घरात मंगलकार्य असले की ते पार पडेपर्यंत घरातील कोणालाच चैन पडत नाही. त्यातल्या त्यात लग्नकार्य असेल तर विचारायलाच नको. घरात असलेल्या लग्नकार्यामध्ये अनेक अडथळे येत असतात. पण ते सगळे पार पाडून आपण ही कार्ये पार पाडत असतो. तुम्हालाही घरातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नात सतत बाधा आल्यासारखी वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी आणि खबरदारी आपण घ्यायला हवी. असे म्हणतात, दिवाळीनंतर येणाऱ्या तुळशी विवाहाचा Tulsi Vivah In Marathiदिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. लग्नातील अडथळे दूर कऱण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे असे म्हणतात. असे का म्हटले जाते ते जाणून घेऊया.
तुलसी विवाह मानला जातो शुभ
दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला तुलसी विवाह केला जातो. साधारण आठवडाभर तुलसी विवाह चालतो. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी चार महिन्याच्या दीर्घ झोपेतून भगवान विष्णू उठतात. त्या दिवसापासून लग्नकार्याला सुरुवात होते. तुलसी विवाहाच्या शुभेच्छा देत ह आनंद साजरा करायल हवा. तुलसी विवाह हा त्यामुळे अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो.
आवर्जून करायला हवे तुलसी विवाह
तुलसी विवाह करणे अनेक गोष्टींसाठी शुभ मानले जाते. यामागे काही कारणंही सांगितली जातात. ती जाणून घेऊया.
- तुलसी विवाह हा भगवान विष्णूशी संबधित असा काळ असल्यामुळे या दिवसात भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो.
- तुलसी विवाह हा अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो.यामुळे अनेक संकटे दूर होण्यास मदत मिळते. तुलसी विवाह Tulsi Vivah In Marathi केल्यामुळे वैवाहिक जीवनातल अनेक अडचणी कमी होण्यास मदत मिळते.
- जर घरातील एखाद्या व्यक्तीचे लग्न होत नसेल तर त्यांनी तुलसी विवाह करायलाच हवा. कारण त्यामुळे लग्नाच्या सगळ्या अडचणी कमी होतात. लग्न निर्विघ्न पार पडण्यास मदत मिळते.
मनोभावे करा तुलसी विवाह
दिवाळीचे चार दिवस मजेत घालवल्यानंतर मजा येते ती तेठ तुलसी विवाहाच्या दिवशी. Tulsi Vivah In Marathi तुलसी विवाह करण्याची सगळ्यांची पद्धत सर्वसामान्यपणे सारखीच असते.
- घरात असलेल्या तुळशीला स्वच्छ करुन तिच्या आजुबाजूला रांगोळी काढा.
- तुळशीच्या आजुबाजूला दिवे लावा. तिला नवरीसारखे सजवण्यासाठी हल्ली दागिने मिळतात. तुम्ही ते दागिने तुळशीला घालून सजवू शकता.
- लग्नाप्रमाणे अंतरपाट घेऊन एखाद्या लहान मुलाला विष्णू म्हणून उभे करुन त्याच्यासोबत तुळशीचा विवाह केला जातो.
मनोभावे तुम्ही तुळशीचा विवाह केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचे फायदे मिळतील.