ADVERTISEMENT
home / xSEO
trust quotes in marathi

Trust Quotes And Status In Marathi | विश्वासावरील मराठी सुविचार | Vishwas Marathi Status

विश्वास हा केवळ शब्दच नाही तर कोणत्याही नात्यातील महत्त्वाचा भाग आहे. विश्वास असेल तर कोणतेही नाते टिकते. विश्वास नसेल तर जगात काहीच होत नाही. विश्वास असेल तर गोष्टी सहज घडतात. पण एखाद्यावर विश्वासच नसेल तर मग काहीच घडू शकत नाही. प्रत्येक नात्याचा जीव असतो तो म्हणजे विश्वास. कोणतंही नातं मजबूत करण्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे. नात्यातून विश्वास गेला तर नात्याला तडा जातो आणि ही कसर कधीच भरून काढता येत नाही. आपल्या कोणत्याही नात्यामध्ये कधीच ही वेळ येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. हा विश्वास जपण्यासाठी विश्वास सुविचार मराठी (Trust Quotes In Marathi) आपण या लेखातून खास तुमच्यासाठी आणले आहेत. विश्वास मराठी स्टेटस (Vishwas Marathi Status) तुम्ही तुमच्या खास व्यक्तींसाठी पाठवू शकता अथवा हल्ली व्हॉट्सअप स्टेटसला अनेक कोट्स ठेवले जातात तिथेही तुम्ही विश्वास सुविचार मराठी (Trust Status In Marathi) अथवा विश्वास स्टेटस (Vishwas Status In Marathi) ठेऊ शकता. पाहूया काही खास विश्वासावरील मराठी सुविचार (Trust Quotes In Marathi)

Trust Quotes In Marathi | विश्वास सुविचार मराठी

Trust Quotes In Marathi
Trust Quotes In Marathi

आपल्या नात्यात विश्वास कायम टिकवून ठेवा. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया आहे. विश्वासावरील असेच काही कोट्स (Marathi Quotes On Trust) खास तुमच्यासाठी. 

1. विश्वास निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागतो. मात्र गमवायला सेकंदही लागत नाही

2. विश्वास असेल तर माणूस आत्मविश्वासाने जगू शकतो. मात्र कोणाचाही आपल्यावर विश्वास नाही हे कळल्यानंतर जगणंच कठीण होतं 

ADVERTISEMENT

3. एखाद्याचा विश्वास तुटल्यानंतर सॉरी म्हणण्याला काहीच अर्थ नाही राहात

4. विश्वासच नसेल तर कोणतंही नातं टिकत नाही 

5. विश्वासावरच आहे दुनिया कायम 

6. प्रेम आणि विश्वास हे आयुष्यातील असे दोन पक्षी आहेत ज्यापैकी एक जरी उडून गेला तरी दुसऱ्याचा काहीच फायदा होत नाही. दोघांचा जीव एकमेकात अडकलेला आहे 

ADVERTISEMENT

7. आपण कोणासाठी चांगलं करतो तेव्हा आपलं चांगलंच होतं यावर नेहमी विश्वास ठेवा 

8. विश्वास असेल तर जग जिंकणं कठीण नाही 

9. विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात आणि तुटण्यासाठी एक सेकंद आणि निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य

10. विश्वास हा एखाद्या स्टिकरप्रमाणे असतो. दुसऱ्यांदा तो पहिल्यासारखा चिकटत नाही 

ADVERTISEMENT

Vishwas Marathi Status | विश्वास स्टेटस मराठी

Vishwas Marathi Status
Vishwas Marathi Status

विश्वास हा शब्द आहे जो निभावण्यासाठी संपूर्ण आयुष्यही कमी पडतं पण विश्वास असेल तर आयुष्यभरल प्रेम मिळतं आणि नातंही टिकतं. प्रत्येक नात्यामध्ये विश्वास महत्त्वाचा असतो. जर नात्यामध्ये काही चुका होत असती आणि माफ करत असू तर तो त्या नात्यावरील विश्वासच असतो. अशाच विश्वासावरील काही कोट्स (Trust Status In Marathi). 

1. विश्वास कमवायचा असेल तर तुम्ही प्रामाणिक राहायला शिका. प्रामाणिक असाल तर विश्वास नेहमीच राहतो

2. कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा अथवा नाही ठेवायचा हे सर्वस्वी तुमच्यावर असते. मात्र मग विश्वासाला तडा गेला तर दुसऱ्या व्यक्तींना तुम्ही दोष देऊ शकत नाही

3. कोणत्याही माणसावर विश्वास ठेवण्याआधी दहा वेळा तुम्ही विचार करा. कारण विश्वासघात हा कधीही कोणाहीकडून होऊ शकतो 

ADVERTISEMENT

4. विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा विश्वास तोडणारा अधिक मूर्ख असतो

5. जगात सर्वात पटकन एखाद्यावर विश्वास ठेवला जातो तर सर्वात जास्त लवकर मरत असेल तर विश्वास

6. कधीही स्वतःवरील विश्वास गमावू नका कारण तसं झालं तर सर्वात जास्त त्रास हा तुम्हालाच होतो 

7. जो तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो त्याचा विश्वासघात कधीच करू नका 

ADVERTISEMENT

8. विश्वास हा रबरासारखा असतो, तुमच्या प्रत्येक चुकीबरोबर हा कमी होत जातो. त्यामुळे कोणीही विश्वास ठेवत असेल तर तो नेहमी राखून ठेवा 

9. विश्वासात जेव्हा चुकीचे विष मिसळते तेव्हा नातं टिकणं कठीण होते 

10. एखाद्यावर विश्वास ठेवणं हे खूपच मोठं जिकिरीचे काम आहे. पण तरीही आजही विश्वासावर दुनिया कायम आहे

Trust Quotes In English 

ADVERTISEMENT

Trust Status In Marathi | विश्वासाबाबतचे सुंदर स्टेटस

Trust Status In Marathi
Trust Status In Marathi

विश्वासाबाबातचे सुंदर स्टेटस (Marathi Quotes On Trust) तुम्हाला जर तुमच्या व्हॉट्स अपवर ठेवायचे असतील तर खास कोट्स (Vishwas Status In Marathi) तुमच्यासाठी. 

1. शरीराला श्वासाची आणि नात्यांना विश्वासाची गरज असते, कारण श्वास संपल्यावर जीवन संपतं आणि विश्वास उडाल्यावर नातं संपतं 

2. विश्वासघात झाल्यावर विश्वास ठेवणं खूपच कठीण होतं. इतकंच नाही तर लोकांचा बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो 

3. स्वतःवर असणारा विश्वास जेव्हा अधिकाधिका घट्ट होत जातो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यात परावर्तित होत असतो

ADVERTISEMENT

4. दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा 

5. प्रत्येकावर विश्वास ठेऊ नका. कारण प्रत्येक माणूस तुमच्या विश्वासाच्या पात्र असतोच असं नाहीत. विश्वासघात झाल्यावर मात्र त्याचा त्रास होतो 

6. एखाद्याने मनापासून विश्वास ठेवल्यावर त्याचा विश्वासघात अजिबात करू नका. कारण कदाचित त्यामुळे एखाद्याचे आयुष्य आणि मन उद्धस्त होऊ शकते 

7. अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी तुमच्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखते, हसण्यामागील दुःख, रागावण्यामागील प्रेम, आणि शांत राहण्यामागील कारण 

ADVERTISEMENT

8. एखाद्याने जर तुमचा विश्वास घात केला तर त्याला धन्यवाद द्या कारण अशी व्यक्ती तुम्हाला या जगाची रीत समजावून गेलेला असतो

9. हरवलेला हिरा पुन्हा मिळेल, पण गमावलेला विश्वास पुन्हा कधीच मिळणार नाही

10. तुम्ही कोणावर कितीही विश्वास ठेवा पण ज्याच्या रक्तात बेईमानी आहे तो एकदिवस विश्वासघात करणारच हे कायम लक्षात ठेवा

True Thoughts In Marathi | विश्वासावरील सुंदर विचार

Vishwas Marathi Status
Vishwas Marathi Status

सुंदर विचार आणि आचार यातूनच तुमचा स्वभाव कळतो. त्यानुसार तुमच्या आजूबाजूला किती माणसं असतील आणि तुमच्याबरोबर कायम साथ देणारे किती असतील हे ठरतं. असेच विश्वासावरील सुंदर विचार (True Thoughts In Marathi) खास तुमच्यासाठी. कधीतरी असे सुंदर विचार तुम्ही सकाळीच आपल्या आप्तस्वकियांसह शेअर करू शकता. 

ADVERTISEMENT

1. आवड आणि विश्वास असेल तर जग जिंकणं सोपं होतं 

2. एखाद्यावर पटकन विश्वास ठेऊ नका, कारण पाण्यात मिसळलेला विषाची चव पोटात गेल्यावरच कळते

3. विश्वास ठेवा, सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात. काही प्रश्न सोडून दिले की, आपोआप सुटतात 

4. न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबही हरतं या गोष्टीवर विश्वास ठेवला तर नक्कीच जग जिंकता येतं

ADVERTISEMENT

5. जीवनात चांगल्या माणसांना शोधण्याची गरज भासत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. चांगली माणसं आपोआप आयुष्यात येतात 

6. स्वप्न पाहात असाल तर ते पूर्ण करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा 

7. कोणतंही स्वप्न विश्वास असल्याशिवाय पूर्ण करता येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा 

8. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर तुम्ही स्वतःच्या मनगटावर आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका तरच उंच भरारी मारता येईल

ADVERTISEMENT

9. ध्येय दूर आहे म्हणून हरून रस्ता सोडू नका. विश्वास ठेवा की, लवकरच तुम्हाला मार्ग मिळेल

10. तुमचा आजचा संघर्ष हा तुमचे उद्याचे भविष्य निर्माण करत असतो. त्यामुळे विश्वासाने या संघर्षाला सामोरे जा सर्व काही नीटच होईल

Trust Message In Marathi | विश्वासाबाबतचे मेसेजेस

Trust Quotes In Marathi
Trust Quotes In Marathi

काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की एकमेकांवरील विश्वास डळमळीत होतो. अशावेळी एकमेकांना समजून घेण्यासाठी बोलण्याचीही गरज असते. विश्वासाबाबतचे मेसेज अर्थात संदेश (Trust Message In Marathi) आपण अशावेळी पाठवू शकतो. 

1. फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्या पक्षाचा फांदीवर विश्वास नसून स्वतःच्या पंखावर विश्वास असतो

ADVERTISEMENT

2. प्रेम तर तुझ्यावर मनापासून आहे गं. एकदा विश्वास तर ठेवून बघ. तुझ्यासाठी वाटेल ते नाही केले तर या जगात पण दिसणार नाही बघ, माझे वचन आहे तुला 

3. तुझा माझ्यावरील विश्वास, माझ्या जगण्याचा श्वास आहे. भरभरून मिळून सारं काही, केवळ तुझ्या एका हाकेची आस आहे

4. मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो. ”मैत्री” असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो

5. माणूस जगतो आशेच्या किरणावर आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर

ADVERTISEMENT

6. मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहू दे , खऱ्या मैत्रीवर नेहमी विश्वास राहू दे

7. आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका

8. इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता यावर नेहमी विश्वास ठेवा 

9. आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा.  प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा आणि आठवणी या चिरंतन आहेत यावर नेहमी विश्वास ठेवा 

ADVERTISEMENT

10. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही पण विश्वास असेल तर मात्र आयुष्याची गाडी पुढे ढकलता येते 

Vishwas Shayari Marathi | विश्वास शायरी मराठी

Vishwas Shayari Marathi
Vishwas Shayari Marathi

कोणतीही गोष्ट ही शायरी स्वरूपात एखाद्या माणसाला पटकन भावते. मग ती स्तुती असो अथवा एखाद्या गोष्टीचे विचार. विश्वासाबाबतही अशाच काही शायरी खास तुमच्यासाठी. विश्वास शायरी मराठी (Vishwas Shayari Marathi) 

1. जीवनात खर बोलून मन दुखावले तरी चालेल. मात्र खोटे बोलून कोणालाही कोणताच आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्याचे आयुष्य असते ते फक्त तुमच्या विश्वासावर

2. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यावा. पण कोणाच्या विश्वासाचा फायदा कधीच घेऊ नये कारण एकदा विश्वासाला तडा गेला की नात्यात कायमचा दुरावा निर्माण होतो

ADVERTISEMENT

3. खरे बोलून नाते तोडा पण खोटे बोलून विश्वास तोडू नका

4. किंमत प्रेमाची नाही तर विश्वासाची अधिक असते, त्यामुळे प्रेमात कधीही विश्वासाला तडा जाऊ देऊ नका 

5. हा चमत्कार केवळ विश्वासामुळेच शक्य आहे, दगडालाही देव मानण्याची विश्वासात क्षमता आहे

6. प्रामाणिक व्यक्तीची साथ कधीच सोडू नका, अशा व्यक्तींचा विश्वास तोडू नका 

ADVERTISEMENT

7. लोकांजवळ सर्व काही आहे. मात्र अडचण तिथेच आहे की विश्वासावर शंका आहे आणि शंकेवर विश्वास आहे 

8. काही मिळेल ना मिळेल तुम्ही तुमचं कर्म करत राहा. सर्व काही चांगलं होईल यावर विश्वास ठेवा 

9. ज्यांचा देवावर विश्वास असतो, त्यांना कधीच काही कमी पडत नाही 

10. मैत्रीमध्ये जेव्हा आदर आणि विश्वास असतो तेव्हा बाकी कशाचीच आवश्यकता भासत नाही 

ADVERTISEMENT

Trust Quotes For Relationships In Marathi | नातं आणि विश्वास कोट्स

Vishwas Status In Marathi
Vishwas Status In Marathi

नातं आणि विश्वास या दोन्ही गोष्टी एकमेकांशी अत्यंत निगडीत असतात. नात्यामध्ये विश्वास असेल तरच सर्वकाही निभावता येतं. नातं आणि विश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असंच नातं आणि विश्वास कोट्स (Trust Quotes for Relationships In Marathi) तुमच्यासाठी.

1.  मनासारखा जोडीदार मिळाला तर जेवण जगायला पण वेगळीच मजा येते. कारण या नात्यात असतो खरा विश्वास

2. शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईन तुला विश्वास ठेव माझ्यावर 

3. प्रेमाचं तर माहीत नाही पण माझ्यासोबत तू आहेस तोपर्यंत विश्वास या शब्दावर माझा विश्वास आहे 

ADVERTISEMENT

4. जीवनात आनंद आहे कारण सोबत तू आहेस आणि म्हणूनच माझा आयुष्यावर विश्वास आहे 

5. प्रेम तर सगळेच करतात पण मला जगायचं आहे तुझं होऊन कारण तू आहेस तर माझा प्रेमावर विश्वास आहे 

6. तुझ्यावर मनापासून प्रेम आहे यावर विश्वास ठेवलास तर आयुष्य अधिक सुखकर होईल

7. आपल्यामध्ये विश्वास आहे म्हणूनच कायमची साथ आहे 

ADVERTISEMENT

8. माझं तुझ्यावरचं प्रेम हाच माझा जगण्यावरचा विश्वास आहे

9. तू म्हणजेच विश्वास…एकमेव समीकरण आहे माझ्यासाठी

10. तुझ्याशिवाय जगायचं असेल तर माझा कोणत्याच गोष्टीवर विश्वास राहणार नाही. तू आहेस म्हणून मी आहे. 

Trust Sms In Marathi | ट्रस्ट SMS मराठी

Marathi Quotes On Trust
Marathi Quotes On Trust

मराठीमध्ये विश्वासाचे काही संदेश पाठवायचे असतील तर खास संदेश (Trust Sms In Marathi)

ADVERTISEMENT

1. विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला की पुन्हा हा पक्षी त्याच फांदीवर बसेलच याची काही शाश्वती नाही

2. दुसऱ्यांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाची रक्षा आपण आपल्या प्राणांपेक्षा अधिक केली पाहिजे – चाणक्य

3. “विश्वास” आणि “प्रेम” जबरदस्तीने जन्माला घालता येत नाहीत

4. स्वत:वर अविश्वास दाखवणं म्हणजे साक्षात परमेश्वरावर विश्वास नसल्यासारखे आहे

ADVERTISEMENT

5. इतरांच्या भावनांशी खेळण्याची लोकांची सवयच झाली आहे, म्हणून एखाद्यावर सहजासहजी विश्वास ठेवणं योग्य नाही

6. प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टींशी तुम्ही जर प्रामाणिक नाही राहिलात तर त्या पुन्हा मिळवणे कधीच शक्य नाही

7. जिथे विश्वास असतो, तिथे प्रेम, आदर, आपुलकी, नाते आणि समाधान हे सर्वकाही असते 

8. मनात प्रेम, डोक्यात ज्ञान आणि स्वत:च्या मनगटावर विश्वास असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही

ADVERTISEMENT

9.  या जगात कोणती वस्तू असेल जी काचेच्या भांड्यासारखी सर्वात जास्त वेळा तुटली जाते तर ती म्हणजे विश्वास

10. खरं सांगायचे तर नाते तेच टिकते ज्यात गैरसमज कमी आणि विश्वास अधिक असतो

तुम्हालाही तुमच्या प्रिय व्यक्तींना काही कोट्स पाठवायचे असतील तर नक्की आमचा लेख वाचा आणि तुम्हाला आमचा लेख कसा वाटला आम्हाला कळवा. 

22 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT