ADVERTISEMENT
home / आरोग्य
हिवाळ्यात कधीच करू नका ‘या’ चुका

हिवाळ्यात कधीच करू नका ‘या’ चुका

ऋतूमानानुसार हवामानात बदल होत असतात. सहाजिकच या बदलांचा परिणाम तुमच्या आरोग्यावर जाणवू लागतो. ज्यामुळे तुम्हाला ताप, सर्दी, खोकला असे आजार या काळात वारंवार होतात. पण जर काही गोष्टींची काळजी घेतली तर या आरोग्य समस्या नक्कीच टाळता येतात. वास्तविक यासाठी हिवाळ्यात यासाठी काही गोष्टी करणं आवर्जून टाळावं. कारण या गोष्टींचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. 

Shutterstock

हिवाळ्यात कोणत्या गोष्टी करणे टाळावे –

हिवाळ्यात चुकूनही या गोष्टी करू नका. कारण त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो.

ADVERTISEMENT

सतत लोकरीचे अथवा गरम कपडे घालणे –

हिवाळ्यात स्वेटर, हुडी, शॉल, जॅकेट अशा गरम कपड्यांमुळे तुम्हाला नक्कीच उबदार वाटते. पण सतत असे कपडे घालून ठेवणं आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही. कारण यामुळे तुमच्या शरीराला अती प्रमाणात घाम येतो. काही वेळ गरम कपडे घालणं ठिक आहे मात्र दिवसभर गरम कपडे घालून ठेवणे टाळावे.शिवाय सतत ग्लोव्ज आणि पायात मोजे घातल्याने हात व पाय उबदार राहतात. मात्र लक्षात ठेवा हात व पाय हे आपल्या शरीरातील असे अवयव आहेत जे बाहेरच्या शरीराला वातावरणाशी अनुकूल राहण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही हातापायावर असे मोजे घालून ते  सतत झाकून ठेवता तेव्हा शरीराला बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यास समस्या होतात. यासाठी रात्री मोजे घालून कधीच झोपू नका. कारण रात्रीचे मोजे घालून झोपल्याने हातापायांमधील रक्ताभिसरण होण्यास अडथळा निर्माण होतो.

कमी प्रमाणात पाणी पिणे –

उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात नेहमीच तहान कमी लागते. कोणत्याही ऋतूत तुमच्या शरीराला पुरेशा पाण्याची गरज ही असतेच. थंड वातावरणात तर शारीरिक श्रम कमी झाल्याने  तुम्ही पाणी कमी प्रमाणात पिता. तज्ञ्जांच्या मते हिवाळ्यात देखील आपले शरीर हायड्रेट असण्यासाठी दररोज कमीतकमी आठ ग्लास पाणी पिण्याची गरज असते. मात्र पुरेसे पाणी न प्यायल्याने डिहायड्रेशन मुळे आरोग्य समस्या जाणवू लागतात. पाण्याची कमतरता व कॅफेनचे अधिक प्रमाण याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. यासाठीच या काळात चहा, कॉफीऐवजी पुरेसे पाणी प्या. 

Shutterstock

ADVERTISEMENT

अयोग्य आहार घेणे –

हिवाळ्यात जास्त भुक लागते. ज्यामुळे थंडीमध्ये जास्तीत जास्त तळलेले पदार्थ आणि जंक फुड खाल्ले जातात. शिवाय थंडीमुळे सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा आल्यामुळे व्यायाम व वर्कआऊट कडे देखील दुर्लक्ष केले जाते. कमी व्यायाम व ज्यास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाणे यामुळे तुमचे वजन वाढू लागते. यासाठी थंडीमध्ये ताज्या भाज्या व फळे भरपूर खा. योग्य आणि पोषक आहार घेणं  थंडीच्या दिवसात महत्त्वाचं आहे.

सनस्क्रीन न वापरणे –

थंडीमध्ये सुर्यप्रकाशात फिरल्याने ऊबदार वाटते.  उन्हात फिरताना सनस्क्रीनचा वापर करायलाच हवा. मात्र थंडी लागत असल्यामुळे या काळात सनस्क्रीनचा वापर टाळला जातो. यासाठीच घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन अवश्य लावा. 

सतत ओटीसी औषधे घेणे –

जर तुम्हाला थंडीत होणा-या सर्दी-खोकल्यामुळे सतत औषधे घ्यावी लागतात. मात्र अशी सतत औषधे घेणं शरीरासाठी चांगलं नाही. कारण सतत औषधे घेतल्याने तुमच्या प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच अशा वेळी घरगुती उपचार करून तुमच्या आरोग्य समस्या  दूर करा आणि योग्य आहार घ्या ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढेल. 

झास्त झोप घेणे –

हिवाळ्यात अंगावर पांघरून घेऊन झोपण्यात एक वेगळीच मौज असते. ज्यामुळे हिवाळ्यात उशीरापर्यंत झोपण्याची सवय लागते. शिवाय जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा हिवाळ्यात तुम्ही दुपारीदेखील झोपता. अती झोपेमुळे तुमच्या शरीराची हालचाल मंदावते. ज्याचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर पडतो. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

हिवाळ्यात आस्वाद घ्या ‘या’ स्वादिष्ट लोणच्यांचा, वाचा झटपट पाककृती

हिवाळ्यात केसातील कोंडा घालवण्यासाठी करा सोपे उपाय

हिवाळ्यात सनस्क्रिन वापरणं आहे गरजेचं, जाणून घ्या कारणं

 

ADVERTISEMENT
23 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT