ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
दिवसाची सुरूवात ‘परफेक्ट’ हवी असेल तर टाळा या ‘5’ गोष्टी

दिवसाची सुरूवात ‘परफेक्ट’ हवी असेल तर टाळा या ‘5’ गोष्टी

सकाळी उठल्यावर नेहमी चांगल्या गोष्टी कराव्या हे आपण ऐकलेलं असेलच. यासाठीच लहानपणी आपल्याला उठल्यावर प्रथम तळहाताचे दर्शन घेऊन “कराग्रे वसते लक्ष्मी:” हे स्त्रोत्र म्हणण्यास शिकवलं जातं. सुरूवातीला आपण ते करतो मात्र हळूहळू बदलत्या जीवनशैलीमुळे नकळत अनेक चुकीच्या गोष्टी आपण करू लागतो. वास्तविक अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे तुम्हाला सकाळी अगदी ताजं आणि फ्रेश वाटतं. मात्र यासोबत अशाही अनेक गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्यावर टाळलेल्याच बऱ्या. कारण दिवसाची सुरूवात या गोष्टींनी केली तर तुमचा दिवस कंटाळवाणा आणि निरूत्साही जाऊ शकतो. 

1. अर्लाम बंद करून पुन्हा झोपणं –

Shutterstock

“लवकर निजे आणि लवकर उठे त्याला आरोग्यसंपदा लाभे” हे सर्वांना माहीत असतं. लवकर उठण्यासाठी आपण अर्लाम सेट करून झोपतो देखील. मात्र सकाळी अर्लाम वाजल्यावर काही लोक तो अर्लाम बंद करून पुन्हा झोपी जातात. असं मुळीच करू नका कारण त्यामुळे तुमच्या लवकर उठण्याच्या संकल्पाला नकळत तुम्हीच टाळत असता. जर तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटावं असं वाटत असेल तर अर्लामप्रमाणे उठा आणि कामाला लागा.

ADVERTISEMENT

लवकर उठण्याबद्दल देखील वाचा

2. सोशल मीडिया पाहणं –

Shutterstock

बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यावर सर्वात आधी सोशल मीडिया चेक करायची सवय असते. आजकाल सोशल मीडियावर गॉसिप, क्राईम, दुःखद घटना अशाच गोष्टी अधिक असतात. सकाळी उठल्या उठल्या या गोष्टी पाहण्यामुळे तुम्ही त्याच विचारांमध्ये गुंतून राहता. ज्यामुळे तुमचं दिवसभराचं प्लॅनिंग बारगळू शकतं. शिवाय यामुळे सकाळी उठल्याबरोबर करण्यासारख्या चांगल्या गोष्टी करण्यापासून तुम्ही दूर जाता. 

ADVERTISEMENT

3. उठल्यावर अंथरूणातच कॉफी घेणं –

Shutterstock

काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या बेडमध्येच कॉफी अथवा बेड-टी घेण्याची सवय असते. खरंतर रात्रीचं जेवण केल्यानंतर बराच काळ गेलेला असतो. त्यामुळे सहाजिकच तुमचं पोट बऱ्यापैकी रिकामं झालेलं असतं. अशा अनोशीपोटी अथवा रिकाम्यापोटी तुम्ही कॉफी अथवा चहा घेतला तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतात. चांगला हेल्दी नास्ता केल्यावर चहा, कॉफी घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र उपाशी पोटी चहा अथवा कॉफी नक्कीच घेणं योग्य नाही. 

4. सकाळी मसालेदार पदार्थ खाणं –

सकाळी उठल्यावर कॉलेज, ऑफिस अथवा कामानिमित्त बाहेर पडण्यापूर्वी चांगला आणि पौष्टिक आहार फार गरजेचा असतो. सकाळी जर तुम्ही हेल्दी आणि व्यवस्थित नाश्ता केला तर तुमच्या शरीरामध्ये पुरेशी ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. मात्र जर सकाळी उठल्यावर मसालेदार अथवा चमचमीत पदार्थ खाल्ले तर तुम्हाला दिवसभर कंटाळवाणं आणि जड वाटू शकतं. यासाठी सकाळी उठल्यानंतर काय खायचं याचा नीट विचार करा.

ADVERTISEMENT

5. उठल्यावर धुम्रपान अथवा मद्यपान करणं –

धुम्रपान आणि मद्यपान आरोग्यासाठी हितकारक नाही हे वेगळं सांगायची तशी गरज नाही. याबाबत सतत होणाऱ्या जनजागृतीमुळे अगदी लहान मुलांनाही हे पक्कं माहीत असतं. तरिही अनेक माणसं या व्यसनांच्या आहारी गेलेली आढळतात. जर तुम्हाला अशा गोष्टींची सवय असेल तर कमीत कमी सकाळी उठल्याबरोबर धुम्रपान अथवा मद्यपान करू नका. कारण त्यामुळे तुमचा पूर्ण दिवस कंटाळवाणा होऊ शकतो. 

अशा काही गोष्टी टाळून जर तुम्ही दिवसाची सुरूवात सकारात्मक गोष्टी, प्रियजनांशी गप्पा अथवा प्रार्थनेने केली तर तुमचा दिवस नक्कीच फ्रेश आणि चांगला जाईल.

अधिक वाचा

सकाळी लवकर उठण्याचे ‘हे’ असतात फायदे

ADVERTISEMENT

 सकाळी उठल्यावर फॉलो करा ‘या’ 5 मिनिट टीप्स

रात्री तुम्ही ट्राय करा ‘या’ 6 ट्रिक्स आणि सकाळी मिळतील Gorgeous Hair!

 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT
25 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT