ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
types-of-puri-recipes-for-snacks-in-marathi

जेवणात करा पुरीचे असे चविष्ट प्रकार, स्वाद वाढेल

कोणताही सण असल्यावर अथवा कधी कधी नाश्त्यासाठीदेखील आपल्याकडे पुरी करण्याची आणि खाण्याची पद्धत आहे. पोळ्या (चपाती) करायला कंटाळा आला असेल तर पटकन होणारा पदार्थ म्हणजे पुरी. पुरीने जेवणाचा स्वाद अधिक वाढतो आणि करण्यासाठीही या सोप्या आहेत. पण नुसती गव्हाच्या पिठाची पुरी करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची आणि चवीची स्वादिष्ट पुरी बनवू शकता. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पुरी बनविण्यात येते. तुम्हीदेखील नाश्त्यासाठी अथवा जेवणामध्ये पुरी बनवून याचा स्वाद घेऊ शकता. 

भेडवी पुरी (Bhedavi Puri)

Bhedvi Puri – Instagram

भेडवी पुरी हे नाव तुम्ही ऐकले आहे का? भेडवी पुरी अर्थात गव्हाच्या पिठामध्ये वाटलेली उडीद डाळ, मसाले अर्थात ओवा, लाल तिखट, हळद, मिरचीची पेस्ट, मीठ आणि मोहन घालून करण्यात येते. पाण्याने हे पीठ भिजवून अर्धा तास ठेवावे आणि नंतर नॉर्मल गोळे करून पुऱ्या लाटून घ्यावात. या पुऱ्या तेल गरम करून त्यात तळून घ्याव्या. पीठ अधिक पातळ ठेऊ नये अन्यथा तेलात पुरी फुटण्याची शक्यता असते. ही पुरी हिरव्या चटणीसह खायला अधिक स्वादिष्ट लागते. 

मेथी बाजरा पुरी (Meth Bajra Puri)

Methi Bajra Puri – Instagram

वेगळ्या चवीची पुरी तुम्हाला हवी असेल आणि पौष्टिक पुरी हवी असेल तर तुम्ही मेथी बाजरा पुरी बनवू शकता. बाजरीच्या पिठामध्ये थोडेसे गव्हाचे पीठ मिक्स करा. त्यात मीठ, तेल, हळद, लाल तिखट, ओवा, जिरे, ताजी कापलेली मेथी मिक्स करून हे पीठ भिजवून घ्या. अर्धा तास हे पीठ तसंच ठेवा आणि तिंबू द्या. त्यानंतर याचे गोळे करून घ्या आणि पुरी लाटून तेलात तळा. गरमागरम टॉमेटो बटाटा रस्सा भाजीसह ही पुरी खायला द्या. तुम्हाला रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही पुरी नक्की ट्राय करू शकता. 

क्रिस्पी मसाला पुरी (Crispy Masala Puri)

Crispy Masala Puri – Instagram

अनेकांना जेवणामध्ये क्रिस्पी पदार्थ खूपच आवडतात. तुम्ही तुमची पुरीही क्रिस्पी हवी असेल तर तुमच्यासाठी क्रिस्पी मसाला पुरी हा उत्तम पर्याय आहे. गव्हाचे पीठ, मीठ, लाल मिरची पावडर, ओवा, तेल घालून पीठ थोडे घट्ट भिजवून घ्या. त्यानंतर साधारण अर्धा तास पीठ तिंबून ठेवा. याचे गोळे करून पातळ लाटा आणि मग तेलात तळा. या पुऱ्या कुरकुरीत होतात आणि चवीला अत्यंत सुंदर लागतात. चहा अथवा कॉफीसह याचा स्वाद अधिक चविष्ट लागतो. 

ADVERTISEMENT

बीट आणि चणाडाळीची पुरी (Beetroot and Chana Dal Puri)

Beetroot and Chana Dal Puri – Instagram

तुम्हाला तुमच्या मुलांसाठी पौष्टिक आणि चमचमीत पदार्थ अशा दोन्ही गोष्टी साधायच्या असतील तर बीट आणि चणाडाळीची पुरी हा उपाय उत्तम आहे. यासाठी तुम्ही रात्रभर चणाडाळ पाण्यात भिजत घाला. बीटचे तुकडे कापून घ्या. सकाळी उठल्यावर बीट आणि चणाडाळ एकत्र उकळून घ्या. दुसऱ्या परातीमध्ये रवा आणि गव्हाचे पीठ काढून घ्या. त्यात थोडे मीठ घाला. जिरे, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर घाला आणि त्यात वरील उकळलेले मिश्रण घालून व्यवस्थित भिजवून घ्या. यासाठी तुम्हाला वेगळे पाणी वापरण्याची गरज नाही. बीट आणि चणाडाळीच्या पाण्याने हे पीठ व्यवस्थित भिजवून मळून घ्या. नंतर अर्ध्या तासाने लहान गोळे करून पुरीच्या आकारात लाटा आणि मग तळा. सॉस आणि चटणीसह खायला द्या. 

पालक पुरी

Palak Puri – Instagram

मुलांना सहसा पालकाचा हिरवा रंग पाहून पालेभाजी अथवा पालकाची भाजी खावीशी वाटत नाही. मग अशावेळी गरमागरम पालक पुरी तुम्ही करू शकता. पालक पाण्यात घालून उकळून घ्या. याची पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये वाटताना तुम्ही ओवा, हिरव्या मिरची, काळी मिरी आणि मीठ घालून पेस्ट करा. त्यानंतर एका परतीत गव्हाचे पीठ, तेल, मीठ घ्या. त्यात वरची पेस्ट घालून पाणी न घालता व्यवस्थित पीठ मळून घ्या. तेलाने व्यवस्थित तिंबून ठेवा. नंतर अर्ध्या तासाने तुम्ही गोळे करून पुऱ्या तयार करून घ्या आणि मग तेलात तळून गरमागरम खायला द्या. चटणी अथवा सॉससह पालक पुरी चवीला अप्रतिम लागते. 

याशिवाय तुम्ही आलू पुरी, बेडमी पुरी, नागोरी पुरी या पुरीदेखील खाण्यासाठी बनवू शकता. याची रेसिपी आम्ही नक्की तुमच्यासाठी पुढील लेखात घेऊन येऊ. तुम्हीही स्नॅक्स म्हणून या पुऱ्यांची रेसिपी नक्की करून पाहा आणि आम्हाला टॅग करायला विसरू नका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
07 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT