ADVERTISEMENT
home / आरोग्य
टॉन्सिल वर घरगुती उपाय

लक्षणे आणि टॉन्सिल वर घरगुती उपाय (Tonsils Symptoms And Home Remedies In Marathi)

घशाशी निगडीत असा त्रास म्हणजे टॉन्सिल्स (Tonsils) या बद्दल तुम्ही नक्कीच या आधी देखील ऐकले असेल. पण हा आजार नेमका कशाशी संबधित आहे याची माहिती तुम्हाला आहे का? वातावरण बदलल्यानंतर खूप जणांना घशामध्ये काही बदल जाणवू लागतात. घसा सुजणे, घसा दुखणे, घशात ताण निर्माण होणे,आवंढा गिळण्यास त्रास होणे असे काही त्रास होऊ लागतात. तोंड मोठे उघडल्यानंतर तुम्हाला जीभेच्या मागे घशात एक लंबआकाराचे एक मांस लटकताना दिसते एखाद्या पेंड्युलमप्रमाणे हे असते. यालाच टॉन्सिल असे म्हणतात. वातावरणातील बदलामुळे यावर काही फरक जाणवू लागतो. टॉन्सिल्सची काही लक्षणे (tonsils symptoms in marathi) दिसू लागतात. आजारांपासून रक्षण करणाऱ्या या भागाला सूज आल्यामुळे टॉन्सिलचा त्रास होतो. टॉन्सिल वर घरगुती उपाय करुन तुम्ही आराम मिळू शकता. यासाठीच जाणून घेऊया टॉन्सिल लक्षणे आणि घरगुती उपाय.

 टॉन्सिलची लक्षणे मराठी (Tonsils Symptoms In Marathi)

tonsils symptoms in marathi
tonsils symptoms in marathi

टॉन्सिल हा घशाशी निगडीत असा आजार आहे. त्याची काही खास लक्षणे आपल्याला जाणवू लागतात. तुम्हाला अशी काही लक्षणे tonsils symptoms in marathi जाणवू लागली की तुम्ही लगेच उपाय करायला हवेत.

लाल आणि सुजलेला घसा (Red And Swollen Throat)

टॉन्सिलचा त्रास हा घशाला होतो. आवंढा गिळतानाही हा त्रास होऊ लागतो. जर तुमचा घसा प्रमाणाहून अधिक दुखत असेल आणि घसा सुजलेला वाटत असेल तर तुम्हाला टॉन्सिल झाल्याची शक्यता असू शकते. सर्दी किंवा तापात सर्दी आत ओढून असा त्रास होऊ लागतो.

ताप (Fever)

खूप वेळा सर्दी पातळ झाल्यानंतर ती सर्दी आत ओढण्याची अनेकांना सवय झालेली असते. सतत सर्दी आत ओढत राहिली की अंग गरम होऊ लागते. अंग कणकण जाणवू लागते. जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय ताप येऊ लागला असेल तर तुम्हाला सर्दी झाली आहे की नाही ते देखील एकदा तपासावे. ताप कमी करण्यासाठी उपाय करावे

ADVERTISEMENT

श्वासाची दुर्गंधी (Bad Breath)

घशाला इन्फेक्शन झाल्यामुळे शक्यतो आपण तोंड उघडायला बघत नाही. कारण अशावेळी घसा प्रचंड दुखू लागतो. घसा स्वच्छ कराया खूप जणांनाह होत नाही. त्यामुळे श्वासाची दुर्गंधी वाढते. त्यामुळे तोंड उघडले तरी सुकलेले तोंड असेल तर त्याचा फारच वाईट वास येऊ लागते. त्यामुळे असे होत असेल तर तुम्हाला टॉन्सिल आहे की नाही ते पाहावे.

घसा ताणला जाणे (Enlarged Glands)

टॉन्सिलचा त्रास हा जास्त झाला असेल तर तुमच्या चेहऱ्याचा आकार देखील बदलतो. कारण ही सूज चक्क गालापर्यंत येते. तोंड उघडल्यानंतर जो भाग लांब आकारात दिसून येतो. एखाद्या पेड्युचलच्या आकाराप्रमाणे तो असतो. त्याला सूज आली असेल तर तो भाग जास्त दिसतो आणि त्यामुळे घसा ताणला जातो. काहीही बोलण्याची देखील त्यामुळे इच्छा होत नाही.

आवंढा गिळण्यास त्रास होणे (Sore Throat)

घशाला होणारा आणखी एक त्रास म्हणजे घशाची हालचाल करण्यास खूप जणांना त्रास होऊ लागतो. आवंढा गिळण्यास त्रास होऊ लागला की तुम्हाला टॉन्सिलचा त्रास सुरु झाला असे तुम्ही समजावे.

टॉन्सिल वर घरगुती उपाय (Tonsils Home Remedies In Marathi)

Tonsils Home Remedies In Marathi

टॉन्सिल्सचा त्रास तुम्हाला होऊ लागला असेल तर तुम्ही काही सोपे असे टॉन्सिल वर घरगुती उपाय हवेत. अशा उपायांनी तुम्हाला नक्कीच आराम मिळण्यास मदत मिळू शकते. जाणून घ्या  हे सोपे घरगुती उपाय.

ADVERTISEMENT

गरम पाणी (Hot Water)

पाणी थोडेसे गरम करुन ते हळुहळू पित राहा. त्यामुळे घशाला आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते. त्याहीपेक्षा अधिक तुमच्या घशाला गरम पाण्यामुळे शेक मिळण्यास मदत मिळते. टॉन्सिलचा त्रास जाणवू लागल्यानंतर तुम्ही लगेचच गरम पाण्याचे सेवन करायला घ्या. अगदी ग्लासभऱ पाणी पिण्याची गरज नाही. तुम्ही अगदी घोट घोट गरम जमेल तेवढे पाणी प्यायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळेल. टॉन्सिल वर घरगुती उपाय करताना हे नक्की करा.

गुळण्या (Gargling)

गुळण्या करणे हा घशाच्या कोणत्याही त्रासासाठी उत्तम असा पर्याय आहे. त्यासाठी तुम्हाला एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यामध्ये साधारण एक चमचाभर मीठ घालायचे आहे. मीठ घातलेले पाणी तुम्ही घेऊन त्याच्या गुळण्या करा. मीठामध्ये बॅक्टेरीया मारण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे गुळण्या करा.त्यामुळेही तुम्हाला आराम करण्यास मदत मिळेल.

चहा आणि मध (Tea With Honey)

रोजचा चहा करुन त्यामध्ये तुम्ही साधारण एक चमचाभर मध घाला. असा गरम चहा तुम्ही काही तासाने प्या. चहा जितका गरम असेल तितका गरम चहा तुम्ही प्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. मधामध्ये असलेले अँटीबॅक्टेरिअल घटक घशाची सूज घालण्याचे काम करतात. त्यामुळे अगदी हमखास तुम्ही चहामध्ये मध घालून प्या. तुम्हाला आराम मिळेल. 

वाफ (Steam)

पाणी गरम करुन तुम्ही जसे चेहऱ्याला वाफ घेता अगदी त्याचप्रमाणे तु्म्हाला घशासाठीही वाफ घ्यायची आहे. पाणी गरम करुन त्यामध्ये तुम्ही मीठ घातले तरी चालेल. एखादा जाड टॉवेल घेऊन तुम्हाला चेहरा झाकून तोंड उघडून घशात वाफ घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीत आराम मिळण्यात मदत होईल.

ADVERTISEMENT

हळदीचे दूध (Turmeric Milk)

अनेक आजारांवर हळद ही गुणकारी असते. टॉन्सिल्सच्या बाबतीततही अगदी तसेच आहे घशाला आलेली सूज घालवायची असेल तर तु्म्ही गरम गरम मस्त अशा हळदीच्या दुधाचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच बरे वाटण्यास मदत मिळले. अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल अशी ही हळद दूधातून घेतल्यामुळे त्याचा भरपूर फायदा मिळदो. घशाची सूज कमी होण्यास मदत मिळते.

आल्याचा चहा (Ginger Tea)

आले हे देखील घशावर चांगलेच गुणकारी आहे. शक्य असेल तर तुमच्या चहामध्ये तुम्ही किसलेले आलं घाला. सर्दी, खोकला, ताप यामुळे तुम्हाला टॉन्सिलची सूज आलेली असेल तर ती सूज बरी होण्यास मदत मिळते. आलं हे गरम असतं. त्यामुळे घशाला आल्यामुळे चांगलाच शेक मिळतो. त्यामुळे तुम्ही अगदी आवर्जून आल्याचा चहा प्या. तुम्हाला बरे वाटेल.

हळद (Turmeric)

आले हे देखील घशावर चांगलेच गुणकारी आहे. शक्य असेल तर तुमच्या चहामध्ये तुम्ही किसलेले आलं घाला. सर्दी, खोकला, ताप यामुळे तुम्हाला टॉन्सिलची सूज आलेली असेल तर ती सूज बरी होण्यास मदत मिळते. आलं हे गरम असतं. त्यामुळे घशाला आल्यामुळे चांगलाच शेक मिळतो. त्यामुळे तुम्ही अगदी आवर्जून आल्याचा चहा प्या. तुम्हाला बरे वाटेल.

मध- हळद चाटण (Honey-Turmeric)

मध-हळद एकत्र करुन केलेले चाटणसुद्धा खूप जण चांगला उपाय म्हणून सांगतात. दोन्ही चांगले घटक असलेला उपाय करताना तुम्ही एका वाटीत थोडे मध- हळद घेऊन त्याचे चाटण करावे हे चाटण थोडेसे चाटा त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे मध-हळदीचे चाटण करुन चाटा बरे वाटेल.

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. टॉन्सिल गंभीर आजार असतो का?

कोणत्याही व्हायरल तापात किंवा सर्दीमध्ये टॉन्सिलचा त्रास होतो.हा आजार अगदी सहज बरा होऊ शकतो. हा आजार बरा होण्यासाठी अगदी काहीच कालावधी लागतो. पण त्या एवढ्या वेळामध्ये त्याचे दुखणे थांबण्यासाठी अनेक उपाय करावे लागतात. शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाली की, तुम्हाला सतत इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यावेळी टॉन्सिल गंभीर रुप घेऊ शकतो. पण त्यामुळे तुमचा जीव जाऊ शकत नाही.

2. टॉन्सिल काढण्याची गरज असते का?

टॉन्सिल काढण्याबद्दल तुम्ही खूप जणांकडून आतापर्यंत ऐकले असेल. ज्यावेळी टॉन्सिलचा त्रास सतत होऊ लागतो अशावेळी टॉन्सिल काढण्यास सांगितले जाते. पण त्या आधी ते काढण्याचा सल्ला तुम्हाला दिला जात असेल तर तुम्ही तो करु नका. कारण घशात असलेले टॉन्सिल बॅक्टेरिया आणि व्हायरसना रोखण्याचे काम करत असतात. त्यामुळे तुम्ही ते काढून टाकल्यानंतर इतर त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

3. टॉन्सिल किती काळापर्यंत त्रास देतात?

टॉन्सिल्सचा त्रास सुरु झाल्यानंतर त्यावर वेळीच उपचार घेतले तर ते केवळ दोन दिवसात बरे होण्यास मदत करतात. पण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर ते बरे होण्यासाठी साधारण 10 ते 14 दिवसही लागू शकतात. कारण घशाची सूज उतरण्यासाठी बराच वेळ जातो.

23 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT