदा कपडे घे कुठेतरी पडलेले असतात. त्यामुळे हायजिनचा प्रश्न निर्माण होतो.
आता कधीही सेल लागला असेल आणि त्यामध्ये काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काही गोष्टी नक्कीच लक्षात घ्यायला हव्यात
वर्षानुवर्षे ब्रा आणि अंडरगारमेंट्स राहतील टिकून, वापरा या सोप्या टिप्स