आजकालचं वाढतं प्रदूषण, चुकीचा आहार, सतत केल्या जाणाऱ्या हेअर स्टाईल आणि ट्रिटमेंट याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो. सोमवारी कॉलेज अथवा ऑफिसला जाताना तुम्ही केस व्यवस्थित मॅनेज करता मात्र रविवारपर्यंत केसांचे अतोनात हाल होतात. जर तुम्ही सतत केसांना ओव्हर हीट करत असाल अथवा केसांवर निरनिराळ्या स्टाईल ट्राय करत असाल तर आता तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे.
प्रत्येकाच्या केसांमध्ये तीन प्रकारचे लेअर असतात. ज्यातील आतल्या भागाला Medulla मधल्या भागाला Cortex आणि वरच्या भागाला Cuticle असं म्हणतात. क्युटिकल्स मुळे तुमच्या केसांच्या वरच्या आवरणाचे संरक्षण होते. मात्र जेव्हा अती उष्णता, धुळ, प्रदूषणामुळे केसांवरील क्युटिकल्सचे नुकसान होते तेव्हा तुमचे केस निस्तेज आणि कोरडे होतात. तुमचे केस निस्तेज आणि कोरडे झाले असतील तर मुळीच काळजी करू नका. कारण आताही तुम्ही काही सोपे उपाय करून तुमच्या केसांना पूर्ववत करू शकता.
केसांना नैसर्गिक चमक आणण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स –
धुळ, प्रदूषण, सुर्याची अतिनील किरणं, ब्लीचिंग, केमिकल ट्रिटमेंट, सतत हेअर स्टाईल करणं, केसांवरून वारंवार कंगवा अथवा ब्रश फिरवणं, चुकीचे हेअर प्रॉडक्ड्स वापरणं यामुळे तुमचे केस खराब होतात. यासाठी केसांची निगा राखण्यासाठी करा हे सोपे उपाय
केसांवर वापरण्यात येणारे हेअर टूल्स कमी तापमानावर ठेवा –
केसांवर केल्या जाणाऱ्या विविध हेअर स्टाईल्समुळे तुम्ही नक्कीच सुंदर आणि आकर्षक दिसता. काही जणींचे प्रोफेशनच असे असते की त्यांना नेहमी विविध हेअर स्टाईल करण्यासाठी हेअर ड्रायर, स्टेटनर, कर्लरचा वापर करावाच लागतो. मात्र वारंवार या वस्तू वापरल्यामुळे तुमचे केस अती उष्णतेमुळे खराब होतात. यासाठीच ही उत्पादने वापरताना ती कमी तापमानावर असतील याची काळजी घ्या. ज्यामुळे तुमचे केस नक्कीच खराब होणार नाहीत.
केसांसाठी चांगल्या दर्जाचे आणि सल्फेट फ्री शॅंम्पू वापरा –
केसांच्या स्वच्छतेसाठी शॅम्पूचा वापर करणं नक्कीच गरजेचं आहे. मात्र लक्षात ठेवा या शॅंम्पूमधील केमिकल्समुळे तुमचे केस खराब होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठीच तुमच्या केसांसाठी सल्फेट फ्री, पॅराबेन फ्री अथवा सौम्य शॅम्पूचा वापर करा. आवळा, ब्राम्ही, जास्वंद, कोरफड, कडूलिंब, ग्रीन अॅपल अशा नैसर्गिक गोष्टी वापरून तयार करण्यात आलेले शॅम्पू वापरणं नेहमीच चांगलं. त्यामुळे शक्य असल्यास हे शॅम्पू वापरण्याचा प्रयत्न करा.
Shutterstock
केस नियमित ट्रीम करा –
केसांना जर फाटे फुटले तर तुमच्या केसांना कोणतेच पोषण मिळत नाही. शिवाय केस निस्तेज, फ्रिजी आणि कोरडे दिसतात. यासाठीच अशा केसांना नियमित निगा राखण्याची गरज असते. केसांना फाटे फुटू नयेत यासाठी दर तीन महिन्यातून एकदा केस ट्रीम करायला मुळीच विसरू नका. यासाठी चांगल्या सलॉनमध्ये तुमचा हेअर कट करा. ज्यामुळे केसांचे नुकसान कमी होईल.
ओल्या केसांवरून कंगवा फिरवू नका –
बऱ्याच जणींना ओले केस टॉवेल रगडून कोरडे करण्याची सवय असते. तुमचे केस पातळ असो अथवा जाडे ते ओले असताना कधीच पुसू नका अथवा त्यावरून कंगवा फिरवू नका. कारण ओले केस लवकर तुटण्याची शक्यता असते. म्हणून केस ओले असताना त्यांची विशेष काळजी घ्या ज्यामुळे तुमच्या केसांचे अधिक नुकसान होणार नाही.
Shutterstock
केसांसाठी योग्य प्रकारच्या अथवा नैसर्गिक हेअर मास्कचा वापर करा –
बाजारात मिळणारे हेअर मास्क हे तुमच्या केसांच्या प्रकार आणि समस्या लक्षात घेऊनच तयार केलेले असतात. त्यामुळे हेअर मास्क निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा. चुकीचा हेअर मास्क वापरल्यास फायद्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला हेअर मास्क निवडणं कठीण जात असेल तर घरी असलेले घरगुती आणि नैसर्गिक हेअर मास्क वापरून केसांची स्वच्छता राखा.
पोहताना आणि उन्हातून फिरताना केसांची काळजी घ्या –
बऱ्याचदा पिकनिकला गेल्यावर स्विमिंग पूलमध्ये पोहणे आणि उन्हातून भटकणे या गोष्टी अनेकांच्या आवडीच्या असतात. समुद्रावर भटकताना, पाण्यात डुंबताना तुमच्या केसांचं नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वेळी पोहताना स्विमिंग कॅप आणि उन्हातून फिरताना छत्री, कॅप, स्कार्फचा वापर केल्यास तुमचे केस खराब होणार नाहीत.
योग्य प्रकारचे हेअर कंडिश्नर आणि सिरम वापरा –
हेअर कंडिश्नर आणि सिरम यामुळे तुमच्या केसांवर एक संरक्षक कवच निर्माण होतं. तुमच्या केसांचे धुळ, माती, प्रदूषण आणि उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी केसांवर चांगल्या प्रकारचे कंडिश्नर आणि सिरमचा वापर करा.
या सोप्या आणि साध्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे डॅमेज केस पुन्हा चांगले करू शकता.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
केसांना निरोगी ठेवण्यासाठी वापरा सल्फेट-फ्री शँपू
एका रात्रीत निघून जाईल हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा, करा घरगुती उपाय
तुमच्यासाठी ही लिपस्टिकची शेड आहे परफेक्ट, वाचा कारण