ADVERTISEMENT
home / अॅस्ट्रो वर्ल्ड
mars sign compatibility

तुम्हाला कसा पार्टनर आवडतो याचे उत्तर दडलेय तुमच्या पत्रिकेत, कसे ते जाणून घ्या

ज्योतिषशास्त्र आपल्याला आपली पत्रिका व रस यानुसार कोणत्या राशीचा पार्टनर आपल्यासाठी योग्य आहे याबद्दल काही संकेत देऊ शकते. अर्थात हे सगळे तेव्हाच अप्लाय होते जेव्हा एखाद्याचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असतो. पण अनेक अभ्यासाअंती हे सिद्ध झाले आहे की आपल्या राशीचा व आपल्या पत्रिकेत असणाऱ्या ग्रहांच्या स्थानावर आपल्या आवडीनिवडी व स्वभाव ठरतात. आणि केवळ आपल्या चंद्रराशीवरून किंवा लग्नराशीवरून आपले स्वभाव ठरत नाहीत तर शुक्र कुठल्या घरात आहे, मंगळ कुठल्या घरात आहे यासारखेच कुठले ग्रह कुठल्या घरात आहेत यावरून आपले एकूण व्यक्तिमत्व ठरते. त्यामुळे एखाद्याची रास क्ष आहे त्यामुळे त्याच्यासाठी य राशीचाच पार्टनर योग्य असेल असा परफेक्ट अंदाज सांगता येत नाही. कारण त्यासाठी बरेच फॅक्टर्स गृहीत धरावे लागतात. 

पत्रिकेतील मंगळ काय सांगतो 

स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळ ज्या घरात आहे त्यावर तिला कोणत्या प्रकारच्या पुरुषांविषयी आकर्षण वाटू शकते याचे काही संकेत मिळतात. याचे कारण असे की मंगळ आपल्याला विरुद्धलिंगी व्यक्तीचे कुठले गुण आकर्षक वाटतात हे काही प्रमाणात सांगतो आणि पारंपारिकपणे पुरुषांच्या गुणांचे प्रतिनिधित्व करतो. तर पत्रिकेतील शुक्र हा लैंगिक आकर्षणाच्या बाबतीत माहिती देतो. 

मेषेचा मंगळ  – जर एखाद्या स्त्रीचा मंगळ मेष राशीत असेल, तर ती बहुधा बलवान, स्वतंत्र आणि स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव असणाऱ्या पुरुषाकडे आकर्षित होते. कदाचित दिसायला धष्टपुष्ट, परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे थेट बोलणारा, आत्मविश्वासू पुरुष अशा स्त्रियांना आवडतो. या स्त्रियांना अतिसंवेदनशील किंवा लाजाळू पुरुष सहसा आवडत नाहीत. 

वृषभेचा मंगळ-  जर स्त्रीच्या पत्रिकेत मंगळ वृषभ राशीमध्ये असेल तर ती बहुतेकदा अशा पुरुषांकडे आकर्षित होते ज्यांच्या अवतीभवती स्थिर, सुरक्षित व स्ट्रॉंग ऑरा असतो. स्ट्रॉंग व्यक्तिमत्व असलेल्या आणि स्थिर आयुष्य जगणाऱ्या पुरुषांचे त्यांना आकर्षण वाटते.  अस्थिर, अती बौद्धिक किंवा उथळ पुरुष या स्त्रियांना आवडत नाहीत. या स्त्रियांना असे पुरुष आवडतात ज्यांना त्या पटकन खुश करू शकतील आणि जे पारंपरिक ‘पुरुष’ या व्याख्येत बसतील. 

ADVERTISEMENT

मिथुनेचा मंगळ – जर एखाद्या स्त्रीचा मंगळ मिथुन राशीत असेल तर तिच्या अपेक्षांच्या यादीत बुद्धिमत्तेचा सर्वात पहिला क्रमांक लागतो.  ऍथलेटिक किंवा टॉमबॉयिश लुक, कधीकधी स्लिम ट्रिम असणारे पुरुषही बहुतेकदा तिला आवडतात. वाकचातुर्य हा या महिलांसाठी एक मोठा टर्न-ऑन आहे. अष्टपैलुत्व आणि खेळकरपणा हे गुण असलेले पुरुष  या स्त्रियांना अत्यंत आकर्षक वाटतात. 

अधिक वाचा – या राशीच्या मुली करतात अप्रतिम नेतृत्त्व, कमी काळात होतात बॉस

कर्केचा मंगळ – एखाद्या स्त्रीचा मंगळ कर्क राशीत असेल तर ती दयाळू, संवेदनशील आणि  प्रोटेक्टिव्ह असलेल्या पुरुषाकडे आकर्षिक होते. या स्त्रिया कधीकधी मूडी स्वभावाच्या पुरुषांकडेही आकर्षित होतात, साधारणपणे, या स्त्रिया शारिरीकदृष्ट्या मजबूत किंवा किमान तशा दिसणाऱ्या पुरुषांना प्राधान्य देतात कारण त्या सुरक्षिततेला प्राधान्य देतात.

सिंहेचा मंगळ- जर एखाद्या महिलेचा मंगळ सिंह राशीमध्ये असेल तर ती थोडेसे गर्विष्ठ, आऊटगोईंग आणि कदाचित भडक असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होऊ शकते. अलिप्तपणा किंवा आत्मविश्वासयुक्त ऑरा सहसा या स्त्रियांना आकर्षित करतो. या स्त्रिया अधिक धाडसी, आत्मविश्वासपूर्ण आणि स्टाईल असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात. या स्त्रियांसाठी स्वभावातील खेळकरपणा आणि मजा खूप महत्वाची आहे. या स्त्रियांसाठी कंजूसपणा एक प्रचंड मोठा टर्न-ऑफ आहे. 

ADVERTISEMENT

कन्येचा मंगळ – जर एखाद्या स्त्रीचा मंगळ कन्या राशीत असेल, तर तिला जास्त ग्लॅमर किंवा दिखाऊपणा न करणारे साधे पुरुष आवडतात. तिच्यासाठी निरोगी असणे, दिखाऊपणा नसणे आणि स्वच्छता तसेच विशिष्ट प्रमाणात बुद्धिमत्ता तसेच जीवनाकडे पाहण्याचा विनम्र, समंजस दृष्टीकोन हे सर्वात आकर्षक शारीरिक गुण आहेत. या स्त्रियांना शांत स्वभावाचे पुरुष आवडतात. 

जर पत्रिकेत तूळ, वृश्चिक, धनु. मकर, कुंभ किंवा मीन या राशींमध्ये मंगळ असेल तर त्या स्त्रियांना कसे पुरुष आवडतात हे पुढच्या लेखात बघू.

भाग दोन येथे वाचा – पत्रिकेतील मंगळाचे स्थान ठरवते तुमची पार्टनरविषयीची आवड -निवड (भाग 2)

 

ADVERTISEMENT

अधिक वाचा जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना येतो पटकन राग

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

21 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT