स्नॅक्समध्ये रोज नक्की काय खायचं असा प्रश्न पडतो. तर काही असे स्नॅक्स आहेत जे तुम्ही बनवून ठेऊ शकता आणि संध्याकाळी मस्तपैकी चहा आणि कॉफीसह खाऊ शकता. असेच एक स्नॅक्स म्हणजे मठरी (Mathri). चहाबरोबर हा पदार्थ अधिक चविष्ट लागतो आणि हा असा पदार्थ आहे की, एकदा तोंडाला लागला की आपण आपला हात नाही थांबवू शकत. भारतामध्ये चहा आणि कॉफीसह चटकदार पदार्थ खाण्याची परंपरा ही जुनी आहे. पराठे, खुसखुशीत समोसे, पावसाळ्याच्या दिवसात बटाटेवडे रेसिपी आणि कुरकुरीत भजी, तर रोजच्या नाश्त्याला बिस्किट असे स्नॅक्स आपण खात असतो. पण तुम्ही चहा आणि कॉफीसह जिरा-पुदिन्याची मठरी खाऊन पाहिली आहे का? तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगत आहोत की, पुदिन्याची मठरी ही केवळ स्वादिष्टच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही याचा फायदा होतो. कारण पुदिन्यामुळे पोटासंबंधित कोणत्याही समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत मिळते. तसंच यातील जिरे हे खाण्याचा स्वाद वाढविण्यास मदत करतात. जिरा-पुदिन्याची मठरी ही तुम्ही घरीही बनवू शकता. याची रेसिपी कशी बनवायची हे जाणून घ्या. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी असा नमकिन पदार्थ हवाच.
मठरी बनविण्यासाठी साहित्य
- अर्धा किलो मैदा
- 200 ग्रॅम रवा
- 4 चमचे जिरे
- 125 ग्रॅम तूप
- अर्धा किलो पुदीना
- चवीनुसार मीठ
- एक चमचा दूध
- 2 चमचे तेल
- तळण्यासाठी तेल
मठरी बनविण्याची पद्धत
- जिरे आणि पुदिन्याची मठरी बनविण्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा एक बाऊल घ्या आणि मग त्यामध्ये मैदा आणि रवा व्यवस्थित गाळून घ्या
- तसंच पुदिन्याची पाने तोडून घ्या आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवा. जेणेकरून पुदिन्यातील घाण स्वच्छ होईल आणि पुदिन्याची पाने चांगली राहतील
- आता मैदा आणि रवा असलेल्या बाऊलमध्ये हळूहळू पाणी आणि दूध घालून हे पीठ व्यवस्थित भिजवा आणि साधारण 20-25 मिनिट्ससाठी बाजूला ठेवा
- 25 मिनिट्स झाल्यानंतर भिजवलेले पीठ व्यवस्थित सेट होते. आता याचे गोळे करून घ्या
- पोळपाटावर हा गोळा पुरीच्या आकारात लाटा आणि त्याचे करंजीच्या कटरने तुकडे करून घ्या. तुम्हाला हवे तसे चौकोनी तुकडे तुम्ही करून घ्या. हे तुकडे अगदी बारीक करू नका
- त्यानंतर कढईमध्ये तूप अथवा तेल घ्या आणि ते तापवा
- आता एक एक कापलेली मठरी तुम्ही या तापलेल्या तेलात वा तुपात सोडा आणि व्यवस्थित तळून घ्या
- एका ताटामध्ये टिश्यू पेपर ठेवा आणि तळलेल्या मठरी त्यावर काढा. तुम्ही चहा अथवा कॉफीसह मस्तपैकी ही मठरी खाऊ शकता. थंड झाल्यानंतर तुम्ही ही मठरी एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा आणि मस्तपैकी संध्याकाळी याचा आस्वाद घ्या
लक्षात ठेवण्याच्या टिप्स –
- मठरी तयार करताना तुम्ही मैदा आणि रवा यांचे योग्य प्रमाण घ्या. अन्यथा मठरी खुसखुशीत होणार नाही. तसंच याचे प्रमाण योग्य नसल्यास, याची चवही बिघडण्याची शक्यता असते
- तुम्ही मैदा आणि रवा भिजवताना त्यात मोहन घालू शकता. मात्र याचे योग्य प्रमाण तुम्हाला माहीत असायला हवे
- तुम्हाला हवे असल्यास आणि आवडत असल्यास, जिऱ्यासह तुम्ही थोडासा ओवादेखील यामध्ये मिक्स करू शकता
- तेलापेक्षा तुपाचा वापर केल्यास या मठरी अधिक चविष्ट होतात
तुम्हीही तुमच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा असा चविष्ट मेन्यू आणि घ्या स्वाद!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक