काही दिवस पावसाने दडी मारल्यानंतर आता काही ठिकाणी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आता बाहेर मस्त पाऊस पडत असताना घरी भजी तळण्याचा बेत होणार नाही. असे फारच कमी घरांमध्ये असेल. पण खूप जणांना घरी केलेली भजी आवडत नाही कारण ती बाहेरुन आणलेल्या भजीसारखी कुरकुरीत नसते किंवा त्या भजींची चव टपरीवर मिळणाऱ्या गरम गरम भजी सारखी नसते. तुम्ही केलेली कांदाभजी नरम आणि बटाटा भजी तेलकट होतात का? मग भजी करताना तुमचे काहीतरी चुकत आहे. कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी करण्यासाठी फॉलो करा या टीप्स
मायक्रोव्हेवमध्ये होणाऱ्या या चविष्ट भारतीय रेसिपी
कांदा भजी करताना
shutterstock
कुरकुरीत कांदा भजी आणि मस्त चहा किंवा कॉफीचा कप… वा! अनेकांना कांदा भजी खूप आवडते पण ही कांदा भजी मस्त कुरकुरीत व्हायला हवी तरच मजा येते. अनेकांचे कांदाभजीचे गणित बिघडते मग काय त्यांची कांदा भजी कुरकुरीत होत नाही तर नुसते बेसनचे पीठ लागते. कुरकुरीत कांदा भजी करण्यासाठी या काही टीप्स
- कांदाभजीसाठीचा कांदा चिरताना तो नेहमी उभा चिरावा.कांदा पातळ चिरल्यास फारच उत्तम
- सुरीने पातळ कांदा चिरता येत नसेल तर तुम्ही कांदा चिरण्याच्या यंत्राने कांदा चिरुन घ्या.
- कांदा चिरल्यानंतर तो चांगला मोडून त्यात मीठ घाला. कांद्याला पाणी सुटल्यानंतर त्यात बेसन, हळद, तिखट घाला.
- मिश्रण फार वेळ तिंबून ठेवू नका.कारण त्यामुळे तुमच्या कांदाभजीचा कांदा कुरकुरीत न होता नरम पडतो. हा कांदा चांगला लागत नाही.
- त्यामुळे तुम्हाला कांदा चिरल्यानंतर आणि त्यात बेसन घातल्यानंतर तुम्हाला लगेचच भजी तळायची आहे.
- तेल गरम झाल्यानंतर कांदा भजी तेलात सोडा. तेलात सोडताना भजी लांब लांब सोडा. म्हणजे त्या भजी एकमेकांना चिकटणार नाही.
- भजी लांब लांब सोडताना त्याचा आकारही लहान असू द्या. त्यामुळे भजीत घातलेलं बेसन चांगल शिजेल.
पावसाळ्यात नक्की ट्राय करा या पौष्टिक भजी
बटाटा भजी करताना
shutterstock
- बटाटा नेहमी पातळ चिरावा. त्यामुळे भजी चांगली होतात.
- बटाटा भजीसाठी बेसनचे भिजवलेले पीठ नेहमी घट्ट हवे. म्हणजे बटाट्याच्या कापाला ते बेसन पूर्ण लागले.
- बटाटा पातळ चिरताना तो खूप वेळ पाण्यात ठेवू नका.
- बटाटा भजीदेखील तुम्ही पटकन करुन घ्या.
- भजी कुरकुरीत हवी असेल तर पिठामध्ये अगदी किंचितसा सोडा किंवा तांदुळाचे पीठ घाला.
उन्हाळ्यात जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही करा या रेसिपीज
तळणीचे तेल
shutterstock
सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे तळण्याचे तेल. तुम्ही जर सतत वापरलेले तेल जर भजी तळण्यासाठी वापरले तर तुमची भजी चांगली होणार नाही. जुन्या तेलामध्ये तळलेली भजी ही नेहमीच काळी होते. त्यामुळे ती चांगली दिसत नाहीच. शिवाय त्याची चवही करपलेली लागते. त्यामुळे जर तुम्ही भजी किंवा कोणताही तळणीचा प्रकार करणार असाल तर तुम्ही जितकं फ्रेश तेल वापराल तितके चांगले. भजी तळल्यानंतर तेलाचा गाळ काढून घ्या. म्हणजे तुम्हाला ते तेल किमान दोनदा वापरता येईल. पण जुने तेल वापरणे टाळा.