ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
असं डेकोरेट करा तुमचं बाल्कनी गार्डन

असं डेकोरेट करा तुमचं बाल्कनी गार्डन

आपल्या प्रत्येकालाच बाल्कनीमध्ये सुंदर झाडं असावी किंवा छानसं गार्डन असावं, असं वाटतं. पण आपल्या धावपळीच्या आयुष्यात आणि मुंबईच्या जागेच्या प्रश्नात गार्डन असणं तर स्वप्नवत आहे. असो, प्रत्येकाच्या फ्लॅटला आजकाल फ्रेंच विंडोज किंवा बाल्कनीज असतातच. त्यामुळे आपण त्यालाच छोट्याश्या बाल्कनी गार्डनमध्ये बदलू शकतो. या सुंदर बाल्कनी गार्डनमध्ये तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात बसून मस्तपैकी चहाचा आस्वाद घेऊ शकता तर थंडीच्या दिवसात उन्हाचा शेक घेऊ शकता.

Instagram

खासकरून पावसाळ्याचं पाणी हे रोपांसाठी जीवनदानाचं काम करतं. पावसाळ्यात त्यांची वाढ नैसर्गिकरित्या होते. इतर महिन्यांपेक्षा जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाला रोपांचा जास्त प्रतिसाद असतो. त्यामुळे आपण या काळात तुमच्या बाल्कनी गार्डनला नवा लुक नक्कीच देऊ शकतो. हे पाहायलाही फ्रेश वाटेल आणि घरात सकारात्मक एनर्जीही येईल. फक्त यासाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज सिस्टम आणि रोपांच्या रचनेमध्ये तुम्हाला थोडेफार बदल करावे लागतील. बाल्कनी गार्डनसाठी फॉलो करा या टीप्स –

ADVERTISEMENT

अशी करा झाडांची रचना आणि सजावट

  • तुमच्या घरात जर एखादं जुन लाकडाचं टेबल असेल तर ते बाल्कनी किंवा टेरेसमध्ये शिफ्ट करा आणि त्यावर कुंड्या ठेवा. यामुळे तुम्हाला झाडांना व्यवस्थित पाणी देता येईल आणि गार्डनला एक वेगळा लुकही मिळेल.
  • तुम्ही तुमच्या घरातील गार्डनला व्यवस्थित जागा दिल्यास त्यात तुम्ही पॉन्ड, वॉटर फॉल, बर्ड फिडर लावूनही डेकोरेट करू शकता. तसंच इतरही डेकोरेटीव्ह गोष्टींनी तुमची बाग सजवू शकता. जसं हँगिंग कुंड्या, रंगीबेरंगी पेबल्स, डिझाईनर स्टोन्स, कृत्रिम गवत किंवा अगदी घरातील जुन्या काचेच्या बाटल्यांचा किंवा तांब्याचं घंगाळ यांचाही वापर करू शकता.
  • नेहमीच्या कुंड्यासोबतच बाजारात तुम्हाला बेडूक, कासव यांच्या आकारातील कुंड्याही आजकाल मिळतात. ज्या दिसायला नेहमीच्या कुंड्यापेक्षा छान असतात. यामध्ये रोपं लावून तुम्ही त्याच्या बाजून आर्टिफिशियल झऱ्याची रचना करू शकता.

Instagram

पावसाळ्यात घ्या रोपांची अशी काळजी –

  • पावसाळ्याच्या दिवसात जास्त वेगाने वाढणारी रोपं लावा. रोपांची लागवड करताना ती एका रांगेत लावता येतील ते पाहा. ज्यामुळे तुमच्या बाल्कनी गार्डनला छान लुक मिळेल.
  • ज्या रोपांना प्रकाशाची गरज असते त्यांची जागा बदला. म्हणजे त्यांना ऊन आणि सावली दोन्ही चांगलं मिळेल.
  • पाऊस पडताच किडे, गांडूळ आणि इतर पावसाळी किटक मातीतून बाहेर पडतात. जर तुम्ही बाल्कनीमध्ये रोपांची लागवड करत असाल तर या गोष्टींचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. त्यामुळे शक्यतो रोपं एकाच ठिकाणी ठेऊ नका. त्यांच्यामध्ये थोडं अंतर ठेवा, ज्यामुळे त्यांची स्वच्छताही तुम्हाला नीट करता येईल.

Instagram

ADVERTISEMENT
  • तुम्ही तुमच्या जुन्या कुंड्यानाही रेनबो, छत्री, जंगल आणि फनी रेन सीन थीममध्येही कलर करू शकता. तसंच आजकाला कुंड्यांना लावण्यासाठी अनेक प्रकारचे कागदही मिळतात. ज्याने तुम्ही जुन्या कुंड्यांचा मेकओव्हर करू शकता. तुमच्या गॅलरीच्या कलरला मॅचिंग किंवा अपोझिट रंगसंगती तुम्ही कुड्यांसाठी वापरू शकता.
  • तसंच पावसाळ्याच्या दिवसात कुंड्यामध्ये किंवा बाल्कनीत पाणी साचून राहणार नाही, याचीही खास काळजी घ्या. नाहीतर त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळू शकतं.

मग या वीकेंडला खास वेळ काढून घरातील बाल्कनी गार्डनचा करा मेकओव्हर आणि बघा तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल.

हेही वाचा – 

Vaastu Tips : घरातील दिशेनुसार करा या रोपं आणि झाडांची लागवड

घरी झाडं लावायला आवडतात, मग ही 5 झाडे आवर्जून लावा

ADVERTISEMENT

यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स

18 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT