मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आपण सगळेच घरात कोरोनामुळे बंद आहोत. पण मार्चपासून ते ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनमध्ये हळुहळू शिथिलता आणण्यात आली आहे. साधारण जुलैपासून सुरु करण्यात आले. अनेक वेगवेळ्या नियमांचे पालन करत आता मुंबई हळुहळू सुरु होऊ लागली आहे. आता आणखी एक महिना संपत आला आहे. 2020च्या सप्टेंबर महिन्यात आपण जाणार आहोत. या महिन्यात Unlock चा चौथा टप्पा सुरु होणार आहे. या महिन्यापासून नेमकं काय सुरु होणार आणि काय बंद राहणार आहे हे जाणून घेऊया.
लिंबाच्या साली फेकू नका तर असा करा उपयोग
या गोष्टी होणार सुरु
ऑगस्ट महिन्यापासून काही ठिकाणी मॉल सुरु झाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. सर्व नियमांचे पालन करत आता सगळी दुकानं उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. खाद्यपदार्थांची दुकानं सुरु झाली असून ‘टेक होम’ किंवा ‘पार्सल’ पद्धतीने ती घेण्यास परवानगी देण्यात आली आहे पण आता सप्टेंबरपासून काय सुरु होणार असा प्रश्न पडला असेल तर या गोष्टींचा या यादीत समावेश असणार आहे.
मेट्रो
मुंबईकरांसाठी प्रवास हा अत्यंत महत्वाचा आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना बोलावून ऑफिसेस पूर्ववत केले आहेत. पण ट्रेन किंवा मेट्रोचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना बेस्ट, रिक्षा किंवा खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आता आणखी एक पाऊल टाकत केंद्र सरकारने मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आधी प्रायोगिक तत्वावर म्हणजे 15 दिवस मेट्रो चालवली जाणार आहे. एका डब्ब्यात केवळ 50 प्रवासांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
जाणून घ्या ‘वॉकिंग मेडिटेशन’ कसं करावं आणि त्याचे फायदे
थिएटर
कोरोना आल्यापासून लोकांचा एकमेकांशी जास्त संपर्क येऊ नये म्हणून थिएटर्स बंद करण्यात आले. गेल्या 5 महिन्यापासून थिएटर बंद असून अनेकांनी त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले. पण आता चित्रपट निर्मात्यांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे 1 तारखेपासून थिएटर सुरु होण्याची शक्यता आहे. पण मॉल्समधील थिएटर सुरु होण्याची शक्यता फार कमी आहे. या संदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर अधिक माहिती देतील अशी अपेक्षा आहे.
शाळा सुरु करण्याची शक्यता
ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेत शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले. पण आता शाळा आणि कॉलेज सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. शाळा आणि कॉलेज सरसकट सुरु होणार नाहीत. शाळा किंवा कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण हा निर्णय घेण्यात आला असला तरी हे सर्वस्वी राज्य सरकारवर अवलंबून असणार आहे.
बार होणार सुरु
मुंबईत गेल्या कित्येक दिवसांपासून हॉटेल्स आणि बार बंद आहेत. पण आता बार सुरु करण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे, अशी माहितीही समोर येत आहे. बार सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी अजूनही तेथे बसून मद्यपान करु शकणार नाही.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी या खाद्यपदार्थांचा आहारात करा समावेश
काय राहणार बंद
- रेल्वे सेवा – अद्याप निर्णय नाही
- हॉटेलिंग- अजूनही तेथे बसून खाता येणार नाही
- मॉलमध्ये कपडे बदलणे याला अजूनही परवानगी दिली जाणार नाही
या शिवाय कोरोना संदर्भातील नियम हे तसेच राहणार आहेत