ADVERTISEMENT
home / सौंदर्य
tips for glitter eye makeup in Marathi

ग्लिटर आय मेकअप करताना या टिप्स ठेवा लक्षात

मेकअप ही आज काळाची गरज झाली आहे. कारण एखादा समारंभ असो वा एखादी ऑफिस मीटिंग छान दिसण्यासाठी मेकअप करण्यावर भर दिला जातो. यासाठी वाचा डोळ्यांचा मेकअप टिप्स मराठी | Eye Makeup Tips In Marathi एखाद्या खास प्रसंगी जेव्हा तुम्ही मेकअप करताना तेव्हा तो नेहमीच्या मेकअप पेक्षा वेगळा आणि हटके असावा असं सर्वांना वाटत असतं. कॉलेज अथवा ऑफिसमध्ये जाताना नॅचरल मेकअप अथवा नो मेकअप ट्राय करणाऱ्या समारंभात मात्र हेव्ही आणि शिमर मेकअपवर भर देतात. आजकाल लग्नसमारंभ अथवा खास कार्यक्रमांसाठी ग्लिटर मेकअपचा ट्रेंड आहे. यासाठी पहिल्यांदाच ग्लिटर मेकअप डोळ्यांवर ट्राय करणार असाल तर या टिप्स तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

ग्लिटर आय मेकअपसाठी टिप्स

आय मेकअपसाठी ग्लिटरचा वापर सध्या ट्रेंडमध्ये आहे. पण ग्लिटर वापरल्यावर मेकअप परफेक्ट होईलच असं नाही. कारण ग्लिटर मेकअप करताना जर तुम्ही काही गोष्टी पाळल्या नाहीत तर तुमचा लुक बिघडण्याची जास्त शक्यता असते. पार्टी अथवा लग्नसमारंभासाठी ग्लिटर मेकअपचा जास्त वापर केला जातो. जेव्हा ग्लिटरचा वापर करून आय मेकअप करत असताना तेव्हा या टिप्स तुम्ही फॉलो करायलाच हव्या.

डोळ्यांवर थेट ग्लिटर लावू नका 

जर तुम्हाला ग्लिटर आय मेकअप करायचा असेल तर थेट ग्लिटर डोळ्यांवर कधीच लावू नका. ग्लिटर मेकअप करण्याआधी डोळ्यांना प्रायमर लावणं गरजेचं आहे. प्रायमर लावल्यावरच डोळ्यांवर ग्लिटर आयशॅडो अप्लाय करावी. ज्यामुळे ती व्यवस्थित ब्लेंड होईल आणि पॅची दिसणार नाही. यासोबतच सुंदर डोळ्यांसाठी निवडा भारतातील उत्तम आयशॅडो पॅलेट्स | Best Eyeshadow Palette In Marathi

ग्लिटर लावताना ग्लू आहे मस्ट

ग्लिटर मेकअप करताना तुम्हाला ग्लू विसरून चालणार नाही. कारण ग्लिटर काही काळानंतर तुमच्या डोळ्यांवरून पडून जातं. ज्यामुळे तुमचा लुक कार्यक्रमात मध्येच बिघडू शकतो. यासाठी लक्षात ठेवा ग्लिटर काही काळ टिकण्यासाठी ते लावण्याआधी ग्लूचा वापर करा. ग्लिटर मेकअप लॉंग लास्टिंग करण्याचा हा सोपा मार्ग आहे.

ADVERTISEMENT

मेकअप करताना डोळे उघडू नका 

ग्लिटर मेकअपमुळे तुमचा लुक छान दिसत असला तरी हा मेकअप करताना डोळे नेहमी बंदच ठेवा. कारण मेकअप करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही डोळे उघडले तर ग्लिटर तुमच्या डोळ्यांमध्ये जाण्याची शक्यता असते. डोळे हा अतिशय नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे मेकअप करताना डोळ्यांचे आरोग्य राखणे अतिशय गरजेचं आहे.

शाइनी कपड्यांसोबत हा मेकअप करणे टाळा

ग्लिटर मेकअप तुम्ही पार्टी अथवा संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठीच करायला हवा. मात्र जर तुम्ही फार शाइनी अथवा शिमर असलेले कपडे वापरले असतील तर त्यासोबत ग्लिटर आय मेकअप करू नका. कारण त्यामुळे तुमचा लुक विचित्र दिसू शकतो. अति शीमर लुक तुमच्या लुकला बिघडवू शकतो. यासाठी अशा वेळी एकतर कपडे कमी शिमर निवडा अथवा ग्लिटर आय मेकअप करू नका. जर तुमचे डोळे लहान असतील तर असा करा लहान डोळ्यांसाठी मेकअप | Makeup Tips For Small Eyes In Marathi

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

02 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT