ADVERTISEMENT
home / Weight Loss
Tips: 10 दिवसात घटवा तुमचे वजन, करा Diet Plan

Tips: 10 दिवसात घटवा तुमचे वजन, करा Diet Plan

वजन वाढल्यानंतर वजन कसे कमी करायचे अर्थात कसे घटवायचे याचाच एक ध्यास लागतो. वजन कमी  करण्यासाठी आहार, वजन कमी करण्यासाठी व्यायाम या दोन्ही गोष्टींवर अशावेळी लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. वजन कमी करण्यासाठी आपल्याला मानसिक आणि शारीरिक या दोन्ही तयारी कराव्या लागतात. पण तुम्हाला 10 दिवसात वजन कमी करायचं असेल तर विशेष गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. तुम्हाला खरंच वजन कमी  करण्याची इच्छा असल्यास, काही गोष्टी काटेकोरपणे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा आपल्या जेवणाच्या वेळा सांभाळता येत नाहीत. त्यामुळे वजन वाढते. काही वेळा तणावामुळे वाढते. पण हे वजन वाढल्यानंतर अथवा शरीरात चरबी जमा झाल्यानंतर ती कमी करण्यासाठी मात्र दमछाक होते. पण तुम्ही तुमच्या आहारात बदल केला, तुमच्या वेळा सांभाळल्यात तर तुम्हाला दहा दिवसात वजन कमी करण्यासाठी काही त्रास होणार नाही. हे शक्य नाही असं तुम्हाला वाटत असेल तर असे अजिबात नाही. तुम्ही तुमच्या मनात ठरवलं तर तुम्ही हे नक्की करू शकता. वजन कमी करण्यासाठी आहार जितका महत्त्वाचा आहे तितकाच वजन कमी करण्यासाठी व्यायामही महत्त्वाचा आहे. आपण बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय शोधतो पण सर्वात उत्तम उपाय म्हणजे तुम्ही स्वतः व्यवस्थित आहार घेऊन स्वतःची काळजी घेणे.  10 दिवसात कसे वजन कमी करता येते ते आपण पाहूया आणि या गोष्टी तुम्ही रोजच्या आयुष्यात नक्की करून बघा आणि वजन कमी करा. 

10 दिवसात कसे वजन करावे कमी (How can lose weight in 10 days)

Shutterstock

1. दिवसाची सुरूवात करा वर्कआऊटने 

ADVERTISEMENT

सर्वात पहिले सकाळी उठल्यानंतर आळस न करता वर्कआऊठ प्लॅन शेड्युल करा. सकाळी केलेला व्यायाम हा  उत्तम असतो. सकाळी व्यायाम केल्याने शरीरावर परिणाम लवकर होतो आणि शरीर निरोगी राहातं. तसंच सकाळी व्यायाम केल्यानंतर चांगले हार्मोन्स रिलीज होतात आणि स्वतःला तुम्ही दिवसभर एनर्जेटिक वाटत राहाते. 

2. रोज वजन करू नका 

तुम्ही रोज किती वजन आहे ते पाहू नका. कारण तसं केल्यास, तुम्हालाच त्रास होईल. तुम्ही डाएट आणि व्यायाम सुरू केल्यापासून साधारण  एक आठवडा झाल्यावर वजन करा आणि किती फरक झाला आहे ते पाहून घ्या. सतत वजन केल्यास, तुम्हाला फरक जाणवणार नाही आणि त्याशिवाय आपलं वजन कमी होत नाही असा तणावही येईल आणि पुढे काहीही करावं वाटणार नाही. त्यामुळे या गोष्टीची तुम्ही आधीच काळजी घ्या. 

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते ब्ल्यू टी (Blue Tea)

ADVERTISEMENT

3. कुठेही जाणार असल्यास, नाश्ता नेहमी सोबत ठेवा 

वजन कमी करायचं असेल तर ही एक गोष्ट हमखास करणं आवश्यक आहे. बाहेरचं जेवण आपण बंद करतो पण नाश्ता मात्र बाहेर करतो. तसं करू नये. त्याशिवाय बाहेर नाश्ता करताना कोणत्याही प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे घरातून निघताना आपला नाश्ता नेहमी सोबत घेऊनच निघा. सकाळी लवकर निघत असल्यास, नाश्ता सोबत असावा. अन्यथा घरातून पोटभर नाश्ता खाऊन निघणं योग्य. सकाळी भरपेट नाश्ता केल्यानंतर तुम्हाला जास्त भूक लागणार नाही. जरी भूक लागली तरी एखादं फळही तुम्ही सोबत ठेवायला हवं. सफरचंद, पपई, केळं यापैकी एखादे फळ असेल तर अतिउत्तम. तसंच नाश्त्यामध्ये तुम्ही सुका मेवा, सीड्स, फळ, दही, चाट, कडधान्य, डार्क चॉकलेट, पनीर इत्यादी पदार्थांचा वापर करू शकता.  पोटाला जड होईल असा नाश्ता हवा. चरबीयुक्त नाश्ता अजिबात करू नका. 

4. रोज एक सफरचंद हमखास खा

नेहमी सांगितलं जातं की, रोज एक सफरचंद खा. हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतं. तुम्हाला ज्यावेळी भूक लागेल त्यावेळी कोणत्याही अरबट चरबट पदार्थांपेक्षा तुम्ही सफरचंद खाणे हे तुमच्या वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. वजन कमी करायचं असेल तर काही गोष्टींची सवय लावून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. व्यायाम केल्यानंतर तुम्ही सफरचंद खाऊ शकता. 

ADVERTISEMENT

त्वरीत वजन कमी करण्यासाठी कॉफी आणि मधाचा होईल उपयोग

5. सहसा घरीच जेवा 

या दहा दिवसांमध्ये कुठेही बाहेर जेऊ नका. घरी तयार करण्यात आलेले जेवणच तुम्ही जेवा. तुम्हाला साखरयुक्त, तेलकट पदार्थांपासून दूर करण्यासाठी घरचे पदार्थ उपयुक्त ठरतात.  कारण घरी करण्यात आलेले जेवण हे तुमच्या आरोग्यासाठी अधिक निरोगी असते. यामुळे तुमच्या शरीरात चरबी जमा होत नाही. त्यामुळे तुम्ही दहा दिवस करत असलेल्या डाएटमध्ये केवळ घरच्या जेवणाचा समावेश करा. यामध्ये जास्तीत जास्त फळभाज्या, पालेभाज्या, भाकरी, सलाड, फळं आणि चटणी यांचा समावेश करून घ्यावा. तेलकट पदार्थांवर भर देऊ नये. पापड, लोणचं हे पदार्थ टाळावेत. तसंच पदार्थांमध्ये मीठ अति प्रमाणात घालू नये. 

6. जास्तीत जास्त पाणी प्या 

ADVERTISEMENT

दिवसातून जास्तीत जास्त पातळ पदार्थ अर्थात सूपसारख्या  पदार्थांचे सेवन करा. तसंच दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी तुमच्या पोटात जाणं आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते. त्यामुळे शरीरातील चरबीही कमी होते. तसंच पाण्याचं प्रमाण योग्य असल्याने पचनक्रिया योग्य  होते हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. 

7. हळू आणि चावून खा

तुम्ही वजन त्वरीत कमी करायचं असेल तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. कोणताही पदार्थ खाताना तुम्ही तो हळू आणि चावूनच खायला हवा. अन्यथा पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे वजन अधिक वाढतं. पचनक्रिया व्यवस्थित असेल तर वजन कमी करणं सोपं होतं. 

जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक

ADVERTISEMENT

8. प्रोटीनचे सेवन करा

वजन कमी करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये प्रोटीनची मात्रा वाढवा. तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी याची मदत होते. पनीर, अंडी, कडधान्य, डाळी, चिकन, मासे याचे अधिक प्रमाणात सेवन करा. त्याशिवाय प्रोटीन तुम्हाला पचनक्रिया व्यवस्थित करून देण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासाी तुम्ही बाहेरचे पदार्थ न खाता घरच्या घरी तयार होणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. 

9. अनहेल्दी खाण्याचा स्टॉक ठेवू नका

लठ्ठपणा वाढेल अशा अनहेल्दी खाण्याचा अर्थात वेफर्स, तेलकट पदार्थांचा कोणताही स्टॉक या दहा दिवसात घरात ठेवू नका. घरात अशा वस्तूंचा स्टॉक असला तरीही मनावर नियंत्रण ठेवून तुम्ही या पदार्थांपासून लांबच राहण्याचा  प्रयत्न करा. तरच तुम्हाला यश मिळू शकेल.

ADVERTISEMENT

10. तुम्हाला नक्की कशी शरीरयष्टी हवी आहे याचा विचार करा

तुम्हाला नक्की कशी शरीरयष्टी हवी आहे याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याचा विचार केला तरच तुम्ही योग्य डाएट आणि व्यायाम करू शकता. तुम्ही जर दहा दिवसात वजन कमी करणार हे ठरवलं तरच तुम्ही ते करू शकाल. ठरवल्यानंतर कोणत्याही गोष्टी अशक्य नक्कीच नाहीत. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

26 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT