home / लाईफस्टाईल
त्रिपुरारी पौर्णिमा माहिती

Information About Tripurari Purnima In Marathi | त्रिपुरारी पौर्णिमेची माहिती | त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा

भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये कार्तिक महिन्याला खूप जास्त महत्व आहे.  या महिन्यात विष्णू आणि लक्ष्मीचे पूजन केले जाते. भगवान शिवाशी निगडीत असलेला कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. त्रिपुरारी पौर्णिमा हा असा दिवस आहे ज्या दिवशी तुळशी विवाहाच्या शुभेच्छा आणि साजरी करण्याचा शेवटचा दिवस असते. तो दिवस त्रिपुरारी पौर्णिमा (Tripurari Purnima Information In Marathi) म्हणून साजरा केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेला पुराणात अतिशय महत्व आहे. या संदर्भात असे म्हटले जाते की, त्रिपुरा पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्थी ही वैकुंठ चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. चार्तुमासामध्ये भगवान विष्णू आराम करत असल्याने ते सगळा भार हा शंकर भगवानकडे सोपवतात. म्हणून की काय याच्या दुसऱ्या दिवशी शंकराकडे सगळा भार आल्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूची दोन पवित्र तत्वे म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते. म्हणून घरोघऱी दिवेलावणी केली जाते. घरी रांगोळया काढल्या जातात. महाराष्ट्रातील मंदिरामध्ये या दिवशी दिवे लावले जातात. या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते. अनेक जण या दिवसाला देव दिवाळी म्हणतात. या दिवशी पुन्हा एकदा घराबाहेर रांगोळी काढली जाते. दिवे लावले जातात. फटाके देखील फोडले जातात. ‘चांगले ते रुजावे आणि वाईटाचा नाश व्हावा’, हाच खरा त्रिपुरारी पौर्णिमेचा उद्देश असतो. कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे या दिवशी फारच शुभ असते. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय हे जाणून घेतले तरी देखील याची त्रिपुरारी पौर्णिमेची संपूर्ण माहिती (Tripurari Purnima In Marathi) हे जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. या शिवाय लक्ष्मीपूजन पूजाविधी माहीत करुन घ्या.

त्रिपुरारी पौर्णिमा पूजा (Tripurari Purnima Pooja In Marathi)

Tripurari Purnima In Marathi
Tripurari Purnima In Marathi

कार्तिक पौर्णिमा म्हणजे काय Tripurari Purnima In Marathi हे जाणून घेतल्यानंतर याचा पूजाविधी नेमका काय ते देखील जाणून घेऊया. या दिवशी (Tripurari Purnima Pooja In Marathi) नेमकी कशी करायची ते वाचूया 

यंदा 2022 साली  कार्तिक पौर्णिमा ही 19 नोव्हेंबर 2021, शुक्रवारी आली आहे. 

पौर्णिमा प्रारंभ :  दुपारी 2 वाजून 26 मिनिटे
पौर्णिमा सांगता : 20 नोव्हेंबर, शनिवार दुपारी 2 वाजता
भारतीय पंचंगाच्या नियमानुसार कोणताही पूजाविधी सकाळी केलेला नेहमीच चांगला असतो. त्यामुळे तुम्ही 20 नोव्हेंबर या दिवशी सकाळी देखील पूजाविधी करु शकता.

त्रिपुरारी पौर्णिमेचा पूजाविधी 

 1. पहाटे उठून पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे. पूर्वीच्या काळी नदीत आंघोळ केली जात असे. पण सध्या तसे करणे शक्य नसल्यामुळे गंगाजल घालून घरी स्नान करावे.
 2. या दिवशी लक्ष्मी नारायणाचे पूजन केले जाते. त्यामुळे लक्ष्मी- नारायणाची षोडशोपचार पूजा करावी.
 3. देवासमोर तूपाचा दिवा लावावा. या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे शुभ मानले जाते. त्यामुळे देवासमोर सत्यनारायणाची कथा वाचावी.
 4. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. तुळशीचे पूजन आणि आरती करावी. संध्याकाळी घराबाहेर दिवे लावावे. शिवाय या दिवशी दीपदान करावे. दीपदानाचे या दिवशी खास महत्व आहे. 

अशाप्रकारे तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेची पूजा करु शकता.  

त्रिपुरारी पौर्णिमा माहिती आणि कथा (Tripurari Purnima Information In Marathi) 

Instagram

त्रिपुरारी पौर्णिमेची माहिती (Tripurari Purnima In Marathi) जाणून घेताना त्यासंदर्भातील कथा जाणून घेणे गरजेचे आहे. त्रिपुरारी पौर्णिमा संदर्भात एक कथा सांगितली जाते. जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमेसंदर्भातील माहिती

कथा 1

त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रम्हदेवाचे खडतर असे तप केले. ब्रम्हदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याने त्यांच्याकडून असा आशीर्वाद मागितला की, मला या पुढे कोणाचेही भय राहणार नाही. पण हा आशीर्वाद मिळाल्यानंतर तो फारच उन्मत्त झाला. तो देवांनाही त्रास देऊ लागला. त्रिपुरासुराचा वध करायचे देवांनी ठरवले. पण  त्रिपुरासुराची तटबंदी ही अभेद्य होती. त्यामुळे त्यांना त्रिपुरासुराचा वध करता येत नव्हता. अखेर सगळ्यांनी शंकर देवाला बोलावणी केली. तेव्हा शंकरांनी तिन्ही नगरे जाळून त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा वध झाल्यामुळेच हा दिवस मोठ्या आनंदात साजरा केला जातो. त्या दिवशी घराबाहेर सगळ्यांनी दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला.

कथा 2

या संदर्भात आणखी एक कथा देखील सांगितली जाते. ती अशी की,तारकासुर नावाचा एक असूर होता. त्याला तीन  मुलं होती.तारक्ष,कमलाक्ष,विन्दुन्माली नावाची तीन पुत्रे होती. या तिन्ही पुत्रांना त्यांनी आपले राज्य वाटून दिले होते. देवांना कोणताही त्रास देऊ नका. असे त्याने त्या मुलांना बजावले होते. पण असे असून देखील त्यांनी देवांना आणि लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. लोकांना देणारा त्रास पाहात भगवान शंकराने या मुलांच्या तिन्ही पुरांची म्हणजेच राज्यांची होळी करुन त्यांचा वध केला. म्हणूनच या दिवसाचे महत्व हे खास मानले जाते. 

त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा (Tripurari Purnima Wishes In Marathi)

Tripurari Purnima Pooja In Marathi

त्रिपुरारी पौर्णिमेची माहिती (Tripurari Purnima In Marathi) जाणून घेतल्यानंतर तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर तुम्ही हे काही शुभेच्छा संदेश पाठवू शकता. याशिवाय दिवाळीच्या शुभेच्छा पाठवा आणि दिवाळीचा आनंदही लुटा

 1. सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली
  शब्दांचीही सुमने फुलती,येता घरोघरी दिवाळी
  देव दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 2. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघोही दिशा
  घेवोनि येवो नवी उमेद नवी आशा,
  तुम्हा आणि तुमच्या परिवाराला त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 3. तेजोमय झाला आजचा प्रकाश
  जुना कालचा काळोख, लुकलुकणारा,
  चांदण्याचा किरणांचा सोनेरी अभिषेक
  सारे रोजचे तरी भासे नवा सहवास,
  सोन्यासारख्या लोकांसाठी खास त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 4. शंकरपूजा, देवपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा
  उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षाला,
  वंदन करुया मनोभावे आज त्या मांगल्याचा
  त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 5. स्नेहाचा सुगंध दरवळला, देव दिवाळीचा सण आला,
  एकच मागणे या कार्तिक पौर्णिमेला, सौख्य समृद्धी लाभो सर्वांना
  त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 6. तिमिराकडून तेजाकडे नेणारा सण
  दाखवतो प्रकाशाची वाट
  नवी उमेद काळजी पुसण्याची, नात्याचे रेशीम बंध घट्ट करण्याची
  प्रकाश हा उत्सव, आपले आयुष्य उजळून टाको,
  त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 7. नव्या सणाला उजळू दे आकाश,
  सर्वत्र पसरु दे लख्ख प्रकाश,
  आज कार्तिक पौर्णिमेचा सण खास,
  त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 8. नदीच्या तिरी असंख्य दिव्यांची आरास
  त्रिपुरारी ठरो सर्वांशी लाभदायक
  त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 9. शंकराची राहावी तुमच्यावर कृपा
  सदैव राहावी त्यांची कृपा
  त्रिपुरारी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
 10. त्रिपुरारी पौर्णिमा तुमच्या जीवनात घेऊन येवो आनंदी आनंद
  तुम्हाला सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

  अशाप्रकारे अत्यंत आनंदाने हा दिवस साजरा करावा आणि त्याचा आनंद दुसऱ्यासोबतही साजरा करावा.

अधिक वाचा:

दिवाळी पाडवा शुभेच्छा संदेश

दिवाळी सणाची संपूर्ण माहिती

45+ Bhaubeej Wishes In Marathi | भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

कार्तिक एकादशी शुभेच्छा

19 Oct 2021

Read More

read more articles like this
good points logo

good points text