हे बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत आऊडसाईडर, त्यांचे आहेत असे कनेक्शन

हे बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत आऊडसाईडर, त्यांचे आहेत असे कनेक्शन

बॉलिवूड आणि नेपोटिझम हे जे काही समीकरण आहे आता अनेकांच्या लक्षात आले आहे. स्टार्सच्या मुलांना चित्रपटांमध्ये काम करण्याची अगदी सहज संधी मिळते असा आरोप कायम स्टार किड्सवर केला जातो. पण बॉलिवूडमध्ये असे काही आऊडसाईडर आहेत ज्यांनी त्यांच्या टॅलेंटवर नाव कमावले आहे. पण असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी कायम ते आईडसाईडर असल्याचे म्हटले पण बॉलिवूडशी त्यांचे आधीपासूनच लागेबंधे असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे. जाणून घेऊया असेच काही स्टार्स आणि त्यांचे असलेले बॉलिवूड कनेक्शन

अभिनेत्री नसूनही या आहेत बी टाऊनच्या दमदार सेलिब्रिटी

रणवीर सिंह (Ranveer Singh)

Instagram

लार्जर दॅन लाईफ पाहणारा रणवीर सिंह सध्या बॉलिवूडचा एक मोठा स्टार आहे. त्याने या पदापर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली या गोष्टी अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने ऐकल्या आहेत. पण रणवीर सिंह आणि त्याचा स्ट्रगल जरी खरा असला तरी त्याचे आधीपासूनच बॉलिवूडशी लागेबंधे आहेत. रणवीर हा सोनम कपूर म्हणजे अनिल कपूर यांच्या नात्यातील आहे.  सोनमच्या आईची आई आणि रणवीरच्या वडिलांचे वडील हे भाऊ बहीण आहेत. या नात्यानुसार त्यांचे आई-वडील हे चुलत भाऊ-बहीण आहेत. त्यामुळे रणवीर सिंहचे आधीपासूनच बॉलिवूड कनेक्शन अशा पद्धतीचे आहेत. 

इमरान हाश्मी

Instagram

किंसिंग स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला इमरान हाश्मी.. एके काळी प्रसिद्ध अभिनेता म्हणून नावारुपाला आला. दिसायला सर्वसामान्य आणि हिरोप्रमाणे उंची नसूनही त्याने अनेक अभिनेत्रींसोबत फार उत्तम पद्धतीने काम करुन आपले नाव प्रस्थापित केले. अनेकांना इमरान हाश्मी हा आऊडसाईडर असल्याचे वाट होते. पण असे मुळीच नाही. चित्रपट निर्माते महेश भट यांच्या कुटुंबांशी त्याचे संबंध आहेत. मोहित सुरीच्या अनेक चित्रपटात इमरान हाश्मीने काम केले आहे. इमरान हाश्मी मोहित सुरीचा चुलत भाऊ असून आलिया, पूजा,शाहीन या देखील त्याच्या चुलत बहिणी आहेत. त्यामुळे त्याचेही आधीपासून बॉलिवूड कनेक्शन आहेत. 

या बॅकराऊंड डान्सर्सनी बॉलिवूडमध्ये निर्माण केली आपली ओळख

अम्रिता राव

Instagram

ज्येष्ठ अभिनेते गुरुदत्त यांची अम्रिता राव ही नात आहे.  अम्रिता रावचे वडील आणि गुरुदत्त हे एकमेकांचे चुलत भाऊ  त्यामुळे अम्रिता राव हिला अभिनयाचा वारसा लाभला आहे. तिचे वडील जाहिरात क्षेत्राशी निगडीत आहेत.  अम्रिता राव आणि दीपिका पदुकोण यांचे देखील नाते आहेत. त्यामुळे तिचेही बॉलिवूड कनेक्शन आधीपासूनच आहेत.

विकी कौशल

Instagram

हाऊज द जोश? हाय सर म्हणत… विकी कौशल घराघरात जाऊन पोहोचला. एक नवा चेहरा बॉलिवूडमध्ये एक नवी आशा देणारा होता. कोणताही स्टार किड नसल्यामुळे विकीचा बोलबाला बॉलिवूडमध्ये चांगलाच चालला होता. देशाप्रती अभिमान असलेले वेगवेगळे चित्रपट करत त्यांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केली. पण विकी कौशलच्या स्ट्रगलचा किस्सा कोणीच कधी फारसा ऐकला नसेल. पण त्याच्या नावाशी संबधित इतर कोणताही कलाकार बॉलिवूडमध्ये नसल्याचे म्हटले जात होते. पण विकी कौशल याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमध्ये एक स्टंट परफॉमर आहेत. ते बरेच प्रसिद्ध असून त्यांच्या अनेक ओळखीही आहेत. त्यामुळेच त्याचेही बॉलिवूडशी संबंध आहेत हे सिद्ध होते. 


हे बॉलिवूडचे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी ओळख मिळवली खरी पण त्यांचे आधीपासूनच बॉलिवूड कनेक्शन आहेत.

या विचित्र फोटोंमुळे हे सेलिब्रिटी झाले होते चर्चेचा विषय