पडद्यावर अभिनेता साकारणारे कितीतरी कलाकार अनेकदा अभिनय सोडून इतर क्षेत्रात काम करण्याचाही विचार करतात. एखाद्या अभिनेत्याला दिग्दर्शक, निर्माता आणि गायक होताना तुम्ही पाहिले असेल. आता या यादीमध्ये आणि एक अभिनेत्याचे नाव जोडले गेले आहे ते म्हणजे टायगर श्रॉफचे… इतरवेळी चित्रपटात धमाकेदार स्टंट करणारा टायगर संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याने त्याच्या गाण्याची एक झलक त्याच्या फॅन्ससाठी शेअर केली आहे. ‘Unbelievable’ असे या गाण्याचे टायटल असून त्याचे हे गाणे लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. जाणून घेऊया टायगरला नेमके गायक का व्हावेसे वाटले?
संजय राऊतच्या वादग्रस्त विधानावर कंगनाने दिले असे उत्तर
टायगरला व्हायचे आहे गायक?
टायगर श्रॉफ उत्तम डान्सर, अभिनेता, स्टंट करणारा अॅक्शन हिरो म्हणजे तो एक मल्टी टॅलेंटेड अभिनेता आहे. पण तो कधी गाऊ शकतो. यावर कदाचित त्याच्या फॅन्सला विश्वास बसला नसता जर टायगरने हा व्हिडिओ शेअर केला नसता. ‘Unbelievable’ असे टायटल असलेल्या या गाण्याचा टीझर त्याने त्याच्या इन्स्टावर शेअर केला आहे. या मोशन टीझरमध्ये टायगर नेमकं काय गातं आहे ते कळतं नाही. पण तो काही सूर आळवताना दिसत आहे. त्याने याखाली लिहिलेली कॅप्शनही फारच सुंदर आहे. त्याने लिहिले आहे की, ‘मला नेहमीच मी गायलेल्या गाण्यावर गायचे होते. पण मी कधी गाऊ शकेन अशी हिंमत नव्हती. लॉकडाऊनमध्ये काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात हे नवं काहीतरी घडलं आहे. ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे.तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल.’
हे बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत आऊडसाईडर, त्यांचे आहेत असे कनेक्शन
दिशा पटनीने दिल्या शुभेच्छा
एखाद्या अभिनेत्याने एखादी नवी गोष्ट पोस्ट केली की, त्याच्या पोस्टवर कोण कमेंट करतं ? याकडेही अधिक लक्ष दिले जाते.त्यामुळे टायगर श्रॉफच्या व्हिडिओला बॉलिवूडमधून अनेक कंमेट्स आल्या आहेत. पण सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते दिशा पटनीच्या कमेंट्ने. दिशा ही टायगरची गर्लफ्रेंड असून त्यांनी त्यांचे नाते जगजाहीर केले नसले तरी त्यांची जोडी त्यांच्या फॅन्सना फारच आवडते. त्यामुळे दिशा पटनीने कमेंट दिल्यानंतर अनेकांचे लक्ष त्या कमेंटने वेधून घेतले आहे. दिशाने टायगरच्या या नव्या गोष्टीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दिशाच नाही तर या क्षेत्राशी निगडीत अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे टायगरचा हा नवा प्रोजेक्ट फारच प्रतिक्षित असल्याचे दिसत आहे.
शाहरूख खानने का दिला या मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांना नकार
टायगरचे फिटनेस व्हिडिओ हिट
टायगर या सगळ्या व्यतिरिक्त फिटनेससाठीही ओळखला जातो. त्याने लॉकडाऊनच्या या काळात अनेक फिटनेस व्हिडिओ शेअर केले आहेत. त्याच्या या फिटनेस व्हिडिओचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्याने काही नवा व्हिडिओ टाकण्याची प्रतिक्षा त्याचे फॅन्स करत असतात.
अनेक अभिनेते झाले सिंगर
टायगरच नाही तर या आधीही अनेक अभिनेत्यांनी गाणं गाण्याचा प्रयत्न केला आहे. सलमान खान याने देखील त्याच्या अनेक चित्रपटांसाठी गाणं गायलं आहे. यामध्ये अक्षय कुमार, निल नितीन मुकेश, फरहान अख्तर अशा काही अभिनेत्यांचा समावेश आहे.
सध्याच्या घडीला टायगर सिंगर झाला आहे. त्याचं हे नवीन गाणं कधी येईल त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.