कानाचे दुखणे असह्य आणि वेदनादायी असते. कान दुखण्यामागची कारणे निरनिराळी असू शकतात. कधी इनफेक्शन तर कधी कानात मळ साचल्यामुळे कान दुखू लागतो. वातावरणात बदल झाल्यामुळे कान दुखतात, कानात पाणी गेल्यास अथवा थंड हवा शिरल्यास कान प्रचंड दुखतात. थोडक्यात एखाद्या गंभीर आरोग्य समस्येमुळेही कान दुखू शकतात आणि वातावरणात बदल झाल्यामुळेही कान दुखू शकतात. एकदा कान का दुखत आहेत हे समजले की त्यावर उपचार करणे सोपे जाते. आजकाल कानात टाकण्यासाठी विविध प्रकारचे इअर ड्रॉप्सही मिळतात. पण जर वातावरणातील बदलामुळे तुमचे कान दुखत असतील तर तुम्ही घरगुती उपाय करून या समस्येवर उपचार करू शकता. यासाठीच जाणून घ्या कान दुखणे कारणे (Reason Of Ear Pain In Marathi) आणि कान दुखणे घरगुती उपाय (Kan Dukhi Var Upay) यासोबतच जाणून घ्या त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखी घरगुती उपाय (Dokedukhi Var Gharguti Upay)
कान दुखणे कारणे | Reason Of Ear Pain In Marathi
कान दुखत असेल तर दैनंदिन कामं करणंही कठीण होतं. मात्र कान दुखण्यावर कोणताही उपाय करण्यापूर्वी कान दुखण्यामागचं कारण तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवं. कान दुखण्याची अनेक कारणे असू शकतात.
- कानाच्या आत गंभीर इनफेक्शन झाल्यास कान दुखणे स्वाभाविक आहे.
- तापामुळेही बऱ्याचदा कान दुखतात
- थंडीत कानातील मळ सुकल्यामुळे कान दुखतो
- कान स्वच्छ करताना, इतर कारणामुळे पडद्याला दुखापत झाली तर कान दुखू शकतो
- कानामध्ये अती प्रमाणात मळ साचण्यामुळे कान दुखणे वाढू शकते.
- सायनस इनफेक्शनचा त्रास होत असेल तर कान दुखण्याची शक्यता असते.
- टॉन्सिल्स ग्रंथी वाढून सूज आली तर त्यामुळे कान दुखू शकतो.
- अनेकांना दात चावण्याची सवय असते त्यामुळेही कान दुखण्याची शक्यता असते.
कानाचे आजार व घरगुती उपचार जाणून घ्या (Ear Pain Home Remedy In Marathi)
कान दुखणे घरगुती उपाय | Kan Dukhi Var Upay
कान दुखी जर वातावरणातील बदलामुळे झालेली असेल अथवा कानात मळ साचल्यामुळे असेल तर हे काही घरगुती उपाय तुम्ही घरातच करू शकता. यासाठी जाणून घ्या कान दुखणे घरगुती उपाय (Kan Dukhi Var Upay)
थंड अथवा गरम शेक
वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे बऱ्याचदा तुमचे कान ठणकू लागतात. अशा वेळी कानाजवळ गरम पाण्याची पिशवी अथवा आईस पॅकने शेक देणं फायद्याचं ठरू शकता. जर तुमच्या घरी गरम पाण्याची पिशवी नसेल तर तुम्ही गरम पाण्यात टॉवेल बुडवून त्याने शेक घेऊ शकता. कापडामध्ये बर्फ गुंडाळून कानाला थंडावा देऊ शकता. गरम अथवा थंड शेक दिल्यामुळे कानाला आराम मिळतो आणि कान दुखणे कमी होते. घरच्या घरी करण्यासारखा हा एक सोपा उपाय आहे. कानाला थंड अथवा गरम शेक देताना एक गोष्ट लक्षात ठेवा सहन होईल इतपत शेक द्या. साधापणपणे दहा ते पंधरा मिनीटे शेक देणे योग्य ठरेल.
कसा कराल उपाय –
- गरम पाण्याच्या पिशवीत गरम पाणी भरा आणि त्याने कान शेकवा. तुमच्याकडे गरम पाण्याची पिशवी नसेल तर गरम पाण्यात टॉवेल बूडवा आणि त्याने कानाजवळचा भाग शेकवा.
- आईस पॅक फ्रीजरमध्ये ठेवा आणि त्याने तुमच्या कानाजवळील भाग शेकवा. आईस पॅक नसेल तर रुमालात बर्फ गुंडाळून त्याने कान शेकवा.
घसा खवखवणे घरगुती उपाय आणि काळजी (Ghasa Khavkhavne Upay In Marathi)
मानेचा व्यायाम
कान दुखीमागचे कारण इनफेक्शन असेल तर मानेचा व्यायाम केल्यामुळे कानाच्या पोकळीत ताण येतो आणि तुम्हाला चांगला आराम मिळतो.
कसा कराल उपाय –
- बसा अथवा सरळ उभे राहा
- तुमची मान उजव्या बाजूने गोलाकार फिरवा असं करताना पाठ आणि खांदा ताठ असू द्या.
- दहा सेंकदाने मान डाव्या बाजूने गोलाकार फिरवा
- दोन्ही बाजून पाच ते दहा वेळा असं करा.
- दिवसातून चार ते पाच वेळा हा व्यायाम करा
- मात्र मान गोलाकार फिरवताना ती हळूवारपणे फिरवा जोरात फिरवू नका.
लसूण तेल
कानाचे दुखणे बरे करण्यासाठी लसूण अतिशय प्रभावी घरगुती औषध आहे. कारण लसणामध्ये अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतातच शिवाय ते अॅंटि व्हायरल आणि अॅंटि फंगलही असतो. सहाजिकच लसणाचा वापर केल्यास कानात झालेले इनफेक्शन लगेच बरे होते.
कसा कराल वापर –
- तेलात चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून तेल गरम करा
- थंड झाल्यावर तेल्याचे थेंब कानात घाला.
आलं
कान दुखीपासून सुटका मिळण्यासाठी कानात आल्याचा रस टाकला जातो. कारण आलं हे अॅंटि इनफ्लैमटरी आहे. ज्यामुळे कानातील दाह कमी होतो आणि कान दुखणे यामुळे लगेच बरे होते. मात्र आल्याचा रस थेट कानात कधीच टाकू नका.
कसा कराल उपाय –
- नारळाच्या तेलात थोडा आल्याचा रस मिसळा
- तोल थोडं कोमट करून थंड करा
- थंड झाल्यावर त्याचे तेलाचे काही थेंब कानात टाका
झोपण्याची पोझिशन बदला
कान दुखत असेल तर आराम मिळण्यासाठी तुम्ही तुमची झोपण्याची स्थिती अथवा पोझिशन बदलू शकता. ज्यामुळे कान दुखणे अधिक वाढणार नाही. रात्री अचानक कान दुखू लागल्यास हा उपाय प्रभावी ठरू शकतो.
कसा कराल उपाय –
- जो कान दुखत आहे तो उशीवर ठेवून कुशी झोपू नका
- पाठीवर झोपणे अशा वेळी योग्य ठरेल
- मात्र कुशीवर झोपण्याची सवय असेल तर जो कान दुखत आहे तो वरच्या दिशेला असू द्या
अॅक्युपंक्चर
अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीचा वापर तुम्ही तुमचे कान दुखणे कमी करण्यासाठी नक्कीच करू शकता. कारण अॅक्युपंक्चर ट्रिटमेंटमध्ये त्या अवयवाच्या स्नायूंची केंद्र प्रेस केली जातात ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि आराम मिळतो.
कसा कराल उपाय –
- कानाची पाळीचा खालचा आणि वरचा भाग बोटांनी दाबून तुम्ही हा उपाय करू शकता.
- कानाच्या पाळीमागे चोळूनही चांगला आराम मिळू शकतो.
लवंग तेल
लवंगमध्ये अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे कानाचे दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही लवंग तेलाचा वापर नक्कीच करू शकता. या तेलामुळे तुमच्या कानाचे दुखणे थांबतेच शिवाय दाह कमी होतो.
कसा कराल वापर –
- तिळाच्या तेलात काही थेंब लवंग तेल मिसळा
- तेल कोमट करून थंड करा
- काही थेंब तेल कानामध्ये सोडा
कांदा
कांद्यामध्ये शरीराला थंडावा देणारे गुणधर्म आहेत. कानात इनफेक्शन झाल्यास कान जोरात ठणकू लागतो. अशा वेळी कानातून येणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करू शकता.
कसा कराल वापर –
- कांद्याचा रस काढा
- कांद्याचा रस तेलात गरम करा
- थंड झाल्यावर काही थेंब तेल कानात टाका
ऑलिव्ह ऑईल
कान दुखत असेल तर अनेक जण घरगुती उपाय म्हणून कानात ऑलिव्ह ऑईल टाकतात. याबाबत कोणतेही वैद्यकीय संशोधन आढळत नाही. मात्र कानात ऑलिव्ह ऑईल टाकल्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
कसा कराल उपाय –
- ऑलिव्ह ऑईल थोडं कोमट करा
- तेल थंड झाल्यावर थेंबभर कानामध्ये सोडा
अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगर कानदुखीवर अतिशय प्रभावी घरगुती औषध ठरू शकते. कारण अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अॅसेटिक अॅसिड असते जे अॅंटि बॅक्टेरिअल असल्यामुळे कानातील इनफेक्शन यामुळे कमी होते.
कसा कराल उपाय –
- कोमट पाण्यात समान प्रमाणात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा
- मिश्रण इअर ड्रॉपने कानात सोडा
टी ट्री ऑईल
टी ट्री ऑईल हा कान दुखणे कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. कारण त्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळतो आणि रिलॅक्स वाटू लागते. सहाजिकच
कान दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही कानात टी ट्री ऑईल टाकू शकता.
कसा कराल उपाय –
- तिळाच्या तेलात दोन ते चार थेंब टी ट्री ऑईल टाका
- तेल कोमट करून थंड झाल्यावर कानात टाका.
कान दुखणे घरगुती उपाय आणि निवडक प्रश्न – FAQ’s
1. कानाचे दुखणे गंभीर स्वरूपाचे आहे कसे ओळखावे ?
कान जोरात ठणकत असेल आणि घरगुती उपाय करूनही कान दुखणे कमी झाले नसेल तर, कान दुखण्यासोबत तीव्र ताप अथवा घसा दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
2. कानाचे इनफेक्शन जबड्यामध्ये पसरू शकते का ?
कान आणि जबडा एकमेंकाना जोडलेला असल्यामुळे असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कानाचे इनफेक्शन कोणत्या प्रकारचे आहे यावर ते इनफेक्शन जबड्यामध्ये पसरणार का हे अवलंबून आहे. यासाठी कान दुखीवर वेळीच उपचार करावेत.
3. कानाचे दुखणे किती दिवस राहते ?
कानात मळ साचल्यामुळे इनफेक्शन झाले असेल तर ते घरगुती उपाय केल्यावर दोन ते तीन दिवसात बरे होते. मात्र जर त्यापेक्षा जास्त दिवस कान दुखत असेल तर तुम्हाला वैद्यकीय उपचार करण्याची गरज आहे.