home / लाईफस्टाईल
‘सूर सपाटा’चा दिमाखात रंगला ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा

‘सूर सपाटा’चा दिमाखात रंगला ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा

ग्रामीण भागातील कबड्डीवर आधारित ‘सूर सपाटा’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण  सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटातून एक ना दोन तब्ब्ल २५ हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.  ‘सूर सपाटा’ हा चित्रपट 21 मार्चला होळीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देईल यात शंका नाही.

मंगेश कंठाळे दिग्दर्शित ‘सूर सपाटा’ची खास झलक आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळादरम्यान पाहता आली. अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शकुंतला खटावकर,माया अकरे मेहेर आणि शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित शैला रायकर, ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि ‘सूर सपाटा’ची संपूर्ण टीम यांच्या हस्ते उत्कंठावर्धक ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा पार पडला.

Sur Sapata 03

बऱ्याच दिवसापासून चर्चा होती, ती या चित्रपटातील कलाकारांची. मात्र आता या चित्रपटातील कलाकारांची नावं समोर आली आहेत. हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, आनंद इंगळे, संजय झाडबुके, अभिज्ञा भावे, नेहा शितोळे यांचा कलाकारांच्या यादीत समावेश आहे. ‘सूर सपाटा’च्या ट्रेलर लॉचच्या दिमाखदार सोहळ्याप्रसंगी ही सर्व  मंडळी आवर्जून उपस्थित राहिली हे विशेष. तसंच हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

उनाड पण कुशल विद्यार्थ्यांभोवती गुंफलेली ‘सूर सपाटा’ची कथा प्रेक्षकांची उत्कंठा टप्प्या-टप्प्याने वाढवते. जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक एकीकडे तर आपणही एखादं मैदान मारू शकतो याची जाणीव झालेले विद्यार्थी दुसरीकडे. या दोघांमधला सुवर्णमध्य साधणारा ‘सूर सपाटा’ प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची एक संधी मिळाली तर तो त्याचं कसं सोनं करू शकतो, हे दाखवतो. लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि या निर्मितीसंस्थेने आपल्या पहिल्या-वहिल्या ‘पेइंग घोस्ट’ या चित्रपटाद्वारा मनोरंजनक्षेत्रात यशस्वी षटकार मारला होता आणि आता त्यांच्या आगामी सूर सपाटा’ या दुसऱ्या चित्रपटाने सध्या चित्रपटसृष्टीत उत्सुकता वाढली आहे. ‘सूर सपाटा’मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के, शरयू सोनावणे, निनाद तांबडे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

या चित्रपटाची कथा मंगेश कंठाळे यांची असून पटकथा मंगेश कंठाळे आणि अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केलं आहे. ‘सूर सपाटा’मध्ये वेगवेगळ्या जॉनरची धमाकेदार गाणी आहेत. त्यातील आदर्श शिंदे आणि प्रियांका बर्वेच्या आवाजातील ‘रंग भारी रे रंगणार’ हे जोशपूर्ण गाणं अलिकडेच सोशल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलं. ज्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीसुद्धा मिळाली आहे. याशिवाय अभिजीत सावंत यांनी गायलेलं ‘खेळ दैवाचे’ आणि जसराज जोशी व अभिनय जगतापच्या आवाजातील ‘सूर सपाटा’चे टायटल ट्रॅक अतिशय उत्तम झालं आहे. या गाण्यांना अभिनय जगताप यांनी संगीतबद्ध केलं आहे तर गीतं मंगेश कांगणे आणि  स्वप्निल चाफेकर यांनी लिहीली आहेत. या चित्रपटाचा कॅनव्हास सिनेमॅटोग्राफर विजय मिश्रा यांच्या लेन्समधून चित्रित करण्यात आला असून अभिनय जगतापचे श्रवणीय संगीत चित्रपटाला लाभले आहे.

04 Mar 2019

Read More

read more articles like this
good points logo

good points text