ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
भाजी करण्यापूर्वी असा दूर करा कारल्याचा कडवटपणा, फॉलो करा या टिप्स

भाजी करण्यापूर्वी असा दूर करा कारल्याचा कडवटपणा, फॉलो करा या टिप्स

कारले चवीला अतिशय कडवट असते पण आरोग्यासाठी मात्र अतिशय गुणकारी असते. मात्र कडवटपणामुळे घरात कोणालाच कारल्याची भाजी खायला आवडत नाही. वास्तविक या भाजीमध्ये भरपूर अॅंटि ऑक्सिडंट, व्हिटॅमिन, बीटा कॅरेटीन, लोह, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फ्लेव्होनॉईड असे अनेक गुणकारी घटक असतात. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या सर्व घटकांशी शरीराला गरज असते. 

का खावी कारल्याची भाजी

कारल्याची भाजी खाण्यामुळे सहज आरोग्याला पोषक घटक तुमच्या शरीराला मिळू शकतात. ज्यामुळे कोणतेही औषध न घेताही तुम्ही आजारपणापासून दूर राहू  शकता. सध्या कोरोनाच्या काळात प्रतिकार शक्ती मजबूत असण्याची गरज प्रत्येकाला आहे. शिवाय ज्यांना मधुमेह अथवा सांधेदुखी आहे अशा लोकांसाठीही कारले फायदेशीर ठरते. शिवाय या भाजीमुळे तुमची पचनशक्ती सुधारते. कारल्याचा रस पिण्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होतात. पण जर तुम्हाला कारले कडू लागते म्हणून आवडत नसेल तर काही टिप्स फॉलो करून तुम्ही कारल्याचा कडूपणा कमी करू शकता. यासाठी जाणून घ्या कारल्याचा कडूपणा कसा कमी करावा. 

instagram

ADVERTISEMENT

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

कारल्याची भाजी जर योग्य पद्धतीने केली तर ती कडू न लागल्यामुळे घरातील सर्व हसत हसत कारल्याची भाजी खाऊ शकतात. यासाठी फॉलो करा या टिप्स

  • सर्वात महत्त्वाची आणि पारंपारिक टिप म्हणजे कारली चिरून घेताना त्यात मीठ घालून ती पिळून घेणे. यामुळे कारल्यातील सर्व कडूपणा कमी होतो. 
  • कारले स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यावरील काटेरी भाग चाकूने काढून टाका. यामुळे तुम्ही केलेली कारल्याची भाजी कमी कडू लागेल
  • कारल्याची भाजी केल्यावर ती परतून गॅस बंद करण्यापूर्वी त्या भाजीत थोडा गुळ टाका. गुळाचा गोडवा कारल्याचा  कडूपणा कमी करेल.
  • कारल्याचा कडूपणा हा त्याच्या  बियांमध्ये जास्त प्रमाणात असतो. यासाठी भाजी करताना अथवा कारल्याचा ज्युस करताना कारलं सोलून त्यामधील बिया काढून टाका.
  • कारल्याची भाजी करताना ती तव्यावर चांगली परतून घ्या. या पद्धतीने भाजी कोरडी होईल त्यामधील रस सुकून गेल्यामुळे आणि कारली चांगली परतली गेल्यामुळे त्याचा कडूपणा कमी होईल.
  • कारल्याची भाजी करताना  कारली स्वच्छ धुवून, चिरून दह्यात मॅरिनेट करा. ज्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. मात्र काही जण कारल्यासोबत दही खाऊ नये असा सल्ला देतात. त्यामुळे या गोष्टींचा नीट विचार करून कारलं दह्यासह खा. 
  • भाजीसाठी कारल्याच्या फोडी चिरून आणि पिळून घेण्यापूर्वी त्यात मीठासोबत थोडी साखर आणि व्हिनेगर वापरा. ज्यामुळे भाजी कडू होणार नाही. 
  • कारली गरम पाण्यात उकडल्यामुळे कारल्याचा कडूपणा काही प्रमाणात नक्कीच कमी होतो. 
  • कारले सोलून त्याला कणीक  आणि मीठ लावून ठेवावे आणि मग ते धुवून घ्यावे
  • कारले उभे चिरून तांदळाच्या पाण्यात भिजत ठेवल्यास कारल्याचा कडूपणा कमी होतो.
  • का
  • कारले मसाले टाकून परतावे आणि त्यात शेंगदाण्याचा कुट टाकावा ज्यामुळे कारल्याची भाजी कडू होत नाही. 
  • कारले कमीम कडू लागावे यासाठी कारल्याच्या भाजीत आमचूर पावडर टाका. 

फोटोसौजन्य –

इनफेक्शनचा धोका टाळण्यासाठी खा केळफुलाची भाजी

मधुमेहींनी यासाठी खायला हवी अळकुडीची भाजी

ADVERTISEMENT

भाजी करताना नका टाकू कारळ्याच्या बिया, मधुमेहींसाठी ठरतात वरदान

22 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT